Skip to main content

Posts

Showing posts from August, 2021

On Rishi Panchami Day

  Written By: Yogesh Gogwekar Address; Mahim, Mumbai Subject: My Small Writing On Rishi Panchami Day Website: https://yogeshgogwekar.blogspot.com   Rishi Panchami is celebrating the second day of Ganesh Chaturthi. It is not a festival but a fasting day observed by women to pay respect  & gratitude  to Sapta Rishi or seven sages who devoted their life for the welfare of the society. These Seven Sages are Kashyapa, Atri, Bharadhvaj, Vishvamitra, Gauthama, Jamadagni & Vashishta.   On Rishi Panchami day,  women observe fasting for purification. In Hinduism, Purification has highest priority and there are guidelines to maintain it. During the menstrual cycle, women are not allowed to do any religious functions and also not allowed to enter in kitchen. Thus, to avoid such guidelines ,women are observing the fast.   In Maharashtra especially in Konkan part and Goa, a special dish is cooked which is being called as Rishichi Bhaji whic...

A small incidence Amitabh Bachhan & Pran in Zanjeer

  From Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai "Taken from the book. “Bollywood a History written by Mihir Bose”   Subject : A  small incidence Amitabh Bachhan & Pran in Zanjeer   Zanjeer, a Hindi feature film released on 23rd May 1973 which unexpectedly took off.  Amitabh Bachhan who played a lead role in Zanjeer had thirteenth flops films in a row before Zanjeer& for Zanjeer he was the fifth choice. Therefore, mood in the Zanjeer Camp was so gloomy that director Prakash Mehra had to announce that Amitabh would be starring in his next production Hera Pheri. This boosted the morale of Amitabh and he put full efforts to make this film.. Zanjeer made him the most successful actor in Bollywood .   There is a short incident that happened at the time of the shooting of Zanjeer. Pran , an established star, played the Pathan, a villain role who befriends policemen to seek justice. Amitabh Bachhan has a great respect for Pran & used to call him Pran...

On Occasion Of Gokulasthami

  On Occasion Of Gokulasthami Subject: Bhagvad Gita in Mahabharata: Words of Lord Krishna in Bhishma Parva Written By: Yogesh Gogwekar Address : Mahim , Mumbai He has been called by many names like Govinda, Keshav, Madhusudan, Vasudeva, Mukunda but for his devotees always call him Krishna. Lord Krishna has been portrayed in various perspectives in different stages of life, such as an infant eating butter, a young boy playing flute, a young man in love with Radha an Gopi, a central figure in Epic Mahabharata & a friendly Charioteer giving advice to Arjuna. He has been considered the eight incarnation of Lord Vishnu. His related literature had inspired many performance arts like Indian Classical Music, Bharatanatyam, Kathakali etc. He is a Hindu God. Krishna knows he is God but he always works like a human being. He loves everything he does. He never thinks of rules. He is ready to do any work and ready to break the rule to maintain Dharma. Krishna's major contributi...

Shrikrishna-कृष्ण

 रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १४९ विषय : कृष्ण शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई संकेत स्थळ : भारतीय संस्कृतीमध्ये सर्व देवांमध्ये मला तीन देवतांचे चरित्र खूपच आवडते. त्या देवता म्हणजे भगवान शिवशंकर, गणपती आणि श्रीकृष्ण. खरोखरचं या तिघांमध्ये अशी काय लोकविलक्षण शक्ती आहे की त्याबद्दल कितीही वाचले किंवा ऐकले तरी मन भरत नाही. त्यातही भगवान श्रीकृष्णाचे चरित्र मला फारच मोहवते. याचे कारण म्हणजे गूढ आणि मोहक हे गुण एकाच वेळी असणारे त्याचे व्यक्तिमत्व फारच लोकविलक्षण आहे. म्हणूनच  त्याचे बहुआयामी व्यक्तिमत्व आणि त्याचे पराक्रम कुठल्याही संकुचित जगात सामावणे अशक्य आहे. ज्यांचा खूप मोठा व्यासंग आहे किंवा खोलवर जाऊन केलेला अभ्यास आहे, त्यांना सुद्धा त्याच्या चरित्राचे विवेचन सहजपणे करणे जमले नाही. याला कारण त्याच्या चरित्र्यात बालपणी केलेल्या लबाडया आहेत, चोऱ्या आहेत, गोपिका आहेत म्हणून रासक्रीडा आहेत, संगीत आहे, लढाई आणि पराक्रम आहेत,  राजकारण आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याच्या चरित्र्यात तत्वज्ञानाचा फार महत्वाचा भाग आहे. श्रीकृष्ण पराक्रमी आहे, शत्रुंचा न...

Maharashtratil Bolibhasha -महाराष्ट्रातील बोलीभाषा

  रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १४८ विषय : महाराष्ट्रातील बोलीभाषा शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम , मुंबई एखादी भाषा समृद्ध आहे की नाही ते पाहण्यासाठी तीन गोष्टीं महत्वाच्या असतात. त्या म्हणजे त्या भाषेतील वैचारिक क्षमता , त्या भाषेतील व्याकरण आणि त्या भाषेतील सर्व प्रकारचे साहित्य. त्यात अजून एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे ती म्हणजे त्या भाषेतील बोलीभाषा. जर एखाद्या भाषेत बोली भाषा जास्त असेल तर ती भाषा समृद्ध होण्यास मदत होते. मराठीसुद्धा अशा भाषांपैकी एक समृद्ध भाषा आहे. त्यात व्याकरण आहे ,  वैचारिक क्षमता आहे ,  सर्व प्रकारचे साहित्यसुद्धा आहे आणि जवळ जवळ या भाषेला ५४ बोलीभाषा आहेत. त्यामुळेच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात , " माझ्या मराठीचे बोलू कौतुके | परि अमृतातेही पैजासी जिंके | ऐसी अक्षरे रसिके | मेळवीन ||". खरोखरच अशा या समृद्ध मराठी भाषेतील एक समृद्ध बोलीभाषा मी माझ्या लिखाणासाठी निवडली आहे ती म्हणजे कोकणी भाषा. आमच्या घरी मराठीबरोबर कोकणी भाषासुद्धा बोलली जात असे. त्यामुळे मराठीबरोबर कोकणी भाषेवरसुद्धा आमचे प्रेम आहे. माझे शालेय शिक्षण मराठी म...

SHRAVAN श्रावण

  रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १४७ विषय : श्रावण शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई नवे रंग, नवे उमंग घेऊन भारतीय संस्कृतीचची वैशिष्ट्ये आपणास  श्रावण महिना दाखवीत असतो. संपूर्ण भारतात खास करून महाराष्ट्र, गोवा व उत्तर कर्नाटकातील भागात श्रावण हा सण फार पवित्र मानला जातो. निसर्गाची विलोभनीय रूपे उलगडून दाखवणारा, ऊन पाऊसाचा खेळ आणि  हिरवळ निर्माण करून पाचूची मुक्त उधळण करणारा हा महिना धार्मिककृत्यासाठी फारच महत्वाचा मानाला जातो. या महिन्यात भगवान शंकरासाठी प्रत्येक सोमवारी एकभुक्त व्रत आचारले जाते. मंगळवारी स्त्रियां मंगळागौरीचा उत्सव साजरा करतात. बुधवारी बुधपूजन केले जाते तर गुरुवारी दत्तभक्त भजन, पूजन व गुरुचरित्रपठण करतात. शुक्रवारी स्त्रिया लक्ष्मीची पूजा करतात. शनिवारी मारुती किंवा शनीदेवाची आराधना करतात आणि रविवारी अनेक ब्राह्मण स्त्रिया सूर्याची पूजा करताना त्यास दुर्वा वाहतात. हिंदू पंचांगाप्रमाणे हा पाचवा महिना असून चातुर्मासातील हा श्रेष्ठ महिना मानाला जातो. या महिन्यात प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत बऱ्याच देवालयात मंत्रजागर, कथापुराण सारखे कार्य...

sanskrutik Varasa-सांस्कृतिक वारसा, मी भारताचा, हा गौरव माझा

  रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १४६ विषय : सांस्कृतिक वारसा , मी भारताचा , हा गौरव माझा शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम , मुंबई कुठल्याही प्रकारचा सांस्कृतिक वारसा आपल्याला आपल्या पूर्वजांकडून मिळतो आणि तो पुढील पिढीकडे जात असतो. त्यात अनेक प्रकारच्या परंपरा असतात. त्यात अनेक बोली असतात , वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य असते , अनेक प्रकारचे संगीत आणि त्याचे सादरीकरण , सामाजिक रूढी व वेगवेगळे सणसमारंभ असतात. भारतीय सांस्कृतिक वारसा हा विविधतेने समृद्ध झालेला असा वारसा असून त्यात अनेक प्रकारचे साहित्य , संगीत , नृत्य , खेळ , भारतातील ऐतिहासिक स्थाने व तेथील इतिहास , हस्तकला , चित्रपट , नाट्य   या सारखे अनेक प्रकार येत असतात. असे म्हणतात मौर्याच्या कालखंडात साहित्य , गणित , शिक्षण , खागोल शात्र , धातूशास्त्र , वैद्यकीयशास्त्र यांची प्रगती झाली. पुढे शिक्षणासाठी नालंदा विद्यापीठाची झालेली निर्मिती , वरहमिहीर आणि आर्यभट्टचे गणित आणि खागोल शास्त्रामधील योगदान , कालिदास , विशाखादत्त , कुमारदास , हर्षवर्धन व भवभूती यांचे साहित्य क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदान , भरतमुनीं...

Alak अलक

रंग लेखणीचे परिवारउ पक्रम : अलक शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई संकेत स्थळ :https://yogeshgogwekar.blogspot.com/ कोणतीही वस्तुस्थिति विचारात न घेता किंवा एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास नसताना सुद्धा सोशल मीडियावर येणारी चुकीची माहिती आपला समाज सत्य समजून सत्य गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहे. ही गोष्ट इतिहासाचा अभ्यासक असलेल्या अनिकेतला अस्वस्थ करत आहे कारण तो जाणतो की सत्य आणि सत्य कथांमध्ये खूपच फरक असतो.