रंग लेखणीचे
परिवार
आठवडा क्रमांक :
१४८
विषय :
महाराष्ट्रातील बोलीभाषा
शब्दांकन : योगेश
गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
एखादी भाषा समृद्ध आहे की नाही ते पाहण्यासाठी तीन गोष्टीं महत्वाच्या असतात. त्या म्हणजे त्या भाषेतील वैचारिक क्षमता, त्या भाषेतील व्याकरण आणि त्या भाषेतील सर्व प्रकारचे साहित्य. त्यात अजून एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे ती म्हणजे त्या भाषेतील बोलीभाषा. जर एखाद्या भाषेत बोली भाषा जास्त असेल तर ती भाषा समृद्ध होण्यास मदत होते. मराठीसुद्धा अशा भाषांपैकी एक समृद्ध भाषा आहे. त्यात व्याकरण आहे, वैचारिक क्षमता आहे, सर्व प्रकारचे साहित्यसुद्धा आहे आणि जवळ जवळ या भाषेला ५४ बोलीभाषा आहेत. त्यामुळेच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, " माझ्या मराठीचे बोलू कौतुके | परि अमृतातेही पैजासी जिंके | ऐसी अक्षरे रसिके | मेळवीन ||". खरोखरच अशा या समृद्ध मराठी भाषेतील एक समृद्ध बोलीभाषा मी माझ्या लिखाणासाठी निवडली आहे ती म्हणजे कोकणी भाषा. आमच्या घरी मराठीबरोबर कोकणी भाषासुद्धा बोलली जात असे. त्यामुळे मराठीबरोबर कोकणी भाषेवरसुद्धा आमचे प्रेम आहे. माझे शालेय शिक्षण मराठी माध्यमातून तर महाविद्यालयीन शिक्षण इंग्रजी भाषेतून झाले असले तरी आमची कोकणी भाषेची साथ कुठेच तुटली नाही. त्यामुळे आम्हाला मराठी, इंग्रजी, हिंदी आणि कोकणी या चार भाषा सहजपणे बोलता येतात. आम्हाला त्याचा अभिमानसुद्धा आहे. कोकणी भाषा सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी निराळ्या पद्धतीने बोलली जाते. महाराष्ट्रात बोलली जाणारी मालवणी, गोव्याची कोकणी, कारवारी कोकणी आणि मंगळुरी कोकणी अशा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या उच्चारासह कोकणी भाषा बोलली जाते. तुम्ही जर फक्त गोव्याची कोकणी ऐकली तर तुम्हाला गोव्याच्या प्रत्येक गावाची भाषा वेगळी वाटणार कारण प्रत्येक बोलीभाषा तालुक्याप्रमाणे बदलत जाते. सातेरी, फोंडा, बारदेश, केपे वगैरे ठिकाणी वेगवेगळे शब्द कोकणी भाषेत आढळून येतात. अजून एक गोष्ट म्हणजे या भाषेत आदराचा शब्द फार क्वचित वापरला जातो. उदाहरण द्यायचे झाल्यास, " तू खंय रावता?", " तू बरो असा मरे?", "तू गोव्यात केन्ना पावलो?" याचा अर्थ असा आहे, " तू कुठे राहतो? ", तू बरा आहेस ना?", तू गोव्यात कधी आलास ". या सर्व गोष्टी लक्षात ठेवून मी कोकणी भाषेतून लिहिणार आहे. माझा हा प्रथम प्रयत्न आहे. कारण आजपर्यंत मी मराठी आणि इंग्रजी या दोनच भाषेत लेख लिहिले आहे. बघूया किती जमते ते.
कोकणी भाशेत साहित्य प्रकारची आवड सुरवातेसावन असली तरी कोकणी साहित्याचो पांवडो उंचावंक आसा की ना याचो सोद करपाचे थरायलें. ये काम करतांना कोकणी भाशेची उदरगीची चळवळ पळयल्यार लक्षांत आयले की अनेक लेखकांनी कोकणी साहित्याक आपल्या सृजनात्मक लेखन कलेंतल्यान गिरेस्त केल्यात. ते लेखक म्हणल्यार रवींद्र केळेकर, महाबळेश्वर सैल, दत्ता दामोदर नायक, पांडुरंग भांगी, मुकेश थळी, बा. भ. बोरकर. या मंडळीखातीर कोकणी भाशेत मानाची सुवात फावो झाल्या. लेखक समाजांत वावूरतात त्या खातीर ते समाजाचे घटक जातात आनी त्या समाजाचें पडबिंब लेखकांच्या साहित्यात दिसून येता. म्हण या लेखकांचे साहित्य समाजशास्त्रीय अध्ययन आसात. समाज एकस्वरूप केन्नाच आसना. ताचो हेर विज्ञानां संबंध आसता. समाज म्हणटकच तातूंत संस्कृतिचो आसपाव आसता. त्यानदरेंतल्यान समाज आनी संस्कृतिचो विचार केल्यार असे दिसता संस्कृती आनी सभ्यताय, संस्कृती आनी कला साहित्य संबंधातल्यान यांचो परस्पर संबंध आसा. त्याखातीर प्रत्येक साहित्याचे विवेचन करताना त्या साहित्य प्रकाराचें शास्त्रीय ज्ञान गरजेचें आसा.
रवींद्र केळेकारांची सांगाती वा ओथांबे, पांडुरंग भांगीचें उतरंचो संवसार, दत्ता दामोदर नायकाचें जाय का जुय, मुकेश थळीचें वळेसर या पुस्तकांचो संशोधन केल्यार अशे दिसता कि गोंयचो समाज, गोंयची सामाजिक परिस्थिती आनी कोकणी संस्कृतीचे खाशेलपण यां पुस्तकात सांगला. या पुस्तकातून गोंयांत राजकीय परिस्थिती कितें आशिल्ली आनी कितें जाली त्याचो व्यवस्थित विवेचन दिसून येता. अशी अनेक पुस्तके कोकणी भाशेत येऊक जाय. त्यात सामाजिक,सौमीक, इतिहासिक, राजकीय आनी भाशेविशी लेख बरे विवेचन करून येवपाक जाय. त्यांची भाशाशैली अशी जाय कि त्याचो प्रभाव समाजात पडूक जाय. कोकणी भाशा ही समाजाचेर लेगीत आसा आनी मराठी भाषेचो प्रभाव दिसता कित्याक तर कोकणी आनी मराठी यांचो खूप लागीं संबंद आसा. ख्रिश्चन समाजानं पुर्तुगल भाशेचो प्रभाव तर मुस्लिम समाजानं उर्दू भाशेचो प्रभाव कोकणी भाशेचेर हाडाला. अशे तरेच्या त्या भाशेतील शब्दांचो समूह जो एका विशेष क्रमान व्यवस्थित जावन आमच्या मनाचे विचार दुसऱ्या मेरेन पावयता वा तातूंल्यान तांकां प्रभावित, समर्थ करता. भाशा मनशांची संपत्ती आसा आनी मनशाचो भाशेकडेन संबंध पुरातन काळापासून आसा. जेन्ना मनशान ह्या धर्तरेचेर जल्म घेतलो आनी मनीस जसो जसो सभ्यताय घेवन चलपाक लागलो तशी त्याची भाशा समृद्ध आनी सुसंकृत जायत रावली. भाशा हे अभिव्यक्तीचे एक साधन आसा. म्हण लेखकांक त्यांचो विचार व्यक्त करपाक भाषा उपयोगी थारता. अशा तरेन कोकणी भाशेत वेगळे खाशेलें आसा आनी उलोपाक ही भाषा फारच गोड आसा.
कोकणी भाषेतील साहित्यातील थोडीशी ओळख दाखविण्याचा प्रयत्न मी माझ्या या कोकणी लेखाद्वारे केला आहे. कोकणी भाषेत मी पहिल्यादा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे चूकभूल माफ करावी.
Comments
Post a Comment