Skip to main content

An Atheist With Gandhi-नास्तिकासोबत गांधी



 विषय : पुस्तकाचे विश्लेषण

पुस्तकाचे नाव : नास्तिकासोबत गांधी
लेखक: गोपराजू रामचंद्र राव उर्फ गोरा
मराठीत भाषांतर : विजय तांबे
शब्दांकन:योगेश गोगवेकर
पत्ता:माहीम,मुंबई

२ ऑक्टोबर या दिवशी महात्मा गांधी आणि भारताचे दुसरे पंतप्रधान  लाल बहादूर शास्त्री  या दोन महान नेत्यांच्या जयंत्या येतात. या दिवशी लोक या दोघांचे संदेश सोशल मिडीयावर पोस्ट करीत या महान नेत्यांच्या जयंती साजऱ्या करतात. त्याप्रमाणे मी सुद्धा या दोन महान नेत्यांनी सांगितलेली एखादे उद्गार पोस्ट करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देत असताना एक गोष्ट माझ्या मनाला खास करून जाणवली ती म्हणजे या दोघांचा जन्म दिवस एकच आहे म्हणून या महान नेत्यांना एकमेकांचे प्रतिस्पर्धी आजचा समाज बनवत आहे. या दोघामधील साम्य स्थळे शोधण्याचा विकृत प्रकार समाज  करताना दिसत आहे. असे करणाऱ्या लोकांना एक गोष्ट का जाणवत नाही की लालबहादूर शास्त्री हे महात्मा गांधींचे निष्ठावंत शिष्य तर होतेच आणि गांधीचेच तत्व समजून घेवून आचरणात आणत होते. अशा लोकांनी इथे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे लालबहादूर शास्त्री हे कधीही महात्मा गांधींचे पर्यायी नेते नव्हते. तरीसुद्धा असे करण्यामध्ये लोकांना काय मजा वाटते हे समजत नाही. असो, आज आम्हाला या दोन महान नेत्यांच्या विचारांची गरज आहे कारण या दोघांचेही नेतृत्व खुजे किंवा संकुचित नव्हते आणि सर्व समाजातील लोकांना, त्यातील घटक पक्षांना एकत्र घेऊन जाण्याची क्षमता या दोघांकडे होती आणि मानवाच्या हितासाठी काम करण्याची त्यांची वृत्ती होती. तेव्हा कृपा करून त्यांना प्रतिस्पर्धी बनविण्याचा विकृत प्रयत्न मात्र करू नका. इथे मी फक्त गांधीवर लिहिलेल्या एका पुस्तकावरचे विश्लेषण लिहीत आहे.

आज ही पोस्ट लिहिण्याचे कारण म्हणजे दोन दिवसापूर्वी गोपराजू रामचंद्र राव यांनी इंग्रजीत  लिहिलेले आणि विजय तांबे यांनी मराठीत अनुवाद केलेले 'नास्तिकासोबत गांधी' हे पुस्तक वाचावयास मिळाले.  हे मूळ पुस्तक इंग्रजीत, ‘An Atheist with Gandhi’ या नावाने उपलब्ध  आहे. या दोन्ही भाषेत हे पुस्तक वाचल्याने मी सर्व वाचक मंडळीना एवढेच सांगेन की कुठल्याही भाषेत असेना हे पुस्तक आवर्जून वाचावे. यामध्ये एका नास्तिकाचा एका आस्तिका बरोबरचा संवाद आहे.  गांधींच्या आसपास अनेक प्रकारची किंवा वेगवेगळ्या विचारांची माणसे वावरत असत. गांधी नेहमी त्यांच्याशी वेळ मिळेल तसा संवाद साधत असत. आपल्या विचारांपेक्षा वेगळा विचार जर कुणी मांडला तरी त्या व्यक्तींचे बोलणे ते नीटपणे ऐकून घेत असत. अशाच प्रकारचा एक संवाद महात्मा गांधी आणि गोपराजू रामचंद्र राव यांच्यामधील आहे. हा संवाद आहे १९४४ ते १९४८ या काळातील आहे आणि संवादाचा विषय आहे आस्तिकता आणि नास्तिकता. दोन परस्पर विचारांची माणसे एकमेकांशी चर्चा करीत आहे, एकमेकांना समजून घेत दोघांमधील नाती घट्ट करताना दिसत आहेत. त्यामुळे हा संवाद खूप वाचनीय झाला आहे.

गोपराजू रामचंद्र राव हे मुळचे आंध्रप्रदेश मधील गांधीवादी नेते पण विचाराने ते पूर्णपणे नास्तिक विचारांचे. सर्वजण त्यांना गोरा याच नावाने ओळखत असत. समाजामध्ये अस्पृशता नाहीशी व्हावी म्हणून त्यांनी आपले जीवन खर्ची केले. ब्राम्हण समाजात जन्म घेऊन सुद्धा त्यांनी आपले कार्य अस्पृश्य समाजासाठी तर केलेच पण आपल्या मुलीचा विवाहसुद्धा एका हरिजन समाजातील  मुलाशी लावून दिला. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी, घरातल्यांनी, मित्रपरिवारांनी त्यांच्यावर बहिष्कार घातला. त्यांनी या सर्व गोष्टींची पर्वा न करता आपले काम चालू ठेवले. ते नेहमी म्हणत असत की सर्व जातींनी एकत्रित येऊन सहभोजन केले आणि आंतरजातीय लग्ने केली तर भारतातील जातीयवाद सहजपणे मोडून काढू शकतो. म्हणून ते देव किंवा ईश्वर यांची संकल्पना मान्य करीत नाही. त्यांच्या मते देव या संकल्पनेमुळेच भारतात जातीयवाद, धर्मवाद पसरलेला आहे. ते ठामपणे सांगतात की ईश्वर माणसाच्या इच्छा स्वातंत्र्यावर मर्यादा घालतो, त्यांना गुलाम बनवतो. देवाच्या किंवा धर्माच्या नावाखाली माणूस कसा पशू होतो आहे हे ते दाखवून देतात. अस्पृश्यतेच्या प्रश्नांवर काम करीत असताना त्यांना आलेला अनुभव, आलेल्या अडचणी आणि त्यांची नास्तिकवादाची भूमिका यावर महात्मा गांधी बरोबर चर्चा करावी म्हणून त्यांनी गांधीना पत्रे लिहिली आणि त्यांची भेट मागितली. सुरुवातीला महात्मा गांधीनी नकार दिला . पुढे गोरा यांच्या कामाचे स्वरूप पाहून त्यांना भेटण्यासाठी महात्माजीने वेळ दिला. या भेटी दरम्यान झालेला संवाद गोरानी आपल्या स्मृतींच्या आधारे या पुस्तकाद्वारे सांगितला आहे.

नास्तिक वादाची भूमिका व्यापकपणे गांधी समोर मांडण्याची गोरा यांची भूमिका या पुस्तकाद्वारे दिसत आहे. याचे कारण गोरा पूर्णपणे समजून आहेत की महात्मा गांधी हे विकसित होणारे व्यक्तिमत्व आहे. गांधीनी आपल्या जीवानाची सुरुवात रघुपती राघव म्हणत देवावर श्रद्धा ठेवणाऱ्या समाजाबरोबर केली खरी पण ते पुढे ईश्वर हेच सत्य म्हणू लागले. त्यानंतर आयुष्यातील अनेक टप्पे पार केल्यानंतर ते सत्य हाच ईश्वर असल्याचे मानु लागले. जेव्हा गोरा यांची भेट महात्मा गांधींशी होते तेव्हा गांधी त्यांना विचारतात , “ईश्वर न मानणाऱ्या माणसाबरोबर काय बोलू ? तेव्हा गोरा त्यांना म्हणतात ,” बापुजी, मी ईश्वर न मानणारा माणूस नाही. मी नास्तिक आहे” आणि त्यांच्या संवादाला सुरुवात होते. तेव्हा गोरा गांधीना सांगतात की, “ईश्वराचे अस्तित्व अमान्य करणे ही नकारात्मक भूमिका आहे. माझा नास्तिकवाद हा सकारात्मक आहे कि जो ईश्वराला अमान्य करण्याच्या गोष्टी ठामपणे सांगतो. पुढे त्यांच्या संवादातून गांधीना हे जाणवले की गोरांची नास्तिक वादांवर खूप खोलवर श्रद्धा आहे. म्हणून ते पुढे गोराना सांगतात, “ मला तुझ्या बोलण्यात आदर्श दिसत आहे. मी अस म्हणू शकत नाही की अस्तित्ववाद बरोबर आहे किंवा तुझा नास्तिकवाद बरोबर आहे. आपण सत्याचे साधक आहोत. चुकीच्या जागी असल्याचे आढळ्यास आपण बदलतो. अशाप्रकारे मी माझ्या जीवनात अनेकदा बदललोय. मी तुला कार्यकर्ता समजतो. तू खरा आहेस की मी खरा हे परिणामच सिद्ध करतील. तू तुझे कार्य सुरु ठेव. जरी तुझी पद्धत विरुद्ध असेल, तरीसुद्धा मी तुला मदत करीन.” अशाप्रकारे त्यांनी गोराना प्रोत्साहन दिले आणि जर का गोरानी पुस्तक लिहिले तर ते त्याला प्रस्तावना लिहितील असे त्यांना सांगितले.  गोरांची हि इच्चा पूर्ण झाली नाही कारण त्या आधीच महात्मा गांधींची हत्या करण्यात आले.

असे अनेक तपशील या पुस्तकात येत असल्यामुळे हे खूपच वाचनीय आहे. गांधींच्या हत्येनंतर तीन वर्षांनी म्हणजे १९५१ रोजी हे पुस्तक इंग्रजीत प्रकाशित झाले. या पुस्तकाला त्यावेळेचे सुप्रसिद्ध गांधीवादी विचारवंत किशोरीलाल मश्रुवाला यांची प्रस्तावना आहे. हल्ली माणसे फक्त सोशल मिडियामध्ये येणारी पोस्ट वाचत असतात. तेव्हा त्यांना माझी एक विनंती आहे की हे शंभर पानी पुस्तक जरूर वाचावे म्हणजे गांधींचे विविध पैलू लक्षात येतात आणि महात्मा गांधी समजून घेण्यात मदत होते.

धन्यवाद
योगेश गोगवेकर

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...