शुभंकरोती साहित्य परिवार
सप्ताह क्रमांक : २०८
विषय क्र. : ४
विषय : सामाजिक बांधिलकी (वैचारिक लेख)
शब्दांकन : योगेश गोगवेकर, मुंबई
परीक्षक : मा. माधुरीताई वानखडे, हिंगणघाट
संकेतस्थळ :
सामाजिक बांधिलकी हे केवळ शब्द नसून ती एक महत्त्वपूर्ण जीवनमूल्य आहे. ही मूल्ये आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनुभवत असतो. आपल्या शेजाऱ्यांच्या सुख-दुःखात आपण कळत-नकळत सहभागी होतो, तेव्हा सामाजिक बांधिलकीची जाणीव आपल्याला होते. एखाद्याला मदत करणे, अपघात घडल्यास तात्काळ धावून जाणे, वादळ, पूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये अडकलेल्या लोकांना सहाय्य करणे, रक्तदान करणे या सर्व कृतींमधून आपण सामाजिक बांधिलकी जपत असतो.
समाज बदलण्याची वाट पाहणारे अनेक असतात, पण बदल घडवणारे थोडेच असतात. म्हणूनच ‘सामाजिक बांधिलकी’ या संकल्पनेची नेमकी व्याख्या करणे कठीण आहे. साध्या शब्दांत सांगायचे झाल्यास ती ‘माणुसकी’ म्हणून ओळखता येईल; परंतु हा अर्थही अपूर्णच आहे. सामाजिक बांधिलकी ही अत्यंत व्यापक संकल्पना आहे, कारण मानव हा मूलतः सामाजिक प्राणी आहे. समाजाशिवाय माणसाचे अस्तित्व अपूर्ण आहे.
समाजाकडून आपण ज्ञान, संस्कृती आणि विविध सुविधा प्राप्त करतो; त्याची परतफेड आपण कशा प्रकारे करतो, यावरच आपल्या सामाजिक बांधिलकीचे मोजमाप ठरते. ज्या व्यक्ती, संस्था किंवा उद्योजक आपल्या नैतिक जबाबदारीची जाणीव ठेवून समाजाच्या विकासासाठी योगदान देतात किंवा गरजू घटकांना मदत करतात, तेव्हा ते सामाजिक बांधिलकीचे पालन करत असतात.
याच संदर्भात “Charity begins at home” ही उक्ती अत्यंत अर्थपूर्ण ठरते. समाजासाठी काहीतरी करण्याची सुरुवात ही स्वतःपासूनच व्हायला हवी. आपण आपल्या कुटुंबात, परिसरात आणि दैनंदिन वर्तनात सकारात्मक बदल घडवू लागले, तर व्यापक समाज परिवर्तनाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. सामाजिक बांधिलकी ही मोठ्या कृतींपासून नव्हे, तर छोट्या-छोट्या सवयींपासून सुरू होते—जसे की घरात काम करणाऱ्या व्यक्तींशी सन्मानाने वागणे, मुलांना सामाजिक मूल्यांची जाणीव करून देणे, आपल्या परिसरातील स्वच्छता राखणे.
आपण ज्या शाळेत शिकलो, ज्या रस्त्यांवरून प्रवास करतो, ज्या व्यवस्थेमुळे आपले जीवन सुसह्य झाले—हे सर्व समाजाचे योगदान आहे. तरीही “मी माझ्या कष्टानेच इथवर पोहोचलो” ही भावना अनेकांच्या मनात आढळते. अशा विचारसरणीतून सामाजिक बांधिलकीचा अभाव निर्माण होतो. अशा विचारसरणीवर भाष्य करताना महात्मा गांधींचे एक वाक्य अत्यंत समर्पक वाटते: “The best way to find yourself is to lose yourself in the service of others.” या विचारातून स्पष्ट होते की, स्वतःचे खरे अस्तित्व इतरांच्या सेवेमध्ये सापडते.
काही लोकांच्या मते सामाजिक बांधिलकी म्हणजे मोठ्या प्रमाणात दानधर्म करणे किंवा धार्मिक कार्यांसाठी निधी उभारणे. मात्र हा समज अपूर्ण आहे. सामाजिक बांधिलकी ही आपल्या दैनंदिन कृतींमध्येही दिसून यायला हवी. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे, प्रामाणिकपणे कर भरणे, गरजूंना मदत करणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे या सर्व गोष्टी सामाजिक बांधिलकीचा भाग आहेत.
यासोबतच, आपण वैयक्तिक पातळीवर नेमकं काय करतो हेही तितकेच महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, दरवर्षी किमान एकदा रक्तदान करणे, आपल्या उत्पन्नातील काही भाग सामाजिक कार्यासाठी देणे, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे, वृक्षारोपणात सहभाग घेणे किंवा स्थानिक समस्यांवर नागरिक म्हणून पुढाकार घेणे अशा ठोस कृती सामाजिक बांधिलकी प्रत्यक्ष रूप देतात.
परंतु आजच्या धावपळीच्या जीवनात ‘माझं काम झालं की झालं’ ही वृत्ती वाढत चालली आहे, आणि त्यामुळे समाजातील संवेदनशीलता कमी होत आहे. वास्तव पाहता, समाजासाठी निःस्वार्थपणे काम करणारे लोक आजही बोटावर मोजण्याइतकेच दिसतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “Cultivation of mind should be the ultimate aim of human existence.” त्यांच्या मते, ज्ञान, शिक्षण आणि प्रगती ही केवळ वैयक्तिक उन्नतीसाठी नसून समाजाच्या उन्नतीसाठी असली पाहिजे, हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे.
प्रसिद्ध विचारवंत फ्रांझ काफ्का (Franz Kafka) यांच्या साहित्यातील व्यक्ती समाजात असूनही एकाकी असते आणि हे आजच्या ‘स्वतःपुरत्या मर्यादित’ जीवनशैलीचेच प्रतिबिंब आहे. “A book must be the axe for the frozen sea within us” या त्यांच्या विधानातून ते सांगतात की, आपल्या मनातील गोठलेली संवेदनशीलता जागृत झाली पाहिजे. आजूबाजूच्या सामाजिक समस्यांकडे म्हणजे गरिबी, अन्याय, विषमता, अंधश्रद्धा पाहूनही आपण निष्क्रिय राहतो, कारण आपल्या संवेदना बोथट झालेल्या असतात. त्या जागृत झाल्या, तर सामाजिक बांधिलकी आपोआप निर्माण होईल.
प्राचीन चीनी विचारवंत कन्फ्युशियस (Confucius) म्हणतात, “The strength of a nation derives from the integrity of the home.” म्हणजेच, समाज आणि राष्ट्राची उभारणी ही व्यक्ती व कुटुंबाच्या मूल्यांवर अवलंबून असते. प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली आणि नैतिकता जपली, तर समाज आपोआप सुदृढ होतो.
स्वामी विवेकानंदांनी “They alone live who live for others” असे सांगत समाजासाठी जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यांच्या मते, व्यक्तीचे जीवन तेव्हाच अर्थपूर्ण होते, जेव्हा ती इतरांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवते.
आता प्रश्न उरतो, सामाजिक बांधिलकीची जाणीव कशी वाढवायची?
यासाठी शिक्षणपद्धतीत बदल आवश्यक आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सामाजिक जबाबदारी हा विषय केवळ अभ्यासापुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरवला पाहिजे. विद्यार्थ्यांना सामाजिक उपक्रमांत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. तसेच माध्यमे, साहित्यिक आणि समाजनेते यांनीही या विषयावर सातत्याने मार्गदर्शन करावे.
तंत्रज्ञानाच्या युगात सामाजिक बांधिलकीची व्याप्ती अधिक वाढली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण प्रभावीपणे जागरूकता निर्माण करू शकतो. परंतु ही जागरूकता केवळ ‘लाईक’ आणि ‘शेअर’पुरती मर्यादित न राहता माहितीपूर्ण आणि जबाबदार असली पाहिजे. उदाहरणार्थ, सामाजिक समस्यांवर विश्वासार्ह माहिती शेअर करणे, रक्तदान किंवा आपत्कालीन मदतीसाठी योग्य संपर्क पुढे करणे, पर्यावरण विषयक मोहिमा राबवणे, चुकीच्या माहितीला विरोध करणे आणि लोकांना प्रत्यक्ष कृतीसाठी प्रेरित करणे, ही खरी सामाजिक जागरूकता आहे.
याशिवाय, समाजातील यशस्वी व्यक्तींनी पुढाकार घेऊन आदर्श निर्माण केला, तर त्याचा सकारात्मक परिणाम व्यापक प्रमाणावर होईल. उद्योजक, डॉक्टर, शिक्षक आणि सामान्य नागरिकही समाजासाठी महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत; त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा आदर्श समाजासमोर मांडणे आवश्यक आहे.
दरवर्षी किमान एका सामाजिक उपक्रमात सहभागी होणे, आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा समाजासाठी राखणे आणि स्थानिक समस्यांवर सक्रियपणे आवाज उठवणे या साध्या कृती सामाजिक बांधिलकीला प्रत्यक्ष कृतीत उतरतात.
फ्रांझ काफ्का (Franz Kafka) यांनी दाखवलेला एकाकीपणा टाळायचा असेल आणि कन्फ्युशियस (Confucius) यांच्या विचारांप्रमाणे सुदृढ समाज घडवायचा असेल, तर प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करणे आवश्यक आहे.
शेवटी, सामाजिक बांधिलकी ही कोणावर लादलेली जबाबदारी नसून ती अंतर्मनातून निर्माण होणारी जाणीव आहे. आपण समाजाकडून जे घेतो, त्यापेक्षा अधिक देण्याची वृत्ती जर प्रत्येकाने जोपासली, तर समाज अधिक समृद्ध, संवेदनशील आणि सुदृढ बनेल.
समाज बदलायचा असेल, तर सुरुवात ‘मी’पासूनच करावी लागते. ‘मी’पासून ‘आपण’कडे जाणारा प्रवासच खऱ्या सामाजिक बांधिलकीचा मार्ग आहे. कारण समाज ही कुठली वेगळी गोष्ट नाही, तो ‘आपण’च आहोत.
धन्यवाद
योगेश गोगवेकर

.jpg)
खरंय
ReplyDelete