Skip to main content

The Indian Constitution Cornerstone of a Nation by Granville Austin-पुस्तक परीक्षण




विषय: पुस्तक परीक्षण
पुस्तकाचे नाव: द इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॉर्नरस्टोन ऑफ अ नेशन
लेखक: ग्रेनविल ऑस्टिन (Granville Austin)
प्रकाशक: ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस
पाने: ४२१
किमत: रुपये ४२०
शब्दांकन : योगेश गोगवेकर

२६ जानेवारी १९५० साली भारत प्रजासत्ताक देश झाला. या दिवशी भारताने स्वतः तयार केलेली राज्यघटना अंमलात आणली. भारतीय लोकांच्या संवैधानिक गरजा लक्षात घेऊनच ही राज्यघटना सक्षमपणे बनविली गेली. हे संविधान बनविताना विधीमंडळाच्या अनेक सदस्यांचे योगदान तर होते पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान फार मोठे होते. म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानले जाते. या संविधानाच्या मूळ प्रस्तावनेत न्यायस्वातंत्र्यसमता आणि बंधुत्व यांवर भर देऊन भारताची एकता आणि अखंडता निश्चित केली गेली. हे संविधान संसदीय लोकशाही स्वीकारते आणि विधिमंडळकार्यपालिकान्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे अशा चार लोकशाही स्तंभाचे स्वातंत्र्य प्रस्थापित करते. त्याचप्रमाणे न्यायमूर्तीनी न्याय देताना कुठल्याही प्रकारचा पक्षपातीपणा करू नये म्हणून राज्यघटना न्यायमूर्तीना घटनात्मक शपथ घेण्यास लावते. म्हणूनच भारतीय संविधान भारतीय लोकांसाठी फार महत्वाचा दस्तऐवज आहे आणि हा दस्तऐवज येत्या २६ जानेवारी २०२५ रोजी ७५ वर्षे पूर्ण करणार आहे.


भारत हा अनेक प्रकारची विविधता असलेला देश आहे. ज्यात वेगळी संस्कृतीवेगवेगळ्या भाषावेगवेगळे धर्मप्रत्येक प्रांताचे वेगळे खाद्य प्रकार आणि पोशाख असे अनेक प्रकार असलेल्या देशात हे संविधान ७५ वर्षे पूर्ण करीत आहेही फार महत्वाची गोष्ट आहे. हे संविधान यशस्वी करण्याचे सर्व श्रेय आपण भारतीय जनतेला दिले पाहिजे. मुलभूत हक्कसंघराज्य विरुद्ध एकात्मक सरकारभाषा आणि धर्मअल्पसंख्यांकांचे हक्क यावर ही राज्यघटना देशाला गेली ७५ वर्षे मार्गदर्शन करीत आहे. म्हणून मला नेहमीच या गोष्टींचे कुतूहल वाटत होते की अशी राज्यघटना कशी काय लिहिली गेली असेल. हे करीत असताना कोणत्या महत्वाच्या गोष्टी विचारात घेतल्या गेल्या होत्या. सर्व प्रथम संविधान हवे असे कोणी सांगितले. त्यानंतर संविधान सभेची स्थापना कशी केली गेली आणि त्यात कोण सदस्य होते. संविधानाचे प्रत्येक कलम बनविताना कशा प्रकारची मते मांडली गेली. थोडक्यात म्हणायचे झाल्यास असे म्हणता येईल की संविधान सारखे महत्त्वाचे दस्तऐवज तयार करतानाचा इतिहास काय होता आणि अशक्य गोष्टी शक्य करण्याऱ्या सदस्यांचे भूतकाळ व वर्तमानकाळाबद्दल काय उद्दिष्टे होती हे जाणून घ्यावे असे वाटत होते.


या सर्वांचा शोध घेत असताना माझी भेट सुप्रसिद्ध इतिहासकार आणि राजकीय विश्लेषक रामचंद्र गुहा यांच्या मुंबई येथे एका कार्यक्रमाच्या दरम्यान झाली. जेव्हा मी त्यांना भारतीय संविधान बनत असताना घडलेला इतिहास वाचायची इच्छा आहे असे सांगितलेतेव्हा त्यांनी मला ग्रेनविल ऑस्टिन यांनी लिहिलेले, ‘द इंडियन कॉन्स्टिट्यूशन कॉर्नरस्टोन ऑफ अ नेशन’ हे पुस्तक वाचण्यास सांगितले. मग हे पुस्तक मी विकत घेऊन माझ्या संग्रही आणले. जेव्हा हे पुस्तक मी वाचले तेव्हा एक गोष्ट नक्कीच जाणविली ती म्हणजे भारतीयांना स्वबळावर संविधान बनविण्याची फार गरज होती. भारताने स्वतःचे संविधान बनविले पाहिजे असे भारतीय कम्युनिस्ट चळवळीचे प्रणेते आणि लोकशाहीचे पुरस्कर्ते मानवेंद्र रॉय यांनी पहिल्यांदा सांगितले आणि त्यांनीच भारतीय संविधान सभेची कल्पना १९३४ रोजी मांडली. पुढे भारत स्वतंत्र्य झाल्यानंतर २९ ऑगस्ट १९४७ रोजी भारतीय संविधान सभेची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर राज्यघटना कशी बनत गेली हा महत्वाचा राजकीय इतिहास या पुस्तकात ग्रॅनविल ऑस्टिन यांनी लिहिलेला आहे आणि हे लिहित असताना ग्रेनविल ऑस्टिन संविधान सभेच्या सर्व सदस्यांच्या कार्यांची आणि योगदानाची माहिती थोडक्यात सांगतात.


हे पुस्तक सर्व भारतीयांनी भारताची राज्यघटना आणि त्याची मांडणी समजून घेण्यासाठी नक्कीच वाचले पाहिजे. त्यामुळे भारतीय संविधान समजून घेण्यास खूप मदत होईल. जी माणसे या क्षेत्रात काम करतात त्यांना घटनात्मक रचने बद्दल बरीच माहिती मिळू शकेल. या पुस्तकात लेखकाने प्रत्येक पानावर तळटीप दिलेली असून परिशिष्टसंदर्भ ग्रंथ आणि सदस्यांचे चरित्र अशाप्रकारे दिले आहे की सामान्य माणसालासुद्धा हे पुस्तक सहज समजण्यात मदत होते. इथे एक गोष्ट नमूद केली पाहिजे ती म्हणजे या पुस्तकाचे आकलन होण्यासाठी प्रत्येक वाचकाला वाचण्याची भरपूर वेळ द्यावा लागेल. हे पुस्तक वाचताना असे जाणवते की पंडित नेहरूसरदार पटेलराजेंद्र प्रसाद आणि डॉ आंबेडकर यांचा प्रभाव संविधान बनविताना खूपच जाणवतोतरीसुद्धा ते आपल्या इच्छेची अंमलबजावणी इतर सदस्यांच्या सहमती शिवाय करीत नाही. म्हणून लेखक म्हणतात की जरी या संविधानाचे मूळ विदेशी असले तरीही राज्यघटनेतील महत्वाचा भाग बहुमताच्या आधारे ठरवला गेला नसून विधीमंडळाची संमती घेऊन ठरवला गेला आहे. त्याप्रमाणे १९३५ च्या कायद्यातील अनेक कायदे संविधानात का घेतले आहेत याची चर्चासुद्धा या पुस्तकात आली आहे.


लोकशाहीचा दृष्टीकोनासाठी प्रौढ मतधिकार कसा सुरु करण्यात आलालोकांच्या मुलभूत हक्कांसाठी कोणत्या मार्गदर्शक तत्वांची मांडणी केली गेलीलोकशाहीचे सामर्थ वाढविण्यासाठी आणि लोकशाहीची संरचना करण्यासाठी उत्तम प्रकारे केलेली कार्यकारणी पद्धतराजकीय आणि सामाजिक ऐक्य वाढविण्यासाठी अल्पसंख्यांकासाठी कायद्यात केलेली तरतूद त्याचप्रमाणे दलित अनुसूचित जमातीला कायद्याद्वारे प्रदान केलेले आरक्षणसर्वाना निपक्षीय न्याय मिळवून देण्यासाठी निर्माण केलेली स्वतंत्र न्यायपालिकास्वतंत्र्य कार्यपालिकालोकांच्या प्रश्नांबद्दल विचार करण्यासाठी निर्माण केलेली संसद आणि प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य असे अनेक प्रकार भारतीय संविधानात कसे आणले गेले याचे वर्णन खूप छानपणे केले आहे. यातील महत्वाचा भाग म्हणजे राष्ट्रीय भाषा प्रकरणावर मनोरंजन पद्धतीने केलेले लिखाण आहे. राष्ट्रीय एकात्मतेच्या नावाखाली एकच भाषाखास करून हिंदी भाषालोकांवर लादण्यासाठी संविधान सभेचे उत्तर भारतीय सदस्य कसे प्रयत्न करित होते याचे दाखले देत लेखक म्हणतात की हिंदी भाषा लोकांवर बहुमताच्या जोरांवर लादता आली असती पण त्याबाबत हिंदी भाषिक (काही अपवाद) सोडल्यास इतर भाषिकांचे एकमत नव्हते. त्यामुळे हा भारतीय संघराज्याला धोका निर्माण झाला असता. शेवटी हिंदी ही राष्ट्रीय भाषा न राहता इंग्रजी बरोबर अधिकृत भाषा म्हणून राहील अशी तरतूद संविधान सभेने केली,  याचा इतिहास या पुस्तकात सविस्तर पद्धतीने आला आहे.


ग्रेनविल ऑस्टिन यांचा जन्म १९२७ रोजी अमेरिकेत झाला. त्यांचे प्रारंभिक शिक्षण  नॉर्विचव्हरमाँटयूएसए येथे झाले आणि पुढे त्यांनी डार्टमाउथ या महाविद्यालयातून अमेरिकन साहित्यात बीए करून पदवी प्राप्त केली. भारताच्या आधुनिक इतिहासात रुची निर्माण झाल्यामुळे त्यांनी आधुनिक भारतीय इतिहास या विषयात ऑक्सफर्ड विद्यापिठातून डॉक्टरेट मिळवली. सुरुवातीला त्यांनी पत्रकार आणि छायाचित्रकार म्हणून काम केले. नंतर ते अमेरिकेच्या माहिती सेवा विभागआरोग्यशिक्षण आणि कल्याण विभागात कर्मचारी म्हणून काम करू लागले. पण त्यात त्यांचे मन रमले नाही. आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन ते सरळ भारतात आले आणि भारतीय संविधानाच्या इतिहासाचा अभ्यास करून एक अप्रतिम लेखाजोग सर्व जगाला उपलब्ध करून दिला. त्याचप्रमाणे त्यांनी भारतीय लोकशाही राज्यघटनेचे कार्य हे भारतीयांच्या अनुभवातून लिहिले आहे.  त्यासाठी त्यांनी संविधानाची रचना आणि त्याच्या निर्मिती दरम्यान घडलेल्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक असलेली अनेक कागदपत्रे गोळा केली. त्यामुळेच भारतीय राज्यघटनेची खोली व रुंदी आणि संविधान निर्मात्यांनी संघटीत केलेली रचना लेखक आपल्याला या पुस्तकातून समजू शकले. या अभूतपूर्व कामासाठी त्यांना पद्मश्री हा भारतीय नागरिक सन्मान प्राप्त झाला.    


वर म्हटल्याप्रमाणे भारतीय संविधान हे भारतीय लोकांचे जीवन शांततापूर्ण मार्गाने आणि शासनाने निर्माण केलेल्या कायद्याच्या आधारे व्हावे यासाठी केलेला महत्वाचा दस्तऐवज आहे. त्यामुळे याचा इतिहास सांगताना लेखकाने संविधान निर्मात्यांची उद्दिष्टे जाणीपूर्वक दिली आहेत. त्यामुळे हे पुस्तक सामान्य वाचकाला भारतातील राजकीय पायांबद्दल अंतदृष्टी प्रदान करते. या पुस्तकातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे पुस्तक लिहिताना लेखक सहजपणे निःपक्षपाती राहत कोणत्याही लोकप्रिय नेत्याच्या दृष्टीकोनातून किंवा विशिष्ट पक्षाच्या दृष्टीकोनातून संविधानाची निर्मिती सांगत नाही. भारतीय संविधानाने भारतीय लोकांच्या जीवनात कशाप्रकारे प्रेरणा दिल्या यासाठी हे पुस्तक वाचले पाहिजे.


धन्यवाद

योगेश गोगवेकर


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...