Skip to main content

International Women's Day 2025 जागतिक महिला दिन २०२५

 

संविधान बनत असताना महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या पंधरापैकी अकरा महिला यांना महिला दिनाच्या दिवशी त्रिवार सलाम


जागतिक महिला दिन  २०२५

आपणास माहित आहे की क्लारा जेटकीन यांनी 1910 साली कोपनहेगनमध्ये झालेल्या काम करणाऱ्या महिलांसाठीच्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत जागतिक महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. त्या परिषदेत 17 देशांच्या 100 महिला सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर 1911 साली ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झरलँड मध्ये जागतिक महिला दिन सर्वप्रथम साजरा करण्यात आला होता. सुरुवातीला कोणतीही तारीख महिला दिन साजरी करण्यासाठी निश्चित केली नव्हती पण १९१७ मध्ये पहिल्या महायुद्धाच्या वेळेला रशियात महिलांनी 'ब्रेड आणि पीस' आंदोलन करून सम्राट निकोलासला राज्यकारभार सोडण्यास भाग पाडले. त्यावेळी रशियात वापरल्या जाणाऱ्या ज्युलिअन कॅलेंडरप्रमाणे तारीख होती २३ फेब्रुवारी आणि ग्रेगरियन कॅलेंडरनुसार तारीख 8 मार्च होती. म्हणून दरवर्षी महिला दिन ८ मार्च रोजी साजरा केला जातो. पुढे १९७५ पासून संयुक्त राष्ट्रांनी हा एक वार्षिक उत्सव म्हणून थीमसह साजरा करायला सुरुवात केली आणि जागतिक महिला दिनाला अधिकृत मान्यता मिळाली.

यावर्षी म्हणजे ८ मार्च २०२५ ला येणाऱ्या महिला दिनाची थीम आहे, "सर्व महिला आणि मुलींसाठी: हक्क, समानता, सक्षमीकरण" (For All Women and Girls: Rights, Equality, Empowerment)

जेव्हा एखादी स्त्री म्हणते की ती पूर्णपणे स्वतंत्र आहे तेव्हा हे शब्द खूपच सकारात्मक आणि सशक्त वाटतात. याचा अर्थ असा होत नाही की ती व्यक्ती स्त्रीवादी आहे आणि त्या व्यक्तीला कोणत्याही पुरुषाची गरज नाही. स्वतंत्र स्त्रीवादी असणे म्हणजे काही पुरुषांपासून मुक्तता हवी किंवा पुरुषांचे अस्तित्व सूडबुद्धीने खतम करणे असा नसून स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे त्या स्त्रीला आपले विचार व्यक्त करण्यासाठी कोणतेही निर्बंध नसणे किंवा कोणतेही काम स्वतःच्या आवडत्या पद्धतीने करण्याची क्षमता असणे असा आहे.  

आपले स्वतंत्र मत व्यक्त करताना कोणत्याही स्त्रीला  लिंग-आधारित हिंसाचार, आर्थिक असमानता आणि राजकीय प्रतिनिधित्वाचा अभाव यासारख्या मुद्यांचा सामना करावा लागू नये म्हणूनच प्रत्येक स्त्री, मग ती महिला असो किंवा मुलगी , तिला सक्षम बनणे जरुरीचे आहे. त्यासाठी त्या स्त्रीकडे आत्मविश्वास हवा आणि मत मांडण्याचे धैर्य हवे. यात स्त्रीला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तिचे स्वातंत्र्य तिच्या कोणत्याही नातेसंबंधावर अवलंबून नसून ते तिच्या ताकदीवरच अवलंबून असते.

आजची परिस्थिती २० वर्षापेक्षा खूप वेगळी आहे. आज बऱ्याच स्त्रिया सशक्त आणि स्वतंत्र आहे. त्यांच्या स्वतंत्र विचारांना प्रोत्साहन देणारे अनेक घटक आहेत. अनेक पुरुष विचावंतसुद्धा अशा स्वतंत्र विचारसरणी असलेल्या स्त्रियांचे महत्व मान्य करताना दिसत आहेत. चिकाटी, विश्वास, स्वाभिमान, आत्मविश्वास आणि जागृत सर्जनशिलता हे विशेष गुण स्वतंत्र स्त्रियांना नवीन विचार मांडण्यास सक्षम करतात आणि सकारात्मक पद्धतीने विचार करून अनेक संकटांना तोंड देण्यास तयार करतात.

त्यासाठी २०२५ मधील थीम जगभरातील महिला आणि मुलींच्या हक्कांसाठी सर्वात प्रगतीशील आणि व्यापकपणे मान्यताप्राप्त अशी ब्लूप्रिंट आहे जी महिलांना सर्वप्रकारचे वैज्ञानिक शिक्षण घेण्यास आणि तंत्रज्ञानाद्वारे चांगले आरोग्य व आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत करेल. त्यामुळे महिलांचा राजकीय सहभाग वाढून त्यांच्यावरील  हिंसाचाराचे उच्चाटन होईल. डिजिटल तंत्रज्ञानाच्या शिक्षणामुळे त्यांना भेदभाव आणि लैगिक शोषणा विरुद्ध लढा उभारणे सोपे जाईल.  तेव्हा आपण सर्व स्त्री पुरुषांनी एकत्र येऊन सर्व महिला आणि मुलींचे हक्क वाढविण्यास मदत करूया त्यामुळे लिंग समानतेला प्रोत्साहन मिळून महिला आणि मुली यांना चांगले शिक्षण मिळेल आणि त्या जागतिक नेतृत्व करण्यास सक्षम ठरतील.  

इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे भारतात खास करून महाराष्ट्रात स्त्रियांना शिक्षण देवून त्यांना सक्षम बनविण्याचे काम दिडशे वर्षापूर्वी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पहिल्यांदा केले. त्याचा बोध घेऊन पुढे ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष समानतेसाठी पुरुषप्रधान संस्कृती विरुद्ध बंड केले आणि स्त्रियांना सर्व कामात सक्षम बनविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच अनेक स्त्रिया भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात उतरल्या आणि पुढे देश स्वतंत्र झाल्यावर भारतीय राज्यघटना बनवताना पंधरा महिलांनी सुद्धा महत्वाचे योगदान दिले त्यामुळे भारतीय संविधान महत्वाचा ऐवज ठरला. त्या पंधरा महिला आहेत अम्मू स्वामीनाथन, दक्षिणायनी वेलायुधन, बेगम एजाज रसूल, दुर्गाबाई देशमुख, हंसा जीवराज मेहता, कमला चौधरी, लीला रॉय, मालती चौधरी, पूर्णिमा बॅनर्जी, राजकुमारी अमृत कौर, रेणुका रे, सरोजिनी नायडू, सुचेता कृपलानी, विजलक्ष्मी पंडित, ॲनी मस्करीन.

या सर्व महिलांनी महत्वपूर्ण दिलेल्या योगदानाबद्दल महिला दिनाच्या दिवशी त्रिवार सलाम.

सर्व स्त्रियांना मग ती महिला असो वा मुलगी त्यांना महिला दिनाच्या शुभेच्या.

धन्यवाद
योगेश गोगवेकर

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...