विषय : पुस्तक विश्लेषण
पुस्तकाचे नाव :‘हर एक पल का शायर साहिर लुधियानवी
लेखक :लक्ष्मीकांत देशमुख
प्रकाशक :राजन बावडेकरविषय : पुस्तक विश्लेषणआवृत्ती : ८ मार्च २०२१
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
संकेत स्थळ :
लेखक :लक्ष्मीकांत देशमुख
प्रकाशक :राजन बावडेकरविषय : पुस्तक विश्लेषण
पुस्तकाचे नाव :‘हर एक पल का शायर साहिर लुधियानवी
लेखक :लक्ष्मीकांत देशमुख
प्रकाशक :राजन बावडेकर
आवृत्ती : ८ मार्च २०२१
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
लेखक :लक्ष्मीकांत देशमुख
प्रकाशक :राजन बावडेकर
आवृत्ती : ८ मार्च २०२१
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
“हजार बर्क (विजा) गिरे, लाख आंधियां उठे,
वो फूल खिलके रहेगा जो खिलनेवाला है”
वो फूल खिलके रहेगा जो खिलनेवाला है”
वरील शेर आहे साहिर लुधियानवी यांचा. या शेरची आठवण येण्याचे कारण असे की लक्ष्मीकांत देशमुख लिखित, ‘हर एक पल का शायर साहिर लुधियानवी जीवन आणि शायरी’ हे मराठी पुस्तक नुकतेच वाचून झाले. हे पुस्तक साहिर लुधियानवी यांचे चरित्र असून त्यात लेखकांनी या गीतकाराचे जीवन आणि त्यांनी केलेल्या शायरींची ओळख खुप छानपणे केली आहे. ही ओळख करून देताना लेखक आपल्याला नकळत सहा दशके मागील काळात घेऊन जातात. साहिर यांचे बालपण, त्यांची मातृभक्ती, डाव्या विचारांचा त्यांच्यावर झालेला प्रभाव, त्यांची नास्तिकता, त्यांच्या असफल प्रेमांची कथा, सामान्य माणसांसाठी सतत आपल्या काव्यातून उठवलेला आवाज, वगैरे गोष्टी वाचताना आपण साहिर यांच्या कवितेचा अर्थ समजून घेऊ लागतो. त्यांच्या कविता प्रगतीशील चळवळीशी निगडीत असल्याची जाणीव आपल्याला सतत जाणवत असते, त्याचप्रमाणे त्यात स्त्रियांना नेहमीच मोठा मान दिला गेला आहे हे सुद्धा प्रकर्षाने जाणवते. हे सर्व करीत असताना साहिरने आपला अहंकार आणि आत्मसन्मान नेहमी जोपासला. त्यांना उपभोगासाठी पैशाची गरज कधी भासली नव्हती पण जगण्यासाठी आणि भविष्यातल्या संकटकाळासाठी त्यांना पैसा हवा होता. पुढे एक यशस्वी गीतकार झाल्यावर त्यांनी मानधन ठरवताना काव्याच्या किंवा सिनेगीताच्या बाबतीत कुणाशीही तडजोड केली नाही कारण त्यांना माहिती होते की आपले विचार मांडण्यासाठी आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सिनेगीत हे महत्वाचे मध्यम आहे. त्यांनी चित्रपट गीते लिहिताना प्रत्येक वेळेस वेगळा विचार मांडला आहे. म्हणून साहिर यांची गीते त्यांना दिलेल्या संगीतापेक्षा त्यांच्या गीतातील विचारांमुळे लक्षात ठेवली जातात. याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर प्यासा, बाजी, वक्त, कभी कभी, फिर सुबह होगी, दाग, साधना, नया दौर, दिल ही तो है, शगुन, बरसात की रात या चित्रपटातील गाणी देता येईल.
लक्ष्मीकांत देशमुखांनी पुस्तकाची सुरुवात करताना प्रस्तावना लिहिली आहे. या प्रस्तावनेत साहिर यांना आजसुद्धा तुमची आठवण कशी येते हे सांगताना ते लिहितात, “करोनाच्या महामारीमुळे २०२० मध्ये संपूर्ण भारतात टाळेबंदी स्वीकारण्यात आली. तेव्हा खरे हाल झाले ते कामगार वर्गाचे. या वर्गाची परिस्थिती वाऱ्यावर सोडून दिल्यासारखी झाली. त्यांच्या वेदना कुणाला दिसत नव्हत्या. केवळ पाणी पिऊन, चणे खाऊन हा वर्ग आपले जीवन जगत होता. त्यांचे थिजलेले डोळे, पराभूत देहबोली आणि आतडे कुरतडणारी भूक कामाची मागणी करीत होते. पण त्यांचा आवाज कुणीही ऐकत नव्हते.” असे सांगून लेखक १९६३ साली साहिर यांनी लिहिलेल्या एका गाण्याची आठवण करून देतात आणि म्हणतात की १९६३ रोजी लिहिलेले तुझे गीत आजही तेच प्रश्न करीत आहे. यासाठी तुझ्या भविष्यवेधी प्रतिभेचे कौतुक करावं की ७० वर्षात दररोज भरल्या पोटी झोपी जाणारा भारत देश साकार करता आला नाही म्हणून सरकारला बोल लावावेत असा हा प्रश्न आहे. त्या गाण्यातील साहिर तुझे शब्द आजही पूर्णपणे लागू आहेत. जर तू जिवंत असता तर परत एकदा खालील गाण्यातील शब्द पुन्हा उच्चारले असते.
जब तक तुम भुके नंगे हो, ये शोले खामोश न होंगे
जब तक बे-आराम हो तुम, ये नग्मे राहत-कोश न होंगे |
(तोपर्यंत तुम्ही भुकेले व नग्न आहात, या ज्वाला शांत होणार नाहीत, जोवर तुम्ही दुःखी कष्टी आहात, माझी गीते आनंदी असणार नाही)
वरील गीताचा उल्लेख करून लेखक साहिरबद्दल सांगतात की, ‘तुझ्या मृत्युच्या चाळीस वर्षानंतर तुझ्या सारखा जनतेचा आवाज बनलेला बार्ड-भाट आज शेकडो कवी-शायरांच्या भाऊगर्दीत अभावाने आढळतात. पुन्हा तो लोकांपर्यंत किती पोचेल, हा वेगळा प्रश्न. त्यामुळेच आज सामान्य माणसांचा आवाज मूक झाला आहे, दबला गेला आहे. म्हणून तुझी गरज आज खूप जाणवत आहे. तुझ्या शायरींचा, गीतांचा विसर पढू नये, तुझे स्मरण सदैव होण्यासाठी हे काव्यात्मक पुस्तक लिहिण्याचा घाट घातला आहे.’ इथे लेखक साहिर यांची काव्ये आणि गीते भारत नामक संकल्पनेशी ( Idea of India ) जोडतात. देशमुख म्हणतात की भारत नामक संकल्पना ही भारतीय संविधानातून साकार झाली आहे. त्याचा महत्वाचा भाग स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आहे आणि ही त्रिसूत्री साहिर यांच्या भावनेत व विचारात होती. म्हणूनच ती काव्य रुपात त्याच्याकडून व्यक्त झाली आहे. त्यासाठी देशमुख साहिर यांची काव्ये किंवा गीते सुप्रसिद्ध साहित्यिक समीक्षक Christopher Caudwell यांच्या मतांशी तंतोतंत कशी जुळतात हे सांगताना Christopher Caudwell यांचे मत देतात. ते लिहितात, ”Poetry is characteristically a song, and song is characteristically something which because of its rhythm sung in unison and is capable of being the expression of a collective expression.” हे देतांना लेखक सांगतात की अभिजात रंजनवादातून साहित्याला बाहेर काढून तिला सामान्य माणसांचा आवाज बनविण्याची क्षमता साहिर यांच्या काव्यात होती आणि उदाहरण म्हणून साहिर यांची खालील कविता देतात.
देश के अदबार की बाते करे
अजनबी सरकार की बाते करे
अगली दुनिया के फसाने छोड़कर
इस जाह्नुममजार की बाते करे
( देशाच्या दारिद्राच्या गोष्टी करूया. परक्या वाटणाऱ्या सरकारच्य गोष्टी करूया. पुढे येणाऱ्या दुनियेचा विचार सोडून नरक-भूमीच्या गोष्टी करूया )

साहिर लुधियानवी या कवीची जीवन कहाणी त्याच्या जन्मापासून म्हणजे ८ मार्च १९२१ पासून सुरु होते. या पुस्तकात हे कथन तिसऱ्या व चौथ्या भागात येते. लेखकाने हे कथन खूप छानपणे मांडले असून वाचताना कुठे ही कंटाळा येत नाही. चौधरी फझल मोहम्मद आणि त्याची अकारावी काश्मिरी मुस्लिम पत्नी सरदार बेगम यांच्या पोटी जन्मलेल्या बाळाचे नाव अब्दुल हयी असे ठेवण्यात आले. चौधरी फझल मोहम्मद हा लुधियानापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या शेखोवाल या गावाचा जमीनदार होता. पूर्ण गावाच्या अर्ध्यापेक्षा जास्त जमिनीचा तो मालक होता. त्याचा स्वभाव अतिशय घाणेरडा होता. तो स्वतः काही शिकला नव्हता आणि खूपच अत्त्याचारी होता. कोणतेही काम न करता ऐशोआराम आणि बाई-बाटलीची ऐय्याशी करत निष्क्रिय जीवन शेवट पर्यंत जगाला. साहिरच्या जन्मानंतरसुद्धा त्याच्यात काही फरक पडला नव्हता आणि त्याने बारावे लग्न करण्यासाठी जमिनीचा एक तुकडा विकला. यावेळेस सरदार बेगम चिडून उठली कारण तिला साहिरच्या भवितव्याची काळजी वाटू लागली. ती फझलपासून वेगळी राहू लागली आणि रीतसर घटस्फोट घेतला. मग ती सहिरला घेऊन आपल्या भावाकडे राहू लागली. त्यामुळे साहिरचे जीवन लहानपणापासून वेदनादायक होते. वारसा हक्काने त्याच्याकडे भरपूर संपत्ती होती पण त्यावर त्याने पाणी सोडले होते आणि आपले नाव बदलून साहिर लुधियानवी ठेवले. साहिरसाठी सरदार बीबीने जे केलं त्याला तोड नव्हती. तिचे कष्ट, तिचा स्वाभिमान आणि मुलावरचं पराकोटीचं प्रेम यामुळे बालवयातील असुरक्षितता व भावनिकदृष्ट्या दुभंगलेला साहिर तिच्यावर नको तितका विसंबून राहू लागला होता आणि त्याचे आईवरचं परावलंबित्व शेवटपर्यंत कमी झालं नाही. म्हणून त्याने साधना या चित्रपटातील एका गाण्यात खालील काव्य घातले आहे.
औरत ने जनम दिया मर्दों को, मर्दों ने उसे बाजार दिया,

जब जी चाहा मसला कुचला, जब जी चाहा दुतकार दिया
साहिरचे शिक्षण आणि त्याच्या आयुष्यात आलेले प्रेमसंबंध यांचे सखोल विश्लेषण कोणताही आडपडदा न ठेवता लक्ष्मीकांत देशमुख यांनी केला आहे. साहिरचे शालेय शिक्षण लुधियाना खालसा हायस्कूल मध्ये झाले. कॉलेज शिक्षणासाठी त्याने लुधियाना येथील सरकारी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तो आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करू शकला नाही कारण त्याकाळी त्याने ब्रिटीश सरकार विरुद्ध अनेक कविता करुन स्वातंत्र्याच्या चळवळीचे समर्थन केले होते. त्यासाठी त्याला लुधियाना सरकारी महाविद्यालयातून काढण्यात आले होते. साहिर महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्याच्या आयुष्यात प्रेमाचा सिलसिला सुरु झाला होता. महिंदर चौधरी हि युवती त्याच्या आयुष्यात पहिली आली होती. तिच्या बरोबर त्याने काही प्रेमाचे क्षण घालविले होते. पण जीवघेण्या क्षय रोगाने महिंदरचा बळी घेतला आणि त्यांचे प्रेमसंबध संपले गेले. त्यानंतर त्याच सरकारी महाविद्यालयात शिकत असताना साहिरच्या जीवनात इशर कौर म्हणून दुसरी तरुणी प्रेयसी म्हणून आली. इथे हिंदू आणि मुस्लीम या धर्मामुळे त्यांचे प्रेम सफल होऊ शकले नाही. लुधियाना सरकारी महाविद्यालयातून काढून टाकण्यामागे जसे ब्रिटीश सरकार विरूद्ध केलेली काव्ये कारणीभूत होती तसेच इशर कौर बरोबरचे प्रेमसंबंधसुद्धा जबाबदार होते. लुधियाना सरकारी महाविद्यालयातून काढून टाकल्यावर साहिरने लाहोर येथे महाविद्यालयात प्रवेश घेतला. एक दिवस सर्व बंधने सोडून इशर कौर लाहोरला साहिर बरोबर आयुष्य घालविण्यासाठी आली, तेव्हा त्याने या तरुणी बरोबर प्रेमाची साथ करीत राहिलो तर तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल म्हणून कायमची माघार घेऊन इशरला तिच्या घरी परत पाठवून दिले. इशर कौर नंतर साहिरच्या जीवनात एक सुंदर पंजाबी कवियत्री आली ती म्हणजे अमृता प्रीतम. लाहोर आणि अमृतसरच्या मधोमध असलेल्या प्रीत नगर या गावात मुशायरात ते पहिल्यांदा भेटले. प्रीतमने तिच्या आठवणींमध्ये लिहिलं, “मला माहीत नाही की ही त्याच्या शब्दांची जादू होती की त्याच्या मूक नजरेची, पण मी मोहित झाले होते. त्यावेळी ती दु:खी वैवाहिक जीवनात अडकली होती. पण फाळणीनंतर काही वर्षांनी, साहिर मुंबईला आणि अमृता दिल्लीला स्थलांतरित झाले. अमृता प्रीतमला दिल्ली सोडायची नव्हती तर साहिरला मुंबई हवी होती कारण त्यांच्या कवितेला, गाण्याला मुंबई साथ देत होती. या गोष्टीचा शेवट प्रेमभंगात झाला आणि दोघेही परत कधीही एकत्र आले नाही. मुंबईत सिनेसृष्टीत काम करताना साहीर परत एकदा सुधा मल्होत्रा नावाच्या तरुण गायिकेच्या प्रेमात पडला. पण तिच्या आई वडिलांनी या प्रेमाला विरोध केला आणि तिचे लग्न दुसरीकडे लावून दिले. इथे एक गोष्ट नमूद केली पाहिजे ती म्हणजे साहिर हा हाडाचा रोमँटिक व्यक्तीमत्वाचा प्रेमपुजारी होता. जसा तो मित्रा विना क्षणभर राहू शकत नव्हता, तसंच त्याला जगण्यासाठी एक विरुद्ध लिंगी आकर्षण लागायचं. एवढे प्रेमभंग होऊन सुद्धा त्याने विशुद्ध प्रेम कविता रसिकांना दिली त्याचप्रमाणे विरह आणि उदासीन गीते सुद्धा दिली.
साहिरचा चित्रपटसृष्टीचा प्रवेश लेखकाने खूप छान पणे लिहिला आहे. चित्रपटसृष्टीमध्ये साहिरला गीतकार म्हणून चांगले आर्थिक स्थैर्य लाभले. याची सुरुवात १९४९ साली आलेल्या ‘आझादी की राह पर’ या चित्रपटापासून झाली. त्या सिनेमात त्यांनी चार गाणी लिहिली. त्यातील 'बदल राही ही जिंदगी' हे गाणे खूपच गाजले. तरीपण या गीतकाराकडे कुणाचे लक्ष गेले नाही. १९५१ साली त्याने संगीतकार सचिन देव बर्मन बरोबर ‘नौजवान’ हा चित्रपट केला आणि त्यांना थोडी ओळख मिळू लागली. पण खरी ओळख झाली ती म्हणजे १९५२ साली ‘बाजी’ या चित्रपटात लिहिलेल्या गाण्यामुळे. या चित्रपटला सुद्धा सचिन देव बर्मन यांचे संगीत होते. बाजी हा चित्रपट जुगारावर आधारित होता. जुगार जिंकण्यासाठी तुला खेळावाच लागेल असे सांगणारे गीत म्हणजे ‘तदबीर से बिघाडी हुई तकदीर बना ले’ एक उत्तम नमुना आहे. त्याप्रमाणे 'आज की रात पिया’ आणि ‘सुनो गजर क्या गाये’ सुंदर लिहिली गेली आहेत. साहिरचा सचिन देव बर्मन बरोबरच प्रवास प्यासा पर्यंत खूप चांगला झाला पण प्यासा चित्रपटासाठी लिहिलेली गाणी ही त्याला दिलेल्या संगीतापेक्षा त्यातील विचारांवर लोकांनी लक्षात ठेवले आहे असे साहिरचे म्हणणे सचिन देव बर्मन यांना पटले नाही आणि दोघांनी परत कधीही एकत्र काम केले नाही. हे खरे आहे की प्यासातील गाणी त्यातील विचारांसाठी आजसुद्धा ओळखली जातात. तसाच प्रकार नया दौर या सिनेमासाठी झाला. या चित्रपटाला संगीत दिले होते ओ.पी नय्यर यांनी. त्यांच्या बरोबरसुद्धा फारकत घेऊन साहिरने आपला गीतकाराचा प्रवास अनेक संगीतकारांबरोबर चालू ठेवला. त्यात रवी, रोशन, खय्याम, लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि दत्ता नाईक यांचा समावेश आहे. फिर सुबह होगी, साधना, बरसात की रात, धूल का फूल, चंद्रकांता, मिलाप, धरमपुत्र, इज्जत, दाग,कभी कभी, इन्साफ का तराजू सारख्या चित्रपटात गाणी लिहिली. धूल का फुल मधील ‘तू हिंदू बनेगा या मुसलमान’ हे गीत धर्माच्या पलीकडे बघण्याचा संदेश देते तर बरसात कि रात मधील ‘ये इश्क़ इश्क़ ये इश्क़ इश्क़ है’ हि कव्वाली प्रेमाचे सुंदर काव्य वाटते. त्याचप्रमाणे एका तरुणीच्या प्रेमात पडल्यावर ‘कभी कभी मेरे दिल में खयाल आता है’ किंवा प्रेयसीला सांगताना ‘मै पल दो पल का शायर हुं” लिहिलेल्या गीतात साहिरची प्रेमाबद्दल कल्पना समजून येते. प्यासा मधील ‘ ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या ही” किंवा ‘जिसे नाझ ही हिंद पर वो कहा है’ जी माणसाला विचार देते . म्हणूनच साहिरची गीते कुठल्याही काळात उपयोगी होतात कारण त्याच्या गीतात, काव्यात विचार होते. म्हणून तो प्रतिभावंत होता. त्यासाठी कधी त्याने कोणाशीही तडजोड केली नाही.
साहिरच्याया जडणघडणीत त्या काळातील प्रभावी विचारसरणीचा संस्कार कसा झाला हे लेखकाने खूप विस्ताराने मांडले आहे. याचा उल्लेख करताना वसंत आबाजी डहाके पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात कवीचे चरित्र लिहिताना त्या कवीचे कुटुंब, त्याच्या अवतीभवतीचा समाज, त्यावेळेचा त्याचा काळ, त्या काळातील विचारसरणी हे महत्वाचे घटक असतात. डहाके पुढे म्हणतात की कवीच्या काव्याचा आस्वाद घेताना त्याचा भवताल लक्षात घ्यावा लागतो आणि त्या भवतालाचे कवीच्या कवितेशी काय नाते आहे ते पाहावे लागते. असे करून देशमुखांनी साहिरच्या कवितेतील सौंदर्य उलगडून दाखविले आहे. पारंपरिकतेत अडकलेल्या कवितेंला साहिरने प्रगतशील चळवळीची आधुनिकता दिली, विचार दिला आणि मुक्त छंदातील नज्म हा काव्य प्रकार दिला. त्यासाठी लेखकाने त्या काळातील अनेक कवींचा साहिरवर कसा परिणाम झाला हे सांगितले आहे. कवी इक़्क़्बल यांचे ‘चीनी अरब हमारा, हिंदोस्ता हमारा, मुस्लिम है हम, वतन है सारा हमारा’ या काव्याचे विडंबन करून फिर सुबह होगी या चित्रपटासाठी एक गाणे साहिरने लिहिले. ते गीत आहे ,” ‘चीनी अरब हमारा, हिंदोस्ता हमारा, रहे ने को घर नही है, सारा जहा हमारा’. त्याचप्रमाणे फैझ अहमद फैझ, मजाज लखनवी, मजरूह सुलतानपुरी, कैफी आझमी आणि आली सरदार जाफरी यांचा साहिरवर झालेला प्रभाव सांगताना या कवींचा आढावा त्यांच्या काही काव्यासकट घेतला आहे. याचाच परिणाम होऊन साहिरने पुढे अनेक साम्यवादी दृष्टीकोन असलेली गीते लिहिली. या गीतांचा उल्लेख पुस्तकात बऱ्याच ठिकाणी आला आहे. ‘रात के राही ठक मत जाना, सुबह कि मंझील दूर नाही’ किंवा ‘जिस सुबह की खातिर जुग जुग से हम मर मर के जीते है, वो सुबह कभी तो आयेगी’ अशी काही उदाहरणे आहेत. त्याचबरोबर प्यासा मधील दोन गाणी ‘जिने नाझ है हिंद पर वो कहा है, कहा है” किंवा 'ये दुनिया अगर मिल जाये तो क्या है’ किती प्रभावशाली आहेत आणि आजही त्यातील अर्थ आपल्याला विचार करायला लावतो. म्हणूनच साहिरला लोकांचा कवी (People’s Poet) म्हणजे लोककवी म्हटले जाते. म्हणूनच एक प्रतिभावंत साहिर आपल्या गाण्यात म्हणू शकतो,
‘क्या खाक वो जीना है, जो अपने ही लिये हो
खुद मिट के किसी और को मिटने से बचाले’
साहिर लुधियानवी हे कदाचित हिंदी चित्रपटांतील एकमेव गीतकार आहेत की ज्यांची कविता तिच्या शुद्ध स्वरूपात स्वीकारली गेली आणि चित्रपट गीत म्हणून समाविष्टसुद्धा केली गेली. उर्दू कवी म्हणून त्यांची उंची इतकी मोठी होती की त्यांना कधीही चित्रपट गीत लेखनाच्या मागणीनुसार त्यांची कविता तयार करावी लागली नाही; त्याऐवजी, निर्माते आणि संगीतकारांनी त्यांच्या गरजा त्याच्या कवितेशी जुळवून घेतल्या. प्यासा, नया दौर, साधना आणि फिर सुबाह होगी या चित्रपटांतील त्यांच्या गाण्यांना अभिजात दर्जा मिळाला आहे. हे संपूर्ण चरित्र कवीच्या समृद्ध जीवनाचा मागोवा घेते, त्यांच्या अस्वस्थ बालपणापासून आणि त्यांच्या तितक्याच त्रासदायक प्रेमसंबंधांपासून, पुरोगामी लेखक चळवळीतील एक प्रख्यात व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा उदय आणि हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळातील गीतकार म्हणून त्यांनी १९४९ पासून १९८० पर्यंत केलेला प्रवास खूप छानपणे लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांनी मांडला आहे. तो वाचनीय आहे त्यामुळे तो जरूर वाचा आणि साहिरने सांगितलेला प्रेमाचा संदेश सर्व मानव जातींना पाठवा. या लेखाचा शेवट साहिरने लिहिलेल्या प्रेमाच्या गीताने करत आहे.
अल्लाह और रसूल का फरमान इश्क है
यांनी हदीस इश्क है, कुरआन इश्क है
गौतम और मसीहा का अरमान इश्क है
खाक को बुत और बुत को देवता करता ही इश्क
इंतेहा ये है कि बंदे को खुदा करता है इश्क
ये इश्क इश्क है...
धन्यवाद
योगेश गोगवेकर

Comments
Post a Comment