Skip to main content

Posts

Showing posts from April, 2026

महाराष्ट्र दिनानिमित्त...

महाराष्ट्र दिनानिमित्त... संकेतस्थळ: १ मे १९६० हा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याच दिवशी मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा हे सर्व मराठी प्रांत एकत्र येऊन महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. या भूमीने आपल्या सामर्थ्याच्या बळावर मराठी संस्कृती केवळ भारतभरच नव्हे, तर जगभर पोहोचवली. महाराष्ट्राचा इतिहास हा केवळ इतिहास नाही, तर तो पराक्रम, विचार आणि संस्कृती यांचा तेजस्वी वारसा आहे. रणांगणावरचे शौर्य असो, खेळाच्या मैदानावरील कर्तृत्व असो, किंवा संगीत, साहित्य, नाटक, सिनेमा, वैद्यकीय आणि वैज्ञानिक क्षेत्रातील योगदान — प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्राने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या भूमीने संतांचा वारसा दिला, विचारवंत घडवले आणि समाजाला दिशा दिली. म्हणूनच गोविंदाग्रज आपल्या महाराष्ट्र गीतात म्हणतात, "देवी ज्ञानेश्वरी करि जिथे भक्तीचा खेळ तिथेच गीतारहस्य बसवी बुद्धीचा मेळ जिथे रंगली साधीभोळी जनाईची गाणी तिथेच खेळे श्रीपादांची कलावती वाणी." हा आपला गौरवशाली भूतकाळ आहे: पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा—आज आ...

हवहवसं वाटणारं वेंधळेपण (दीर्घ लेख)

  शुभंकरोति साहित्य परिवार सप्ताह क्रमांक: २१२ विषय क्रमांक: ४ विषय: हवहवसं वाटणारं वेंधळेपण (दीर्घ लेख) शब्दांकन: योगेश गोगवेकर , माहीम , मुंबई परीक्षक: डॉ. मायाताई दि. यावलकर संकेतस्थळ: जेव्हा आपण एखाद्या माणसाला ‘वेंधळा’ म्हणतो, तेव्हा तो आपल्याला बावळट, गबाळा किंवा कोणतेही काम व्यवस्थित न करणारा वाटतो. परंतु या वेंधळेपणात एक वेगळाच प्रामाणिकपणा दडलेला असतो. त्यात निरागसता, अजाणतेपणा आणि कुठेतरी हरवलेल्या भावनांना पुन्हा सापडण्याची एक हाक असते. म्हणूनच हे वेंधळेपण कधी कधी हवहवसं वाटू लागतं. आजच्या काळात माणूस स्वतःला सिद्ध करण्यासाठी सतत एका मृगजळामागे धावत असतो. त्यासाठी तो स्वतःला इतका गुंतवून घेतो की त्याच्या आत दडलेल्या बेफिकीर वृत्तीपासून आणि निरागस, मोकळ्या मनापासून तो दूर जाऊ लागतो. स्वतःच्या कामात तो इतका गुंतून जातो की स्वतःच्या आनंदासाठी स्वतःमध्ये हरवून जाण्याचाही तो प्रयत्न करत नाही. मग तो नातेवाईकांपासून, मित्रांपासून दूर होत जातो आणि त्या नात्यांमध्येही परिपूर्णता शोधू लागतो. त्यामुळे त्याचा आनंद हरवत जातो. या वेंधळेपणाच्या संदर्भात मला माझ्या ...

२३ एप्रिल हा दिवस पुस्तक दिन - पुस्तक दिनाच्या निमित्ताने

  पुस्तक दिनाच्या निमित्ताने शब्दांकन: योगेश गोगवेकर पत्ता: माहीम , मुंबई संकेत स्थळ : मित्रांनो , दरवर्षी २३ एप्रिल हा दिवस आपण जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा करतो. हा दिवस निवडला गेला , कारण याच दिवशी महान लेखक Miguel de Cervantes यांची पुण्यतिथी , तसेच William Shakespeare यांचा जन्मदिन आणि मृत्यूदिन येतो. म्हणजेच , हा दिवस साहित्याच्या अमरत्वाचा आणि विचारांच्या अखंड प्रवाहाचा साक्षीदार आहे. पुस्तक वाचन म्हणजे केवळ अक्षरांची ओळख नव्हे ; तर तो अनुभवांचा , विचारांचा आणि जाणिवांचा एक समृद्ध प्रवास आहे. पुस्तकांशी मैत्री केली की आपण एका मर्यादित चौकटीत अडकून राहत नाही , तर आपल्या विचारांच्या कक्षा विस्तारत जातात. आपला दृष्टिकोन अधिक व्यापक होतो , आणि जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला सापडू लागतात. आजच्या काळात समाजात वाढत चाललेले ध्रुवीकरण , माणसामाणसांतील वाढते अंतर आणि कमी होत चाललेली माणुसकी , ही वास्तवता आपल्याला अस्वस्थ करते. अशा अस्थिर आणि गोंधळलेल्या वातावरणात , माणसाला स्थैर्य देणारी एकच शक्ती आहे आणि ती म्हणजे पुस्तक वाचन. स्वतःच्या मेहनतीन...