Skip to main content

Ved-वेड

 रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक : २३२
विषय क्रमांक : ३
विषय : वेड
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता: माहीम ,मुंबई
संकेत स्थळ :

वेड हा शब्द आपण बऱ्याचदा वेगवेगळ्या प्रकारे वापरत असतो. याचाच अर्थ असा आहे की वेड या शब्दाला निश्चित अर्थ असलेली व्याख्या नाही. सर्व सामान्य समाजात वेड ही एक मनाची स्थिती असल्याचे मानले जाते. जेव्हा माणसाच्या मनाची परिस्तिथी वेड लागल्या प्रमाणे असेल तर त्याने केलेले व्यवहार सुद्धा कायद्याच्या दृष्टीकोनातून अपात्र ठरविले जातात. यामध्ये वेड म्हणजे मूर्खपणा. कुठलाही विचार करताना सारासार विवेक नसणे किंवा मनाचा समतोलपणा नसणे असा होतो. पुष्कळ वेळेस वेड हा शब्द आपली एखादी आवड सांगण्यासाठी सुद्धा वापरला जातो. एकाला वाचन करायला आवडते तेव्हा आपण म्हणतो की त्या व्यक्तीला वाचनाचे वेड आहे. जर एखाद्याला संगीताची आवड असेल किंवा क्रिकेटच्या खेळाची आवड असेल तर आपण म्हणतो त्या व्यक्तींना संगीताचे किंवा क्रिकेटचे वेड आहे. काही माणसे संशोधन करून सत्याचा शोध घेण्यासाठी सतत झटत असतात तेव्हा त्यांच्या सतत झटून काम करण्याच्या क्रियेलासुद्धा वेड लागल्याप्रमाणे काम करणे असे म्हणत असतो. जेव्हा एखादे प्रेमी युगल एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात तेव्हा त्यांची परिस्थिती वेड्यासारखी झालेली असते. म्हणून मला इथे एका मराठी गाण्याची आठवण येत आहे. त्या गाण्यात प्रियकर आणि प्रेयसी आपल्या मनाची भावना सांगताना म्हणतात ,” जे वेड मजला लागले, तुजला ही ते लागेल का, माझ्या मनाची ही व्यथा, कुणी तुला सांगेल का”, तेव्हा असे जाणवते की कुठलीही भावना हि आंतरिक प्रेरणेशिवाय तयार होणार नाही आणि ही प्रेरणा सततच्या चिंतनाने मनात येऊ शकते. म्हणून त्यासाठी वेड्यासारखे झटत राहिले पाहिजे. म्हणून वेड या शब्दाचा अर्थ इथे अतिशयोक्तीपूर्ण किंवा क्षणिक उत्साह म्हणून वापरला आहे.

ज्ञान, विचार, स्मरणशक्ती , कल्पनाशक्ती, भावना व चेतना या गोष्टी जाणीव व बुद्धि यामुळे ज्या ठिकाणी घडतात त्या ठिकाणाला मानवी मन असे म्हटले जाते. म्हणून असे म्हटले जाते की कबुतरालासुद्धा गरुडाचे पंख लावता येतील पण त्यासाठी माणसाच्या मनाला गगनभरारीचे वेड असणे जरुरीचे आहे. त्यामुळे माणसाच्या मनाला वेगवेगळ्या प्रकारचे वेड असू शकते. जर सौंदर्याचा विचार केला तर आपल्याला जाणवेल की मानवी मन हे सौंदर्यासक्त आहे. सुंदर किंवा आकर्षक दिसण्यासाठी तो स्वतःला अनेक प्रकारे नटवत असतो. प्राचीनकाळी तो स्वतःला फुलांनी, झाडाच्या पानांनी किंवा पक्षांच्या पिसांनी स्वतःला नटवत असे. मागच्या सात आठ दशकात सौंदर्याच्या वेशभूशेत अनेक बदल झाले आणि नवीन नवीन प्रसाधने, कपडे यांचा वापर औद्योगिक बाजारात होऊ लागला आणि माणसाला फँशन नावाचे वेड लागले. हे वेड वाढविण्यास सिनेमा औद्योगानेसुद्धा हातभार लावला आहे. सिनेमात काम करीत असलेल्या नटनट्यांचा तरुण पिढीवर पडलेला  प्रभाव आणि त्यांचेच अंधानुकरण करण्याची पद्धत ज्याप्रमाणे तरुण पिढीत आहे, त्यामुळे फँशन उद्योग फार तेजीत चालू लागला आहे. म्हणूनच अनेक वेगवेगळ्या उद्योग समूहांनी निरनिराळ्या कपड्यांच्या जाहिराती करून दूरदर्शनवर फँशन परेड, फँशन शो सारखे कार्यक्रम आयोजित करत लोकप्रियता मिळवलेली आहे. माणसाच्या या फँशन वेडामुळे सभ्यता आणि संस्कार यांचा जरी विवेक सुटल्यासारखा वाटत असला तरीसुद्धा त्यावर आधारलेले अनेक उद्योगधंदे निर्माण झाले आहेत हे सत्य पण मान्य केले पाहिजे. काळानुसार फॅशन बदलत जाते. आज निर्माण झालेली फँशन उद्या जुनी झालेली असते. हे कालचक्र अखंड चालूच राहणार आहे आणि त्यात माणसाचे फँशन वेड कधीही कमी होणार नाही. हे निर्विवाद सत्य आहे.

फँशनप्रमाणे माणसाला आज अजून एका गोष्टीचे वेड लागले आहे . ते म्हणजे सोशल मिडियाचे आणि इंटरनेटचे. सोशल नेटवर्किंग वेबसाईटने आज जगात धुमाकूळ घातला आहे. या नेटवर्कचे अनेक फायदे आहेत पण त्याचा वापर फक्त द्वेष पसरविण्यास आणि चुकीची माहिती देण्यास होत असेल तर ते मानवी जीवनासाठी खरोखरच चांगले नाही. ही चिंता वाढविणारी गोष्ट आहे. पूर्वी लोकांची भेट झाल्यावरच अनेक गोष्टींचा उलगडा होत असे पण सोशल नेटवर्किंगमुळे आपण जगामध्ये कुठेही असलेल्या व्यक्तींशी संवाद साधू शकतो आणि त्यांच्यासोबत सकारात्मक आणि नकारात्मक अनुभव शेअर करू शकतो. हा सर्वात महत्वाचा उपयोग या सोशल नेटवर्किंगचा आहे. तरीसुद्धा असे वाटत राहते की सोशल मिडीयाचे फायदे होण्यापेक्षा तोटे अधिक आहे. चुकीचे मजकूर पोस्ट करणे, बेकायदेशीर सामग्रीचे प्रदर्शन करणे, गोपनीयतेचे उल्लंघन करणे असे अनेक प्रकार वेगवेगळ्या प्रकारचे धोके निर्माण करीत आहे. यात किशोवयीन मुले आणि मुली इतर खेळ खेळण्याऐवजी सोशल मिडीयावर आपला बराच वेळ घालविताना दिसत आहे. त्यांना सोशल मिडियाचे जणू व्यसनच लागले असल्याचे जाणवत आहे. फोटोग्राफी आणि मॉडेलिंग यांचे वेड या किशोरवयीन आणि तरुणपिढीला असतेच, मग ही मुले फोटो काढतात आणि सोशल मिडीयावर पोस्ट करतात. त्यात त्यांना अधिक पसंदी दिली गेली की खुश किंवा आनंदी होतात. जर त्यांना पसंदी पाहिजे तशी मिळाली नाही की मग हि तरुणपिढी खूपच नाराज होताना दिसतात. मुलांना स्मार्टफोन दिल्याने सोशल मिडियाचे वेड वाढून परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे. त्यामुळे आजचे बरेच विद्यार्थी आपले लक्ष अभ्यासावर देण्यापेक्षा फेसबुकवर, ट्विटरवर किंवा इंस्टाग्रामवर आपल्या मित्रांशी संपर्क साधण्यामध्ये वेळ घालावीत असतात. हे सोशल मिडियाचे वेड फक्त तरुण किंवा किशोरवयीन मुलांमध्येच नसून प्रौढ व्यक्तींमध्ये सुद्धा दिसून येत आहे. एखाद्या कार्यक्रमात प्रौढ व्यक्ती स्मार्टफोनवर काही ना काहीतरी पाहत असतात आणि समोर भेटलेल्या माणसांशी फक्त तुटक संवाद करत असते. त्यामुळे हवा तसा संवाद होत नाही. ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. मग सोशल मिडियाचे वेड खरोखरच फायद्याचे आहे का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. सोशल मिडियाचे वेड चांगल्या गोष्टींसाठी वापरून माणसाला त्याचे जीवन चांगले करता येऊ शकते. जगभरातील चालू घडामोडींशी सुसंगत राहून, रचनात्मक चर्चा करून माणूस आनंदी राहू शकतो. नको असलेल्या वादविवादामध्ये भाग घेऊन आपला मौल्यवान वेळ वाया जाणार नाही याची काळजी त्याने घेतली पाहिजे. तरच सोशल मिडियाचे वेड हे मानवी जीवनासाठी चांगले असे आपण म्हणू शकतो.

वर म्हटल्या प्रमाणे माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे वेड असू शकते. त्यापैकी एक आहे वाचन वेड. आजच्या धावपळीच्या युगात हे वेड जपणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. ज्या माणसाला वाचनाचे वेड आहे अशी माणसे जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी विविध प्रकारची पुस्तके विकत घेऊन आपली हौस भागवत असतात. ही माणसे दर महिन्याला सात ते आठ पुस्तके सहज वाचून काढतात. अशा लोकांसाठी वाचन म्हणजे त्यांचा श्वास होऊ लागतो. वाचनाशिवाय त्यांना जगणे अशक्य होऊन जाते. वाचनाने माणसाचे मनोरंजन होते, त्याला नवीन ज्ञान मिळते, जगाकडे पाहण्याचा नवीन दृष्टीकोन त्याला मिळतो. वाचन माणसाला बहुश्रुत बनवते आणि चिंतन करण्याची क्षमता वाढविते. त्यामुळे माणसामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन तयार होण्यास मदत होते. त्यातून त्याची शोध घेण्याची प्रवृत्ती तयार होत जाते. म्हणूनच ग्रंथ वाचन हे ज्ञान मिळविण्याचे एक साधन असल्यामुळे त्याचा उपयोग माणूस त्याच्या बुद्धीच्या जीवावर योग्य पद्धतीने ग्रंथाचे चिंतन, मनन करून स्वतःच्या बुद्धीनुसार त्याचे आकलन स्वतंत्रपणे करत जातो. माणसाला निसर्गत: जी बुद्धी प्राप्त झालेली असते ती त्याच्या जीवनाची सर्वोच्य शिखरे गाठण्यासाठी पुरेशी नसते. त्याला प्रतिभाशाली बनण्यासाठी स्वतःच्या बुद्धीला अनेक अंगाने फुलविता आले पाहिजे आणि हे केवळ ग्रंथ वाचनामुळे होऊ शकते कारण ग्रंथ वाचन माणसाच्या विचारांच्या कक्षा विस्तारण्यात मदत करीत असतात. त्यामुळे ज्ञानाचा साठा वाढत जातो. मग त्या विस्कळीत साठ्याची मांडणी सुव्यवस्थित करण्यासाठी लेखन करावे लागते आणि विद्वानांच्या सहवासात राहावे लागते. तेव्हा कुठे आपल्या चिंतनाचा आशय काय आहे आणि त्याच्या मर्यादा काय आहे याची जाणीव होऊन माणूस स्वतःची प्रतिभा मोठी करू शकतो. त्यामुळे ग्रंथाचे वाचन वेड हे फार महत्वाचे आहे. नाना प्रकारची माहिती आपल्याला ग्रंथातून मिळत असते. इथे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे ती म्हणजे सर्वच ग्रंथाचे लेखक ज्ञानी, विवेकी किंवा सत्याचा शोध घेऊन लिहिणारे असतील असे नाही. तेव्हा असे लिखाण सत्याच्या आधारे तपासून पहिले पाहिजे. त्यासाठी चांगले निवडून स्वीकारावे लागते आणि आंधळेपणाने कोणतीही गोष्ट न स्वीकारण्याची सवय ठेवावी लागते. तरच हे वाचन वेड आपल्याला उपयोगी पडू शकेल. म्हणून माणसाने नुसते शैक्षणिक पदवीधारक होऊन चालणार नाही तर वाचन करून आपल्या प्रतिभेचे कमळ फुलविले पाहिजे. त्यासाठी त्याला वाचन वेड जोपासावे लागेल.

माणसाला आयुष्यात कोणतेतरी छंद असणे जरुरीचे आहे. याच छंदांना काही माणसे वेड असा शब्द वापरतात. या लेखात वर म्हटल्या प्रमाणे माणसाचे तीन प्रकाचे छंद हेच त्याचे वेड असते हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारचे वेडच माणसाला नवीन निर्मितीकडे घेऊन जाऊ शकतो. मग ते वेड संगीताचे असो किंवा खेळाचे. वाचनाचे असो किंवा लिखाणाचे. असे वेड आयुष्याच्या प्रवासात आपल्याला सोबत करीत असतात. गाण्याचे वेड नसते तर लता मंगेशकर किंवा आशा भोसले सारखे अजरामर गायक झाले असते का? किंवा क्रिकेटच्या वेडापायी मेहनत घेत सचिन तेंडूलकर सारखा उत्तम दर्जाचा फलंदाज क्रिकेटमध्ये तयार झाला असता का? असे अनेक प्रश्न आपणास सकारात्मक उत्तरे देऊन जातात. सुप्रसिद्ध मराठी लेखक व.पु. काळे आपल्या एका कथेत म्हणतात की, ”प्रत्येक माणसाचे आयुष्य म्हणजे एक पुस्तक असते. खोड रबर न वापरता लिहिल्या जाणाऱ्या या ग्रंथात एक छंद नावाचे सोनेरी पण आपण हवे तसे सजवलं आणि रंगवलं तर आठवणीच्या हिंदोळ्यावर,हिंदोळे घेत भूतकाळाच्या आठवणींची रांगोळी आयुष्याचे अंगण छान खुलवते. त्यासाठी प्रत्येकाला कसला तरी छंद हवा किंवा कशाचे तरी वेड असावे लागते”. तरच त्यातून आपण काही शिकू शकतो आणि काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करू लागतो. मग आयुष्याच्या मरगळीलाच पूर्णविराम मिळतो आणि माणूस प्रतिभाशाली होण्यास मदत होते. म्हणून प्रत्येक मानवाला कुठल्यातरी प्रकारचे वेड असणे गरजेचे आहे. त्यामुळे वेड हा शब्द माणसाची मानसिक स्थिती बिघडली आहे हेच दाखविण्यासाठी नसून आयुष्यात स्वतःचे ध्येय गाठण्यासाठी सुद्धा या शब्दाचा उपयोग होऊ शकतो. म्हणूनच एखाद्या गोष्टीचा शोध घेताना माणूस त्या गोष्टीमागे झपाटल्या सारखा मागे लागतो तेव्हाआपण सर्वजण त्या माणसाला त्या गोष्टीचे वेड लागले आहे असाच शब्द प्रयोग वापरत असतो .

धन्यवाद 
✍🏻 योगेश गोगवेकर

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...