Skip to main content

Book Review Taj Mahal Foxtrot: The Story of Bombay’s Jazz Age

 


पुस्तक परिचय : Taj Mahal Foxtrot: The Story of Bombay’s Jazz Age
लेखक : नरेश फर्नांडीस
पृष्ठे : १९२
प्रकाशक : Lustre
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
संकेतस्थळ :

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music या माझ्या इंग्रजी लेखासाठी संदर्भ शोधत असताना मला नरेश फर्नांडीस यांचे Taj Mahal Foxtrot: The Story of Bombay’s Jazz Age हे पुस्तक वाचनात आले. सखोल संशोधनावर आधारलेले हे पुस्तक जॅझ संगीताचा इतिहास सांगताना मुंबई शहराचा सांस्कृतिक विकास, भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा आणि हिंदी चित्रपट संगीतात जॅझचा झालेला स्वीकार यांचे बहुआयामी चित्र उभे करते.


१९३५ साली लिओन अ‍ॅबे या व्हायोलिनवादकाने ‘All Negro’ नावाचा जॅझ बँड मुंबईतील ताजमहाल हॉटेलमध्ये सादर केला आणि पुढील तीन दशकांपर्यंत जॅझ संगीत मुंबईच्या सांस्कृतिक विश्वाचा अविभाज्य भाग बनले. प्रारंभी उच्चभ्रू क्लब्स आणि हॉटेल्सपुरते मर्यादित असलेले हे संगीत पुढे हिंदी चित्रपटसृष्टीने स्वीकारल्यामुळे सामान्य भारतीयांच्या घराघरात पोहोचले.

या पुस्तकातून संगीताच्या माध्यमातून आधुनिकतेशी संवाद साधणारी, सतत बदलणारी आणि प्रयोगशील मुंबई उलगडत जाते. १९३५ ते १९६५ या कालखंडातील जॅझ युग, दक्षिण मुंबईतील क्लब संस्कृती, विविध देशांतील कलाकार, गायक, पत्रकार आणि इतिहासकार यांची माहिती येथे आढळते. वांशिक इतिहास, जॅझ संगीताची परंपरा, भारताचा वसाहतवाद, स्वातंत्र्यलढा आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यांचा जॅझवर झालेला प्रभाव यांचे हे पुस्तक उत्कट मिश्रण सादर करते. त्याचबरोबर बॉलीवूडच्या प्रारंभीच्या संगीताची मुळे नेमकी कुठे रुजलेली आहेत, याविषयी पडलेल्या अनेक प्रश्नांना हे पुस्तक समाधानकारक उत्तरे देते.

या पुस्तकाचे सर्वात मोठे योगदान म्हणजे गोव्यातील ख्रिश्चन समाज, अँग्लो-इंडियन आणि आफ्रिकन-अमेरिकन संगीतकारांचे अदृश्य श्रम प्रकाशात आणणे. हिंदी चित्रपट संगीताच्या इतिहासात ज्यांची नावे क्वचितच आढळतात, त्या वादकांनी आणि बँड संगीतकारांनी मुंबईच्या आधुनिक ध्वनीविश्वाला आकार दिला, हे फर्नांडीस ठळकपणे अधोरेखित करतात. आफ्रिकन-अमेरिकन संघर्षातून जन्मलेल्या जॅझ संगीताशी नाते जपत असताना या कलाकारांना भारतीय स्वातंत्र्यलढ्या बद्दल आत्मीयता होती. आफ्रिकन-अमेरिकन पियानोवादक टेडी वेदरफोर्ड आणि गोव्याचे ट्रम्पेटवादक फ्रँक फर्नांड यांनी महात्मा गांधींची भेट घेतली तेव्हा गांधीजींनी जॅझला भारतीय संगीताचा आवाजदेण्याचा सल्ला दिल्याचा उल्लेख येथे येतो. पुढे अनेक जॅझ संगीतकारांनी भारतीय स्वर वापरून हिंदी चित्रपटांसाठी अजरामर गीते साकारली. अलबेला मधील शोला जो भडके, दिल मेरा धडकेकिंवा समाधी मधील गोरे गोरे ओ बांके छोरेही त्याची ठळक उदाहरणे होत.

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी ताजमहाल हॉटेलमध्ये सॅक्सोफोनवादक मिकी कोरिया आणि ट्रम्पेटवादक चिक चॉकलेट यांच्या नेतृत्वाखालील जॅझ बँडने जे. आर. डी. टाटा आणि विजयालक्ष्मी पंडित यांच्या उपस्थितीत जन गण मन सादर केले, तेव्हा ते राष्ट्रगीत म्हणून अधिकृतरीत्या स्वीकारले गेले नव्हते. दुसऱ्या दिवशी कराची क्लबमध्ये, मुहम्मद अली जिनांच्या खास विनंतीवरून केन मॅकच्या बँडने पॉल रॉबेसन यांचे ‘The End’ सादर केले. हेच गीत जिना मुंबईतील माझगाव येथे त्यांच्या पत्नीच्या कबरीला भेट देताना गुणगुणत असत.

जॅझ हे मुळात आफ्रिकन-अमेरिकन संघर्षातून जन्मलेले संगीत असले, तरी मुंबईत ते वसाहतवादी काळातील हॉटेल्स, क्लब्स आणि उच्चभ्रू मनोरंजन विश्वात फुलले. गोवन ख्रिश्चन, अँग्लो-इंडियन आणि कृष्णवर्णीय संगीतकारांनी शहराचा आधुनिक सूर घडवला; मात्र इतिहासात त्यांची नावे टिकली नाहीत. चित्रपट संगीतामध्ये गायक आणि संगीतकार अजरामर झाले, पण वादक, बँड सदस्य आणि क्लब संगीतकार विस्मरणात गेले. वर्ग, वंश आणि सांस्कृतिक सत्तासंबंध यांमुळे हे विस्मरण घडले, असे लेखक सूचित करतात. स्वातंत्र्यानंतरच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाने देशीआणि शुद्धकलांना प्राधान्य दिल्यामुळे जॅझ सारखी संकरित कला मागे पडली. त्यामुळे जॅझचा ऱ्हास हा केवळ अभिरुचीतील बदल नव्हता, तर राजकीय आणि सांस्कृतिक निवडींचा परिणाम होता.

Taj Mahal Foxtrot चे लेखन शैलीतील वैशिष्ट्य म्हणजे त्याची प्रभावी कथनात्मकता. मुलाखती, आठवणी, किस्से आणि व्यक्तिरेखांच्या माध्यमातून उभा राहणारा हा इतिहास वाचकाला सहज गुंतवतो. संकल्पनांची जडजवाहीर मांडणी टाळून फर्नांडेस एक जिवंत, मानवी इतिहास मांडतात. त्यामुळे हे पुस्तक मराठी वाचकांनाही जवळचे वाटते. वाचनादरम्यान ताजमहाल हॉटेल केवळ वसाहतवादी वैभवाचे प्रतीक न राहता एक सांस्कृतिक संगमस्थान बनते, जिथे वंश, वर्ग आणि राष्ट्राच्या सीमा काही काळ संगीताच्या तालावर विरघळतात. फर्नांडीस म्हणतात, संस्कृती म्हणजे केवळ टिकून राहिलेल्या परंपरा नव्हेत; काही संस्कृती क्षणिक असतात, पण त्या शहराच्या आत्म्यावर खोल ठसा उमटवून जातात.


हे पुस्तक अशा एका संगीत संस्कृतीचा मागोवा घेते, जी काही दशकांत फुलली, मुंबईच्या आत्म्याला आकार देऊन गेली आणि नंतर हळूहळू विस्मरणात गेली. म्हणून Taj Mahal Foxtrot आपल्याला विचार करायला  लावते की आपल्या सांस्कृतिक इतिहासात कोणाचे सूर जपले जातात आणि कोणाचे हरवून जातात?

धन्यवाद,
योगेश गोगवेकर


Comments

  1. विश्लेषण अगदी रंजकतेने लिहिलं आहेस .
    त्यामुळे लेख कुठेही कंटाळवाणा नाही.
    उलट पुस्तक वाचण्याची उत्कंठा निर्माण होते.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...