महिला दिनाच्या निमित्ताने: देण्यानेच मिळते: मराठी स्त्रियांच्या जीवनलेखनातील प्रेरणा देणारी पुस्तके
अशा या स्त्रियांनी आपल्या आयुष्याचा प्रवास केवळ जगून थांबवला नाही, तर तो शब्दबद्ध करून समाजासमोर ठेवला. त्यांच्या लेखनातून स्त्री जीवनातील संघर्ष, कर्तृत्व, संवेदना आणि समाजाबद्दलची बांधिलकी यांचे वास्तव दर्शन घडते. या अनुभवकथनांमधून आपणास केवळ इतिहासाची किंवा व्यक्तींच्या आयुष्याची ओळख होत नाही; तर जीवनाकडे पाहण्याची एक अधिक समतोल आणि मानवी दृष्टी मिळते.
येथे मी दुर्गाबाई भागवत आणि इरावती कर्वे यांना वगळून इतर काही लेखिकांची नावे देत आहे. कारण ही दोन्ही नावे मराठी समाजात तुलनेने परिचित आहेत; परंतु अशा अनेक महत्त्वाच्या मराठी लेखिका आहेत ज्यांचे लेखन व्यापक वाचकांपर्यंत अजून पुरेसे पोहोचलेले नाही.
खाली दिलेली काही पुस्तके अशाच मराठी लेखिकांच्या आयुष्यकथांची आणि अनुभवांची साक्ष देतात. ही पुस्तके वाचताना स्त्रीजीवनातील जिद्द, त्याग आणि अंतःकरणातील सामर्थ्य यांचा प्रत्यय येतो.
१. मी भरून पावले आता- लेखिका मेहरुन्निसा दलवाई
२. मला उध्वस्त व्हायचे आहे-लेखिका मल्लिका अमर शेख
३. स्त्री-पुरुष तुलना –लेखिका ताराबाई शिंदे
४. मृगजळातील नौका-लेखिका सुशीला गोखले
५. स्नेहांकिता –लेखिका स्नेहलता प्रधान
६. गेले ते दिवस –लेखिका सत्यभामाबाई सुखात्मे
७. आमची कथा –लेखिका दुर्गाबाई देशमुख
८. माझी गोष्ट –लेखिका लीला गोखले
९. जीवन गाथा-लेखिका राधाबाई शेवडे
१०. दुहेरी शाप –लेखिका कौसल्या बसंत्री
११. इत्रनामा-लेखिका हिनाकौसर खान
१२. शोध –लेखिका काशीबाई कानिटकर
१३. अनुभव –लेखिका सुलोचना सोमण
१४. माझी स्मरणचित्रे- लेखिका अंबिकाबाई धुरंधर
१५. स्मृतीचित्रे-लेखिका लक्ष्मीबाई टिळक
१६. भारतीय स्त्री जीवन –लेखिका गीता साने
१७. जेव्हा माणूस जागा होतो-लेखिका गोदावरी परुळेकर
धन्यवाद
योगेश गोगवेकर
Comments
Post a Comment