Skip to main content

June te Sone : जुने ते सोने

 रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक:२६२
विषय क्रमांक:४
विषय: जुने ते सोने
शब्दांकन:योगेश गोगवेकर
पत्ता:माहीम,मुंबई

जुने ते सोने हा एक असा वाक्प्रचार आहे की त्यात जुन्या मौल्यवान गोष्टींचे महत्व जपलेले आहे. याचाच अर्थ असा आहे की ज्या काही जुन्या वस्तू किंवा गोष्टी आहे त्या सोन्याप्रमाणे फार महत्वाच्या असतात. सर्व मानव जातीला हे चांगले माहित आहे की सोने हे पृथ्वीवरील दुर्मिळ धातूंपैकी एक असून ते फार मौल्यवान आणि महाग आहे. भारतीय समाज या धातूचा उपयोग लग्न समारंभ, वाढदिवस, कोणत्याही प्रकारचा कौंटुंबिक सोहळा किंवा अतिमहत्वाच्या कार्यक्रमासाठी करत असतो. म्हणून सोने कधीच जुने होत नाही किंवा त्याचे मूल्य कालांतराने कधीच कमी होत नाही. उलट सोन्याच्या मूल्यांची प्रशंसा केली जाते आणि ते फार काळ टिकून राहते. जसे सोने कधीच जुने होत नाही, तसेच जुन्या वस्तू किंवा गोष्टी विश्वासार्हतेचा संदर्भ देत आपल्याला त्यांच्यावर विश्वास ठेवायला लावून त्यांचा वापर सहजपणे करायला लावतात. त्यांचे अनुभवसुद्धा सोन्याप्रमाणे असतात. जरी जुन्या गोष्टींने भौतिक मूल्य गमावलेले असले तरी त्यांची वास्तविक मुल्यांची नेहमी प्रशंसाच होत असते आणि त्याच्या निगडीत असलेल्या आठवणी मनात चमकू लागतात. तेव्हा असे वाटू लागते की सोन्याप्रमाणे या वस्तू जपल्या पाहिजे. म्हणूनच अशा वस्तूंना किंवा गोष्टींना आपण जुने ते सोने असे म्हणू लागतो.

जुने ते सोने अशी म्हण मी माझ्या लहानपणापासून ऐकत आहे. त्यावेळी मला असे वाटायचे की प्रत्येक जुन्या गोष्टी वर्तमानकाळापेक्षा चांगल्या का आहेत? जुने सिनेमा, जुनी गाणी, जुने संगीत, जुने कपडे, जुनी भांडी अशा गोष्टी खरोखरच वर्तमानात मिळणाऱ्या गोष्टींपेक्षा चांगल्या का आहेत?  आज वर्तमान जगामध्ये जे मिळते आहे त्या वस्तूंची काहीच मुल्ये नाही का ? असे प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. कारण जग हे प्रत्येक क्षणी बदलत असते. नवीन पिढी नवीन जीवनांकडे अधिक चांगल्या सुविधांसह वाटचाल करीत आहे. आपले जीवन आरामदायी आणि अधिकच सोपे बनविण्यासाठी चांगल्या प्रकारच्या नवीन गोष्टी वापरत आहे. अशावेळेस आपल्याला सहसा वाटत राहते की बदलत्या जगाला जुन्या जगाची गरज नाही. आज जग पूर्णपणे नवीन गोष्टींवर अवलंबून आहे. तरीसुद्धा आपण म्हणत असतो की जुने ते सोनेच असते. त्याची अनेक उदाहरणे आपण पाहत असतो. याला कारण म्हणजे अलीकडच्या जगातला बऱ्याच गोष्टींचा दर्जा खालावलेला दिसत असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नवीन बांधकाम केलेल्या इमारतीपेक्षा जुन्या इमारती फारच मजबूत असतात आणि जास्त काळ उभ्या राहत असतात. काहीवेळेस असेही पाहण्यात येते की जुनी माणसे मग ती श्रीमंत असो वा गरीब असो निरोगी आणि दीर्घायुष्य जीवन जगतात. या जुन्या लोकांना जीवनाचा चांगला अनुभव असल्यामुळे त्यांच्याकडून आनंदी जीवन कसे जगावे हे जाणून घेणे फारच महत्वाचे असते. प्रत्येक क्षणी जीवन बदलत राहणार हे खरे आहे आणि मानवाच्या प्रगतीसाठी ते जरुरीचे आहे. काही मुलभूत सिद्धांत आहेत ज्यावर ही प्रगती केली जाईल पण त्याचे मुल्यांकन मात्र लगेच न होता ते जुने झाल्यावरच होईल. कारण एखादी गोष्ट जुनी झाली तरच त्याची किंमत जास्त होत जाते. म्हणूनच जुने ते सोने अशी म्हण प्रचलीत झाली असावी.

वर्तमान जग हे नेहमीच बदलत राहणार, त्याचा परिणाम जागतिक आर्थिक व्यवस्थेवरपण होत राहणार परंतु भूतकाळ मात्र नेहमी चातुर्याने उभा राहणार. जुनी माणसे आणि त्यांची कृत्ये मानवजातीला उपयोगी पडणाऱ्या गोष्टींची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून उपयोगी पडणार. काही जुनी पुस्तके किंवा प्राचीन ग्रंथ यांची किमत आजही खूप मोठी आहे. त्याचप्रमाणे जुन्या नाणीसुद्धा खूप महत्वाची आहेत. जुन्या काळातील दागिने नव्या काळातील दागीन्यांपेक्षा फार महत्वाचे राहणार कारण आजच्या काळातील दागिने वजनाने हलके आणि कमी मजबूत असतात. जरी जुन्या दागिन्यांचा वापर फक्त देवळात होत असला तरी त्यांची किमत नवीन दागिन्यापेक्षा अधिकच असते. अशी बरीच उदाहरणे आपल्याला पाहता येतील. याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर हिंदी चित्रपट सृष्टीतील जुनी गाणी आणि संगीताचे देता येईल. आजही ही जुनी गाणी आणि संगीत सर्वजण ऐकत असतात कारण त्या संगीतात लय, ताल आणि सुरांचा चांगला समतोल तर आहे पण त्या गाण्यातील भाव प्रत्येक माणसाच्या हृदयाचा ठाव घेत असते. त्या गाण्यात मानव स्वतःचे प्रश्न शोधत असतो. म्हणून ती गाणी आजही लोक गात आहेत. जेव्हा आपण वर्तमान काळातील या सिनेसृष्टीतील गाणी आणि संगीत ऐकतो तेव्हा ती गाणी आपल्याला आवडतात पण अशी गाणी मनाचा ठावा घेत नाही कारण ती गाणी फक्त आर्थिक फायदा लक्ष ठेवून लिहिलेली असतात. म्हणून ती गाणी अल्प कालच टिकून राहतात. याचाच अर्थ जे जुने आहे ते मानव जातीच्या कल्याणासाठी निर्माण झाले होते त्याचा फायदा आजही मानवजातीला नवीन गोष्टींची निर्मिती करण्यासाठी होत आहे. जर माणसाने जुन्या गोष्टी लक्षात न घेता नवीन गोष्टींची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला तर तों बहुतेक नवीन गोष्टींची शुद्धता हरवून बसेल. म्हणूनच जुने ते सोने हे अनेक प्रसंगी वैध आहे.

जरी आपण कितीही म्हटले की जुने ते सोने आहे याचा अर्थ माणसाने नवीन काही निर्माण करू नये असा मात्र नाही. हे खरे आहे आहे की जुने तत्वज्ञान, कथा , प्राचीन ग्रंथ चांगले आहेत. जुन्या म्हणी किंवा कविता अजूनही वैध आहेत. रामायण, महाभारत, भगवद गीता आणि पौराणिक ग्रंथ त्याचप्रमाणे जुनी नाटके, कथा, कादंबरी, ललित लेख, वैचारिक लेख, ऐतिहासिक पुस्तके, वैज्ञानिक शोध यांचे एक अद्वितीय स्थान आहे आणि या गोष्टी जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे जरी खरे असले तरी इथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येक जुनी गोष्ट ही सोने असू शकणार नाही. आजच्या जगात पुराणातील कथांना महत्वाचे स्थान असणार नाही. जग कुठेतरी आपल्या कल्पनेच्या पुढे विकसित झालेले असते. म्हणूनच आपल्याला आजच्या जगासोबत बदलावे लागणार आहे. विकास आणि नवीन तंत्रज्ञानाची प्रगती जरुरीची आहे. म्हणून नुसत्या जुन्या मूल्यांना चिकटून राहण्यास अर्थ राहणार नाही. नवीन निर्मिती करताना ज्या काही घडामोडी अशा घडल्या आहेत की त्यातून भूतकाळात सर्व काही आताच्यापेक्षा चांगले होते हा एक गैरसमज होता असे दिसून येते. या विचारामुळे आपण आपल्या समकालीन गोष्टींमध्ये काही चांगले किंवा शुद्ध आहे हे सारखे नाकारतच असतो. भूतकाळात काही चांगल्या गोष्टी होत्या यात कुठेही शंका नाही पण वर्तमानात महिलांना मिळणारे शिक्षण त्यांना आज सक्षम बनवीत आहे हे सुद्धा एक निर्विवाद सुंदर सत्य आहे हे कसे नाकारता येईल. पूर्वी बऱ्याच सुविधा महिलांना उपलब्ध नव्हत्या आणि त्यांचा उल्लेख प्राचीन ग्रंथात गुलाम आणि दासी असा केला जात होता. हे काही सोन्यासारखे होते असे म्हणता येणार नाही. आज स्त्रिया अनेक क्षेत्रात आपले पाय घट्ट ठेवून उभ्या आहेत. त्यांनी स्वतःच्या कतृत्वाने अनेक क्षितिजे पार केली आहेत. त्याचप्रमाणे शिक्षणाबद्दल म्हणता येईल. आज मिळणारे शिक्षण मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन तयार करीत असते ते पूर्वीच्या शिक्षणात दिसत नव्हते. अशा वेळेस जुने ते सोने प्रत्येक बाबतीत बोलणे चुकीचे ठरेल.

जुने ते सोने हे वाक्य जरी योग्य वाटत असेल तर ते पूर्णपणे योग्य आहे असे म्हणता येणार नाही. यासाठी वर जुन्या गोष्टी कशा चांगल्या आहेत त्याप्रमाणे नवीन गोष्टीसुद्धा आपल्याला नव्याने काहीतरी शिकवत असतात याची जाणीवसुद्धा माणसाला होत असते या बद्दल सांगितले आहे. यासाठी जुने आणि नवीन या दोन्ही गोष्टींचा समतोल साधून माणसाला स्वतःची प्रगती साधायला हवी. याचाच अर्थ असा आहे की जे काही जुने चांगले आहे त्या गोष्टी जतन करून त्याचा वापर वर्तमानात करून नवीन गोष्टी करता आल्या पाहिजे. म्हणून असे म्हणतात की जुने हे सोने आहे आणि ते कधीही विकले जात नाही उलट त्याचा वापर नवीन गोष्टींचा पाया घालण्यात होतो. इथे मला डॉ नोएल यांच्या ग्लोरियस गोल्डन एज (Glorious Golden Age : Old is Gold by Dr Noel ) यांनी लिहिलेल्या पुस्तकाची आठवण येत आहे. त्यात ते लिहितात की जुना काळ हा सुवर्ण काळ असतो. अशा सुवर्ण काळातील आनंद, शांती आणि परिपूर्णता अनेक रहस्ये प्रकट करीत असतात. ज्यात प्रख्यात लेखकांनी किंवा तत्ववेत्त्यांनी जी तत्वे मांडली आणि समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःच्या कार्यातून त्यांनी आदर्श जीवन उभारले, अशा लोकांचा अनुभव विचारात घेतला तर वर्तमानात नवीन गोष्टींची निर्मिती करताना कोणतेही अडथळे येणार नाही आणि उत्कृष्ट दर्जाची निर्मिती वर्तमानात होईल जी जुन्या काळात नव्हती. म्हणून ते डॉ नोएल आपल्याला जुन्या काळातील म्हणजे सुवर्ण काळातील जीवनाचे तत्वज्ञान परिभाषित करायला सांगतात की त्याचा उपयोग वर्तमान काळात होऊ शकतो.

म्हणून जे काही जुने आहे ते वाया गेले आहे असे न समजता त्याच्या वास्तविक मुल्ये समजून घेऊन वर्तमानात त्याचा उपयोग करणे योग्य ठरेल. कारण जुन्या गोष्टींमध्ये काही आठवणी असतात आणि चांगला अनुभवसुद्धा असतो. काळाच्या कसोटीवर ते उत्तीर्ण झालेले असतात. म्हणून जरी प्रत्येक जुनी गोष्ट सोन्यासारखी नसली तरी ज्या काही चांगल्या जुन्या गोष्टी आहेत, तेव्हा म्हणावसे वाटते, “जुने ते सोनेच असते” कारण सध्याचा जगातील सर्व नवीन गोष्टींचा पाया जुन्या काळात घातला गेला होता आणि आज आपल्याला जे काही मिळत आहे ते सर्व जुन्या शोधांच्या आधारावर लावलेले नवीन शोध आहे.

धन्यवाद
योगेश गोगवेकर  
    

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...