शुभंकरोति साहित्य परिवार
मंगळवार उपक्रम
विषय: आयुष्याला विरामचिन्ह नसते
उपक्रमप्रमुख: मा. सौ. राधिकाताई भांडारकर
शब्दांकन: योगेश गोगावेकर, माहीम, मुंबई
लेखनामध्ये
विरामचिन्हांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्णविराम, स्वल्पविराम,
प्रश्नचिन्ह यांसारखी चिन्हे वाक्यांना अर्थ, स्पष्टता आणि रचना देतात.
विरामचिन्हांशिवाय वाक्य गोंधळात टाकणारे आणि अनेकदा अर्थहीन ठरते.
त्यामुळे लेखन अधिक सुव्यवस्थित, वाचनीय आणि परिणामकारक बनते.
परंतु
जीवन हे लेखनासारखे नसते. आयुष्याला कोणतेही विरामचिन्ह नसते. ते सतत पुढे
वाहत राहते. कधी ते मंद गतीने सरकतं, तर कधी वेगाने धावते. कधी आनंदाच्या
प्रकाशात न्हालेलं असतं, तर कधी दुःखाच्या सावलीत हरवलेलं असतं. तरीही
त्याचा प्रवास कधीच थांबत नाही.
मानवी जीवनात असे अनेक प्रसंग
येतात, जेव्हा माणसाला वाटते की आता आपले आयुष्य इथेच थांबले आहे, जणू हा
एक पूर्णविराम आहे. नोकरी जाणे, आर्थिक संकट, नात्यांचा तुटणारा धागा किंवा
प्रिय व्यक्तीचा वियोग अशा प्रसंगांमध्ये मन खचून जाते. त्या क्षणी वाटते
की पुढे काहीच शिल्लक नाही. परंतु काळ पुढे सरकतो आणि हळूहळू जाणवते की तो
“पूर्णविराम” नसून केवळ “स्वल्पविराम” होता. कारण जीवन पुन्हा सुरू होते.
जसे नवा दिवस उगवतो, तसे नवे अनुभव येतात आणि आपण पुन्हा प्रवासाला लागतो.
जीवनाची
तुलना नदीच्या प्रवाहाशी केली तर हा विचार अधिक स्पष्ट होतो. नदी खडकांना
भिडते, वळणे घेते, कधी शांत तर कधी प्रचंड वेगाने वाहते; पण ती कधीही थांबत
नाही. तसंच माणसाचं जीवनही अडथळ्यांनी भरलेलं असतं, पण ते सतत पुढे जात
राहतं. निसर्ग आपल्याला हेच शिकवतो की थांबणे नाही, तर पुढे जाणे हेच
जीवनाचे खरे तत्त्व आहे.
बा. भ. बोरकर यांच्या कवितांमधून जीवनाचा
हा प्रवाहीपणा अत्यंत सुंदररीत्या प्रकट होतो. त्यांच्या काव्यातील निसर्ग,
समुद्र, वारा आणि वाटसरू यांच्या प्रतिमा सतत चालू असलेल्या जीवनप्रवासाची
जाणीव करून देतात. माणूस हा अखंड प्रवासी आहे. किनारे बदलतात, सोबती
बदलतात, पण प्रवास मात्र सुरूच राहतो. दुःख आणि आनंद हे केवळ टप्पे आहेत;
अंतिम थांबे नाहीत.
विंदा करंदीकर यांच्या कवितांमधील “देणाऱ्याने
देत जावे” ही भावना देखील जीवनाच्या प्रवाहाला अधिक अर्थपूर्ण बनवते. जीवन
म्हणजे केवळ घेणे नव्हे, तर सतत देत राहणे आहे—प्रेम, आधार, अनुभव आणि आशा
देत राहणे हेच खरे जगणे आहे. देण्याच्या या प्रवासातूनच जीवन पुढे सरकत
राहते.
माणूस अनेकदा भूतकाळाच्या आठवणींमध्ये अडकतो आणि भविष्याच्या
चिंतेत हरवतो. परंतु जीवन कधीही मागे वळून थांबत नाही. ते आपल्याला सतत
पुढे ढकलत राहते. काल आठवण बनतो, आज अनुभव बनतो आणि उद्या आशेचा नवा किरण
घेऊन येतो.
म्हणूनच आयुष्याला विरामचिन्ह नसते. ते कोणत्याही
पुस्तकासारखे एका शेवटावर थांबत नाही. प्रत्येक शेवट हा नव्या सुरुवातीचा
आरंभ असतो. कधी आपण हसत पुढे जातो, कधी डोळ्यांत अश्रू घेऊन; पण प्रवास
कधीच थांबत नाही. जीवन आपल्याला सतत सांगत असते—पूर्णविराम शोधू नकोस,
स्वल्पविराम समजून पुढे चालत राहा.
अखेर जीवनाचा अर्थ हाच आहे की
थांबणे नाही, तर सतत पुढे जाणे. कारण आयुष्य ही एक अखंड कथा आहे की जिचा
शेवट नसतो, फक्त नवीन अध्याय असतात.
याच भावनेला अधिक प्रभावीपणे मांडताना मंगेश पाडगावकर म्हणतात—
“व्यथा असो आनंद असू दे
प्रकाश किंवा तिमिर असू दे
वाट दिसो अथवा न दिसू दे
गात पुढे मज जाणे
जाणे माझे जीवन गाणे”
धन्यवाद
योगेश गोगावेकर
Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...
Comments
Post a Comment