शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
आज जागतिक पुस्तक दिन. आजचा दिवस हा लेखक आणि पुस्तकांना समर्पित केलेला दिवस. हा दिवस साजरा करण्याचे मुख्य कारण म्हणजे लेखकांच्या प्रति आदर व्यक्त करून लहान मोठे सर्वांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे. पुस्तक वाचनाचा उत्सव साजरा करण्यासाठी 23 एप्रिल हा दिवस घेण्याचे कारण म्हणजे ह्या दिवशी लेखक Miguel De Cervantes यांची पुण्यतिथी त्याचप्रमाणे विल्यम शेक्सपियर यांचा जन्मदिन आणि मृत्यूदिन.
पुस्तक वाचन म्हणजे अनेकविध अनुभव घेणे. पुस्तकांशी मैत्री केलीत तर आपण एका ठराविक गोष्टीपुरते मर्यादित न राहता आपण आपल्या कक्षा रुंदावत नेतो. त्यामुळे आपला दृष्टिकोन बदलण्यास मदत होते आणि अनेक समस्येवर मात करण्यासाठी मार्ग सापडतो. पुस्तकेच आपले चांगले मित्र आहेत कारण ज्ञानाच्या अनेक शाखा आपल्यासाठी ते उपलब्ध करतात.
पुस्तक वाचन माझ्यासाठी खुप महत्वाचा आणि निकटचा विषय आहे. वाचनाने ज्ञानप्राप्ती तर होतेच पण मनोरंजनसुद्धा होते. त्यातून बौद्धिक आणि मानसिक विकाससुद्धा होतो. आजच्या सोशल मीडियावर दिल्याजाणाऱ्या चुकीच्या गोष्टी सहजपणे लक्षात येतात. म्हणून सुप्रसिद्ध लेखक W Somerest Maugham म्हणतात, " पुस्तकातून दुसरे तिसरे काहीही नसले तरी एका चांगल्या वाक्यासाठी वाचले पाहिजे. कारण थोर ग्रंथकार तुमचे विचार घडवितात आणि तुमच्या जीवनाला वेगळा आचार देतात".
पुस्तकेच आपली चांगले मित्र आहेत. म्हणून सफदर हाश्मी आपल्या एका कवितेत म्हणतात,
किताबे करती है बाते
बीते जमानों की
दुनिया की, इन्सानों की
आज की, कल की.....
क्या तुम नही सुनोगे
इन किताबो की बाते?
किताबे कुछ कहना चाहती है |
तुम्हारे साथ रहना चाहती है ||
जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्या.
धन्यवाद
योगेश गोगवेकर

Comments
Post a Comment