*@yogeshgogwekar*
*महाभारतातील स्त्रिया*
महाभारतात स्त्रियांच्या वर अनेक कथा येतात. त्या कथा का येतात आणि त्या काय आहेत याचा अभ्यास वैचारिक पद्धतीने करणे फार गरज आहे. त्यासाठी ज्यांनी या ग्रंथाचा चिकित्सक पद्धतीने अभ्यास केला आहे , अशा लेखनाचे ग्रंथ वाचणे जरुरीचे तर आहे पण या सर्वांचा शोध घेण्यासाठी मूळ ग्रंथाचे विश्लेषण करणे फार जरुरीचे आहे. अशा कोण स्त्रिया आहेत की त्यांचा उल्लेख महाभारतात वेगवेगळ्या पर्वत येतो. यामध्ये मी गांधारी, कुंती, माद्री, द्रौपदी, अंबिका आणि अंबालिका ही नवे सोडून अन्य स्त्रियांचा उल्लेख करीत आहेत. महाभारतात एकूण अठरा पर्वे आहेत . त्यापैकी काही पर्वात येणाऱ्या स्त्रियांची माहिती करून घेणे जरुरीची वाटते . या स्त्रिया आणि त्यांचा उल्लेख कुठल्या पर्वात आला आहे , ती माहिती खाली दिलेली आहेत.
१. सावित्री – वन पर्व आणि आरण्यक पर्व२
२. माधवी – उद्योग पर्व
३. शकुंतला –आदी पर्व
४. अंबा- आदी पर्व आणि उद्योग पर्व
५. दमयंती –वन पर्व
६. रेणुका –अनुशासन पर्व
७. सुकन्या – आरण्यक पर्व आणि वन पर्व
८. देवयानी-आदी पर्व
९. शर्मिष्ठा – आदी पर्व
१०. विश्वामित्राची अनामिक आई आणि त्याची बहिण सत्यवती- अनुशासन पर्व
११. सुदर्शना- अनुशासन पर्व
१२. ओघवती-अनुशासन पर्व
१३. अप्सरा पंचचुडा- अनुशासन पर्व
१४. रुची-अनुशासन पर्व
१५. उत्तर दिशा-अनुशासन पर्व
महाभारताचा अभ्यास करताना एक गोष्ट नेहमी जाणवते ती म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्त्री पात्रांवर झालेला अन्याय. त्यासाठी वरती दिलेल्या महिलांवर कसा अन्याय झाला याचे चित्र प्रत्येक पर्वाचा अभ्यास करताना जाणवतो. याचे व्यवस्थित विश्लेषण करायचे असल्यास या ग्रंथाचा तटस्थ पद्धतीने अभ्यास केलेल्या विद्वानांशी चर्चा करावी लागेल. तो पर्यंत या कथा वाचून स्वतःचे आकलन करणे पण जरुरीचे आहे.
धन्यवाद
योगेश गोगवेकर
Comments
Post a Comment