Skip to main content

The Closing of American Mind by Allan Bloom द क्लोजिंग ऑफ अमेरिकन माइंड: हाऊ हायर एज्युकेशन हॅज फेल डेमोक्रसी: अँड इम्पॉवरिश्ड द सोल्स ऑफ टुडेज स्टुडंट्स



विषय ; पुस्तक परिचय

पुस्तकाचे नाव : द क्लोजिंग ऑफ अमेरिकन माइंड: हाऊ हायर एज्युकेशन हॅज फेल डेमोक्रसी: अँड इम्पॉवरिश्ड द सोल्स ऑफ टुडेज स्टुडंट्स
लेखक : ऍलन ब्लूम
प्रकाशक : Simon and Schuster Paperbacks New York NY10020
पृष्ठे : ३९३
शब्दांकन : योगेश गोगवेकर
संकेतस्थळ :

जेव्हा डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली तेव्हा अमेरिकेने आपल्या राजकारणात अनियंत्रण सत्तेचे धोकादायक वळण घेतल्याचे वाटू लागले. या अनियंत्रण सत्तेचे भूत आता अमेरिकेला खूपच त्रास देऊ लागल्याची जाणीव होत आहे. जेकब एस. हॅकर आणि पॉल पिअर्सन या दोन विद्वानांनी ट्रंप यांच्या राजकारणाचे वर्णन करताना “plutocratic populism” हे शब्द वापरले आहेत. जेव्हा एखादा समाज एखाद्या श्रीमंत व्यक्तींकडून नियंत्रीत केला जाणार असेल तेव्हा  ‘plutocratic’ हा शब्द वापरला जातो. जेव्हा असे शब्द देशाच्या राजकारणात वापरले जातात तेव्हा एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे त्या देशाच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत अनिष्ट निर्माण होण्याची भीती असते. म्हणूनच लोकशाहीवादी माणसे अशा प्रकारच्या पद्धतीला विरोध करतात.    

डोनाल्ड ट्रंप हे लोकशाहीवादी नसून त्यांची काम करण्याची पद्धत एकाधिकारशाहीची आहे हे माहित असून सुद्धा अमेरिकन जनतेने परत डोनाल्ड ट्रंप यांना निवडून का दिले ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे फार मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती हाताळणे कठीण होऊन बसली आहे. त्याचप्रमाणे कौशल्य आणि मुत्सद्देगिरीचा अंत झाल्यासारखे वाटत आहे. ही गोष्ट नुसती अमेरिकेत होत आहे असे नाही तर अनेक देशात असा प्रकार पाहावयास मिळत आहे. जर आपण इतिहासाच्या मुळापर्यंत गेल्यास एक गोष्ट आपल्याला जरूर जाणवेल की प्लुटोक्रॅटिक पॉप्युलिझमची सुरुवात ही डोनाल्ड ट्रंपमुळे झाली नसून ती गेल्या चार पाच दशकांपासून अमेरिकेत तसेच अनेक देशात पसरत होती. त्यामुळे सामाजिक ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात होण्यास वाव मिळत गेला आणि लोकशाही राजवटीला धोका निर्माण होऊ लागला. हा धोका तयार होत असताना सुद्धा आपल्याला एक गोष्ट आढळून येत आहे ती म्हणजे कुठल्याही देशातील उच्च शिक्षण व्यवस्थासुद्धा लोकशाही राजवट वाचविण्यास असमर्थ ठरत आहे.

या विचित्र क्षणी मला महान अमेरिकन तत्वज्ञ  ऍलन ब्लूम लिहिलेले "द क्लोजिंग ऑफ अमेरिकन माइंड: हाऊ हायर एज्युकेशन हॅज फेल डेमोक्रसी: अँड इम्पॉवरिश्ड द सोल्स ऑफ टुडेज स्टुडंट्स" या पुस्तकाची आठवण येत आहे. १९८७ मध्ये लिहिलेले हे पुस्तक आजच्या जगासाठी देखील उपयुक्त आहे असे मला वाटते म्हणून या पुस्तकाचा परिचय करून देण्याचा मी प्रयत्न करीत आहे.

ऍलन ब्लूम यांनी लिहिलेले हे पुस्तक असा युक्तिवाद करते की अमेरिकेतील सर्व विद्यापीठांनी टीकात्मक विचारसरणी आणि नैतिक स्पष्टता जोपासण्याचे त्यांचे ध्येय सोडून दिले आहे. त्यामुळे अमेरिकेत मोठ्या प्रमाणात बौद्धिक आणि सांस्कृतिक गोष्टींची घसरण झाल्याचे दिसत आहे. १९८७ साली लिहिलेले हे पुस्तक राजकीय शुद्धता किंवा वेगवेगळ्या प्रकारची सांस्कृतिक पद्धती अमेरिकेत न घडवता, अमेरिका खंडित सापेक्षतावादाचा दृष्टीकोन आत्मसात करून लोकशाही समाजाचा पाया खराब करीत असल्याचा दावा या पुस्तकात लेखक ऍलन ब्लूम करीत आहे. हा दावा मांडताना लेखक म्हणतात की अमेरिकेतील विद्यापीठे व्यवसाहिक पद्धतीने विचार करून अभ्यासाची आणि विचारांची चौकट ठरवत आहे ज्यात तात्विक विचारांना तिलांजली देऊन वरवरच्या विचारांना प्राधान्य देत असल्याचे दिसत आहे. अशा सापेक्षवादांमुळे उदारमतवादी विचारांचा रास होऊन विद्यार्थ्यांना आव्हानात्मक विचारशैली निर्माण करणे जमत नाही.

या पुस्तकातील एक धडा असा आहे की तो सापेक्षवाद किती वाईट आहे आणि तो बौद्धिकदृष्ट्या विद्यार्थांना दूर कसा  ठेवतो याचे विश्लेषण करतो. हे विश्लेषण करीत असताना लेखक म्हणतो की  विद्यार्थांना चांगले आणि वाईट यातील फरक करण्यास जमत नाही त्यामुळे ते मानवी जीवनातील होणाऱ्या प्रश्नाची गुंतागुंत सोडविण्यास ते असमर्थ ठरतात. याचा अर्थ असा होतो की हा सापेक्षवाद विद्यार्थांना सक्षम आणि उत्तम विचारवंत बनवू शकत नाही. स्वतःची संस्कृती मोठी आणि चांगली असून दुसऱ्याची संस्कृती आम्हाला नको असे सांगत अनेक विद्यापीठांनी प्लेटो, शेक्सपियर आणि रुसो यांच्या सारख्या पाश्चात्य संस्कृतीच्या महान कार्यांची ओळख विद्यार्थांना करून देण्यास नाकारले आहे. म्हणून विद्यार्थी उदारमतवादाला मोकळेपणाची उपमा देऊन त्यावर टीका करीत राहतात हे सांगून ब्लुम म्हणतात की शिक्षण जेव्हा एखाद्या विचारसरणीला मोठे करते तेव्हा लोकशाहीतील विचार करण्याची तर्कसंगत कमी होत जाते.

इथे लेखक अजून एक दावा करताना विद्यार्थांना ग्रंथाच्या अभ्यासाकडे परत येण्याचे आव्हान करतात. त्यासाठी ते अवांतर वाचनाची गरज असल्याचे सांगतात. त्यांच्या मते विद्यार्थांना आवश्यक असलेली बौद्धिक पात्रता आणि विचार करण्याची नैतिक गोष्टी ग्रंथच प्रदान करू शकतात. ऍलन ब्लूम म्हणतात की ग्रंथ न्याय, प्रेम आणि सत्य या बद्दलच्या सार्वत्रिक प्रश्नांना तोंड देण्यासाठी समर्थ बनवितात आणि आत्मपरीक्षण करून टीकात्मक विचार करण्यास शिकवितात.  

याच अर्थ या पुस्तकाचे वर्गीकरण हे शिकण्याचे परिणाम विकसित करण्यात मदत करण्यासाठी एक शक्तिशाली साधन आहे कारण ते शिकण्याच्या प्रक्रियेचे स्पष्टीकरण देते. एखाद्या प्रक्रियेचे मूल्यांकन करण्यासाठी, तुम्ही तिचे विश्लेषण केलेच पाहिजे असे ब्लूमचे म्हणणे आहे. त्यामुळे अनोख्या ज्ञानाची भर पडण्यास मदत होते.

हे पुस्तक परत एकदा वाचताना मन खूप अस्वस्थ होत होते कारण आज जगामध्ये निर्माण झालेल्या समस्या या पुस्तकात मांडलेल्या विचारांशी तंतोतंत जुळत असल्याचे जाणवते. उदारमतवादी लोकशाहीत सर्व प्रकारच्या आधुनिक दृष्टीकोनाला वाव असतो. त्यातील कल्पना सर्व समाजाला एकत्र करून चांगले जीवन जगण्याची संधी असते. त्यामुळे कविता, साहित्य, कला, तत्वज्ञान इत्यादी मधून सत्य शोधून सांगणे सोपे होत जाते कारण या सर्व गोष्टी माणसाच्या वैयक्तिक अभिरुचीचा एक भाग झाला आहे. त्यासाठी मानवी जीवनात मोकळेपण असायला हवा कारण मोकळेपणा आम्हाला तर्क वापरून चांगले शोधण्याची परवानगी देतो. पण या मोकळेपणाचा वापर ध्रुवीकरण करण्यासाठी वापरला तर त्याचे परिणाम गंभीर होण्याची शक्यता हे पुस्तक सांगते.

ऍलन ब्लूम यांनी हे पुस्तक  खूप आकर्षक पद्धतीने लिहिल्यामुळे वाचताना हा विषय कंटाळवाणा होत नाही. लेखनामध्ये तात्विक खोली आणि तीक्ष्ण सांस्कृतिक भाष्य यांचे खूप छान मिश्रण आले आहे, त्यामुळे ब्लुम यांनी लेखकाने शिक्षणाच्या उद्देशाबद्दल आणि चांगल्या समाजाच्या स्वरूपाबद्दल जे प्रश्न शास्त्रीय आधार घेऊन उपस्थित केले आहे, त्यांचे अर्थ निट समजून घेता आले पाहिजे. तरीसुद्धा इथे एक गोष्ट जाणवते ती म्हणजे ब्लुम सर्व विद्यार्थांना एकाच मापात तोलून सर्वाना म्हणजे सगळ्या विद्यार्थांना सापेक्षवादी ठरवतात आणि विद्यार्थांच्या विविधतेकडे व नागरी हक्कांकडे दुर्लक्ष करतात. या पुस्तकाची अजून एक गोष्ट खटकते ती म्हणजे हे पुस्तक फक्त समस्या मांडते पण त्यावरील उपाय सांगत नाही.असे जरीअसले तरी हे पुस्तक उच्चशिक्षणाच्या स्थितीबद्दल व्यापक दृष्टीकोन तयार करण्यास मदत करते.

द क्लोजिंग ऑफ द अमेरिकन माइंडहे ऍलन ब्लूम यांनी लिहिलेले पुस्तक शिक्षण, संस्कृती आणि तत्वज्ञान या विषयात रस असणाऱ्यांना एक महत्वाचा ऐवज आहे. या पुस्तकातील काही विचार जरी जुने वाटत असले तरी ते कुठल्याही काळात विचार करण्यास प्रवृत्त करणारे आहे. या पुस्तकात सापेक्षवादावर टीका केले असून तो विद्यार्थांनी सोडून परत शास्त्रीय दृष्टीकोन स्वीकारावा यासाठी लेखक विद्यार्थांना आव्हान करीत आहे. इथे लेखक म्हणतो की शिक्षणाचा उपयोग लोकशाही समाज टिकून ठेवण्यासाठी झाला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारच्या ध्रुवीकरणापासून सावध राहायला शिक्षणाचा उपयोग व्हायला पाहिजे.

ऍलन डेव्हिड ब्लूम हे अमेरिकन तत्ववेत्ता आणि शिक्षणतज्ञ होते आणि फार काळ ते शिकागो विद्यापीठात शिकवत होते. त्यांचे हे पुस्तक समकालीन विद्यापीठाचे टीकात्मक विश्लेषण असून त्यांनी त्यात तत्वज्ञान आणि मानवतेच्या हालचालीवर टीका केली आहे. हे सर्व समजण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचले पाहिजे.

धन्यवाद
योगेश गोगवेकर

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...