रंग लेखणीचे परिवार
आठवडा क्रमांक : २७६
विषय क्रमांक : ४
विषय : रामराज्य: गरज
शब्दांकन: योगेश गोगवेकर
पत्ता: माहीम, मुंबई
संकेतस्थळ :
एकविसाव्या शतकांची दोन दशके संपली तरी आपल्याला रामराज्य निर्माण होण्याची गरज वाटत असते. रामराज्य ही कल्पना फार जुनी असून ती वाल्मिकी रामायणातून प्रथम व्यक्त झाली आहे. पुढे ही कल्पना मध्ययुगीन काळामध्ये संत तुलसीदास पण मांडताना दिसतात. आधुनिक काळात सर्व मानवी समाजाला एक जागतिक दृष्टि मिळावी म्हणून महात्मा गांधींनी सुद्धा ही कल्पना लोकप्रिय केली. मग इथे एक प्रश्न पडतो की रामराज्य म्हणजे काय? ते केव्हा स्थापन झाले? असे रामराज्य आजच्या वर्तमान काळात खरोखरच होऊ शकेल का? जे काही रामराज्य स्थापन झाले होते त्यात कोणत्याही उणीवा नव्हत्या का? जर उणीवा होत्या तर त्या उणिवांचे काय झाले? त्या कशाप्रकारे हाताळल्या गेल्या? जर रामराज्य आजच्या काळात स्थापन करायचे ठरविले तर त्या राज्याची मुल्ये काय असणार? जेव्हा आधुनिक काळात रामराज्याची संकल्पना महात्मा गांधींनी मांडली तेव्हा त्यांना कोणत्या अनुषंगाने रामराज्य म्हणायचे होते? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत राहतात. त्यामुळे रामराज्याची संकल्पना मांडण्या अगोदर आपल्याला रामराज्याचा अर्थ व्यवस्थित समजून घ्यावा लागेल. तेव्हाच कुठे रामराज्याची संकल्पना आणि त्या राज्याची मुल्ये समजून घ्यायला मदत होईल.
रामायणात सात कांडे येतात. रामराज्य या राज्याची कल्पना रामायणातील उत्तरकांडमध्ये म्हणजे शेवटच्या कांडात मांडली गेली आहे. लंकेमध्ये रावणाचा वध करून श्रीराम जेव्हा अयोध्येला परत आले तेव्हा रामराज्याची स्थापना झाली असे रामायण सांगते. इथे रावणाचा वध करून श्रीराम अयोध्येत परत येतात तेव्हा श्रीरामाबरोबर लंका, किष्किंधा आणि प्रयाग वरून अनेक मित्र आलेले असतात. त्यांना परत पाठवून दिल्यानंतर श्रीरामांनी अयोध्येचा राजा म्हणून जे राज्य स्थापन केले त्यास रामराज्य असे म्हटले जाते. या राज्यावर त्यांनी अकरा हजार वर्षे राज्य केले म्हणून या काळाला सुवर्णकाळ असे म्हटले जाते. या राज्याला आदर्श म्हणण्याचे कारण म्हणजे या राज्यात सर्वजण सुखी होते. प्रत्येक कुटुंबात सुखी संसाराचे चित्र होते. कोणत्याही जातीच्या कुटुंबाकडे पाहिल्यावर कोणाचाही सुतकी चेहरा दिसत नव्हता. कुणीही कोणाला दुषणे देत नव्हता. रामराज्याचे वर्णन करताना संत तुलसीदास म्हणतात ,” रामराज्यात प्रत्येकजण धर्माने परिभाषित केलेल्या कर्मानुसार काम करीत होता. ही कामे करीत असताना जनतेला कोणाचीही भीती वाटत नव्हती. त्यामुळे कोणीही दु:खी नव्हते. कोणतेही रोग नव्हते. परिपूर्ण स्थिती आणण्यासाठी जे काही सध्या करायचे असेल तर ते तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार करा आणि ते सर्वजण मिळून करा.” हे सांगून संत तुलसीदास सांगतात की रामराज्यात कुणालाही शारीरिक व अध्यात्मिक त्रास नव्हता. प्रत्येकजण धर्मशस्त्रात सांगितल्या प्रमाणे आपले काम स्नेहभावनेने करीत होता. त्यामुळे धर्माच्या चारही गोष्टी सत्य, शुद्धता, करुणा आणि दान व्यवस्थितपणे होत होत्या. म्हणून रामराज्यात मोहा पेक्षा प्रेमाला अधिक महत्व होते. म्हणून तिथे विकृत अध्यात्मिक कल्पना नव्हती आणि अनियंत्रितसुखोपभोग नव्हते. कुटुंब हे एक युनिट होते आणि कुटुंबातील सर्व लोक आपला बौद्धिक, शारीरिक व मानसिक विकास कुटुंबामध्ये राहूनच करीत असे. त्यामुळे समाज पूर्णपणे विकसित होत होता. कुटुंब एक युनिट असल्यामुळे प्रत्येक माणूस ते युनिट स्वच्छ ठेवत असे त्यामुळे पूर्ण गाव स्वच्छ राहण्यास मदत होत असे.
रामराज्यात पर्यावरण शास्त्र सुद्धा व्यवस्थितपणे सांभाळले आहे असे म्हटले जाते. सर्व जंगले फुलांनी आणि फळांनी भरलेली दिसत असत. वाघ, सिंह आणि हत्ती असे प्राणी एकत्र राहत होते. सर्व पक्षी आणि प्राणी परस्पर स्नेहभावनेने किंवा सामंजस्याने जगत होते असे म्हटले जाते. पक्ष्यांचा किलबिलाट प्रत्येकाच्या मनाला आनंद देवून जात होता. सौम्य, थंड, सुगंधित वारा सर्व प्राणी जातींचे मन प्रफुल्लीत करीत असे. मधमाश्या फुलांमधून मध गोळा करून मध देत असत. त्याचप्रमाणे गायीसुद्धा दुध मागताच लगेच देत असे. शेत नेहमी पिकांनी भरलेले असायचे त्यामुळे कुठेही अन्नाची कमतरता नव्हती. त्याचप्रमाणे पर्वतात आणि टेकड्यात उत्तम खाणी उपलब्ध होत होत्या. सर्व नद्या थंड, स्वच्छ आणि गोड पाण्याने भरलेल्या होत्या. महासागर आपल्या मर्यादेत राहून आपला खजिना मानवासाठी किनाऱ्यावर सोडत असत. सर्व तलाव आनंद पसवणाऱ्या कमळांनी भरलेले होते. चंद्र आपली शीतल किरणे पृथ्वीवर न चुकता पाठवत राहत होता. सूर्य आवश्यक असेल तेवढाच चमकत असे. ढग मागितल्या प्रमाणे पाणी देत असतात. हे सर्व होते कारण श्रीराम लाखो यज्ञ करतात, सीता त्यांचे घर कुशलतेने सांभाळते, त्यांचे बांधव श्रीरामांना हव्या असलेल्या सर्व गोष्टींकडे लक्ष देतात आणि श्रीरामाकडून विविध रणनीती शिकून घेतात. त्यामुळे अयोध्या नगरी आनंदात आहे, सर्व वाडे मौल्यवान दगडांनी भरल्या होत्या आणि ही नगरी आपल्या भव्यतेने इंद्राच्या अमरावतीशी स्पर्धा करताना दिसत होती. शरयू नदी स्वच्छ पाण्याने वाहत होती आणि तिच्या काठावर कुठेही चिखल दिसत नव्हता. या नदीचे पाणी घोडे, हत्ती वगैरे प्राणी एका बाजूस उभे राहून पित होते.. त्याचप्रमाणे या नदीच्या बाजूची देवळे सर्व बागांनी वेढलेली दिसत होत्या आणि नदी किनारी तुळशीची लागवड केलेली होती. म्हणून अयोध्या नगरी खूप सुंदर दिसत होती. त्यामुळे हे त्रेतायुग कोणालाही सत्ययुग वाटत होते. अशा या काळात सर्व काही उत्तम होते आणि हे सर्व रामराज्यात होत होते. म्हणून नंतरच्या सर्वयुगात लोकांना रामराज्य हवे असे वाटत राहते.
श्रीराम हे एक आदर्श राजे होते. त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हटले जायचे. मर्यादा म्हणजे सन्मान आणि योग्यता आणि पुरुषोत्तम म्हणजे सर्वोच्च पुरुष. जसे ते मर्यादा पुरुषोत्तम होते तसेच ते आदर्श पुत्र, आदर्श भाऊ, आदर्श पती पण होते. त्यांनी नेहमी माणुसकी टिकविण्यासाठी आपले आयुष्य खर्ची केले. ते न्यायी आणि नीतिमान तर होतेच पण धैर्यवान आणि दयाळू सुद्धा होते. ते उदार मनाचे सभ्य राजे होते. म्हणून प्रजासुद्धा त्यांच्यावर अपार प्रेम करीत होती. त्यांचे राज्य हे नेहमीच सत्या वर आधारित होते. ऋषी, योगी आणि ब्राह्मणांना त्यांनी गुरूच्या स्थानी मानले होते. त्यांनी नेहमी वेदांचे आदर आणि पालन केले. त्यांच्या राज्यात दृष्ट, चोर आणि डाकू सारखी माणसे नव्हती. म्हणूनच प्रजेच्या सांगण्यावरून त्यांनी आपल्या पत्नीचा म्हणजे सीतेचा त्याग सुद्धा केला होता. याचाच अर्थ रामराज्य म्हणजे देवांचे राज्य जे शुद्ध आणि नैतिक अधिकारावर आधारित असलेले लोकांचे राज्य होते. या राज्यात सर्व लोकांना समानतेची वागणूक दिली जात होती. रामराज्याबद्दल सांगताना वाल्मिकी ऋषींनी काही श्लोक सांगितले आहेत. त्यात ते म्हणतात की रामराज्यात लोक त्यांच्या हजारो संततीसह, सर्व आजार आणि रोगांपासून मुक्त होते. हे सर्व सांगताना ते म्हणतात की,” रामो रामो राम इति प्रजानामभवन् कथाः| रामभूतं जगाभूद्रामे राज्यं प्रशासति || याचा अर्थ असा की रामाचे राज्य असताना, लोकांच्या चर्चा केवळ श्रीराम यांच्याभोवती होती. त्यामुळे जग हे पूर्णपणे राममय झाले होते. पुढे वाल्मिकी ऋषी म्हणतात,” सर्वे लक्षणसम्पन्नाः सर्वे धर्मपरायणाः || म्हणजे सर्व लोक उत्कृष्ट गुणधर्मांनी संपन्न होऊन पुण्य करण्यात किंवा धर्म कार्यात मग्न होते. याचाच अर्थ असा की राज्यकर्ते लोकांच्या आनंदातच आपले हित मानीत असत. न्याय मिळविण्यासाठी हिंसेचा वापर ते करीत नसत. कमीतकमी खर्चात न्याय होत असे आणि तो लवकरच होत असे. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रशासनात लष्कराची भूमिका बिलकुल नव्हती. म्हणूनच सर्वाना रामराज्य अनेक विचारवंताना आणि नेत्यांना फार महत्वाचे वाटत होते. त्यात महात्मा गांधी सुद्धा होते.
आधुनिक काळात रामराज्य ही संकल्पना महात्मा गांधींनी लोकप्रिय केली होती. त्यांच्या द्र्ष्टीकोनातून रामराज्य म्हणजे सत्य, अहिंसा आणि नैतिक मुल्यांवर आधारलेले राज्य होते. ते म्हणत की श्रीरामाने राज्य करताना एका आदर्श समाजाची कल्पना निर्माण केली जिथे प्रत्येकजण समान असतो आणि न्याय पद्धतीने वागत असतो. ते नेहमी म्हणत असत की त्यांच्या स्वप्नातील रामराज्य राजपुत्र आणि गरीब दोघानाही समान हक्क देईल. महात्मा गांधीजींना भारताचे आणि भारतीय लोकांचे पूर्णपणे ज्ञान होते. रामायणातील रामाने भारतीय लोकांच्या हृदयात महत्वाचे स्थान व्यापले आहे याची त्यांना जाणीव होती. म्हणून त्यांनी रामराज्याची पहिली कल्पना १९०९ साली लिहिलेल्या आपल्या हिंद स्वराज या पुस्तकात पहिल्यांदा मांडली. त्यात ते म्हणतात की रामराज्य म्हणजे अशी धर्मभूमी की ज्यात अनेक प्रकारची मानव जात आणि प्राणी शांततेने, आनंदाने आणि सौहार्दपूर्ण आपले जीवन व्यथित करतील आणि ते सर्व प्रतीबंधापासून मुक्त असतील. त्याचप्रमाणे ते राज्य स्वशासन आणि आत्मसंयम असेल. रामराज्यात जशी अयोध्या नगरी स्वयंपूर्ण झाली होती त्याच प्रकारची कल्पना महात्मा गांधीनी खेड्यांचे पुनर्जीवन करताना मांडली होती आणि त्यासाठी ग्रामस्वराज ही संज्ञा तयार केली. प्रत्येक गाव हे विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका असलेले प्रजासत्ताक आहे असे ते म्हणत. अशा रामराज्यात सर्व जातीच्या आणि सर्व धर्माच्या लोकांना स्वतःचे जीवन त्यांच्या पद्धतीने जगण्यासाठी वाव असायला पाहिजे असे त्यांचे मत होते. १९ सप्टेंबर १९२९ रोजी यंग इंडिया या आपल्या पत्रकात लिहिताना ते म्हणतात, “By Ramrajya I do not mean Hindu Raj. I mean by Ramrajya Divine Raj, Khuda Ki Basti or the Kingdom of God on Earth.” मराठीत याचा अनुवाद करायचा झाल्यास असे म्हणता येईल की रामराज्य हे पृथ्वीवरील देवाचे राज्य आहे असे मी समजतो. ते पुढे लिहितात, “ माझ्यासाठी राम आणि रहीम हे दोघेही एकसारखेच आहेत. सत्य आणि सदगुणांव्यतिरिक्त मी दुसऱ्या कोणत्याही देवाला मानीत नाही. माझ्या कल्पनेतील राम खरोखरच या पृथ्वीतलावर होऊन गेला का मला माहित नाही. परंतु, रामायण हे खऱ्या लोकशाहीचे उदाहरण आहे की जिथे लांबलचक प्रक्रियांना सामोरे न जाता समाजातील शेवटच्या नागरिकाला न्याय मिळू शकेल”. याचाच अर्थ असा होतो की महात्मा गांधीच्या मते रामराज्य म्हणजे नैतिकतेवर आधारलेले राज्य होते.

आज एकविसावे शतक चालू आहे आणि अनेक प्रांतात भारताने आधुनिकता आणली आहे. जर भारतात रामराज्य स्थापन करायचे झाल्यास ते कशा प्रकारचे असेल याचा व्यवस्थित अभ्यास करावा लागेल. १९५० सालच्या संविधानाने आपल्याला लोकशाहीची व्यवस्था देताना न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही तत्वे सांगितलेली आहे. या गोष्टी आपल्याला जसे सामाजिक, राजकीय आणि आर्थिक लाभ तर देतात त्याचप्रमाणे आपल्याला विचार, अभिव्यक्ती , श्रद्धा आणि उपासनेचे स्वातंत्र्य पण देत आहे. सर्व समाजात समानता आणून राष्ट्राची अखंडता आणि एकता जपत आहे. त्यामुळे एक प्रकारचे रामराज्य भारतीय संविधानाच्या कक्षेत होऊ शकते कारण नीतीमुल्यांचा, नैतिकतेचा वारसा आपल्याला संविधानामध्ये सुद्धा असल्याचा जाणवत आहे. जसे रामराज्यात हिंसेला स्थान नाही तसेच भारतीय संविधानेला सुद्धा हिंसा मान्य नाही. कारण भारतीय संविधान लोकशाहीचे महत्व देते आणि कोणत्याही प्रश्नाची उत्तरे चर्चा करूनच शोधली पाहिजे असे संविधान म्हणते. जेव्हा आपण रामराज्य स्थापन करायचे म्हणतो, तेव्हा काही प्रश्न उभे राहतात. अशा प्रश्नांची उत्तरे ते प्रश्न समजून घेवूनच शोधावी लागतील. हे सर्व प्रश्न रामराज्याच्या स्थापने नंतरच आले आहेत. त्यात पहिला प्रश्न आहे स्त्रियांचा. रामायणात स्त्रियांनी फक्त घरातील कामे करावी आणि पुरुषांनी कमाई करून घर खर्च चालवावा असे म्हटले आहे. आजच्या आधुनिक काळात हे शक्य होईल का ? हा प्रश्न पडतो. कारण आज भारतीय स्त्रिया शिक्षण घेऊन अनेक क्षेत्रात अभिमान वाटेल अशी कामे करीत आहे. मग त्रेतायुगातील रामराज्य आणले तर स्त्रियांची परिस्थिती कशी असेल यावर विचार करणे जरुरीचे आहे. इथे स्त्रियांच्या स्थितीचा उल्लेख करताना केवळ एका नागरिकाच्या सांगण्याने आपल्या प्रिय पत्नीचा त्याग करणे हे आजच्या आधुनिक काळात कितपत लोकांना मान्य होईल याचा विचारसुद्धा करावा लागेल.
त्रेतायुगातील रामराज्याची स्थापना करायची असेल तर अजून एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे चातुर्वर्णांचा. रामराज्यात सर्व लोक आपापली नेमून दिलेली कामे नीटपणे करीत होती असे म्हटले आहे. याचाच अर्थ असा होतो की ही सर्व कामे चातुर्वर्णांवर आधारित होती आणि त्याचप्रमाणे होत होती. जर कोणी स्वतःहून दुसऱ्या वर्णाचे काम करण्याचा प्रयत्न केला तर त्यास शिक्षा म्हणून मृत्यूदंडच दिला जात असेल. याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाल्यास वाल्मिकी रामायणातील उत्तरकांडामध्ये ७३ ते ७६ या चार श्लोकातून शंबूक नावाच्या शूद्र तपस्व्याची आलेली कथा. ही कथा त्या काळातील भारतीय समाजाची मानसिकता दाखून देते. येथे शंबूक नावाचा शुद्र तपस्या करून वेदांचा अभ्यास करून एक तपस्वी होतो. हे रामराज्यातील जानपद ब्राह्मणाला सहन होत नाही. जर श्रीराम धर्मनिष्ठ वृत्तीने राज्य करीत होते तर एक शुद्र वेदांचा अभ्यास करून तपस्वी कसा होऊ शकतो असा प्रश्न तो ब्राह्मण श्रीरामाला करतो. या शंबूकाच्या कृत्यामुळे त्याचा मुलगा मरण पावला असे सांगून तो श्री रामाला त्या शंबूकाचा वध करून आपल्या ब्राह्मण मुलाला जिवंत करायला सांगतो. त्याप्रमाणे श्रीराम शंबूकाचा वध करतात आणि ब्राह्मणाच्या मुलाला जिवंत करतात. आज या गोष्टी मान्य होतील का? असे प्रश्न त्रेतायुगातील रामराज्य स्थापन करण्याच्या अगोदर लक्षात घेतले पाहिजे. म्हणून जेव्हा आपण रामराज्य स्थापनेची गरज आहे म्हणू लागतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे त्रेतायुगातील रामराज्यातील चांगल्या गोष्टी आपल्या संविधानात आलेल्या आहेत. तेव्हा आजचे संविधान रामराज्याच्या स्थापनेसाठी काढून टाकणार असाल तर ती मोठी चूक ठरेल. कारण आजचा आधुनिक भारत वेगळ्या स्वरूपाचा आहे. त्रेतायुगातील रामराज्य काही मूल्यांच्या आधारावर भारतीय संविधानात आलेले आहे, त्यामुळे वेगळे रामराज्य स्थापन करण्याची गरज आहे असे वाटत नाही.
धन्यवाद
✍🏻 योगेश गोगवेकर

Comments
Post a Comment