Skip to main content

14th April 2023

 

१४ एप्रिल २०२३ , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३२व्य जयंतीच्या निमित्ताने

महात्मा गांधी , गुरुदेव रवींद्रनाथ टागोर , पंडित जवाहरलाल नेहरू , नेताजी सुभाषचंद्र बोस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरीत्रांबद्दल मला नेहमीच आकर्षण वाटत आले आहे, त्यामुळे त्यांच्यावर कितीही वाचले गेले असले तरी त्यांना समजून घेताना किंवा त्यांनी केलेल्या कामाचे आकलन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे वाचन सारखे करीत राहणे जरुरीचे वाटत राहते. या सर्वांमध्ये डॉ. आंबेडकरांचे जीवन समजून घ्यायचे असेल तर त्यांच्या विचारांच्या आणि कृतींचा अर्थ लावताना परस्पर विरोधी प्रेरणा लक्षात घ्याव्या लागतात. एका बाजूला त्यांना सामाजिक विषमता संपवून टाकण्यासाठी संघर्ष करावयाचा होता. त्यामुळे त्यांचा हिंदू समाजावर राग होता पण दुसरीकडे त्यांचे मन भारतीय होते आणि त्यांना भारतीय म्हणूनच राहायचे होते. सायमन कमिशन पुढील साक्ष असो किंवा गोलमेज परिषदेतील भाषण असो; अर्थातच अनुसूचित जातीच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न वगळता  त्यांच्यातील प्रखर राष्ट्रवाद नेहमीच दिसून येतो. १९३८ मध्ये केलेल्या एका भाषणात ते म्हणतात ,” काही लोक म्हणतात की आपण प्रथम भारतीय आहोत, आणि नंतर हिंदू किंवा मुस्लीम आहोत. मला हे पसंत नाही. हे पुरेसे वाटत नाही .धर्म, संस्कृती आणि भाषा वगैरेतून निर्माण होणाऱ्या कोणत्याही स्पर्धक निष्ठेमुळे आपली भारतीय म्हणून असलेली निष्ठा धोक्यात येता कामा नये. लोकांनी भारतीय आणि फक्त भारतीय राहावे, असे मला वाटते. त्याखेरीज अन्य काही असू नये”. डॉ. आंबेडकरांच्या अंत:करणाच्या गाभाऱ्यातून हे बोल उमटले होते. कोणताही राष्ट्रवादी त्याची बरोबरी करू शकणार नाही.  

डॉ. आंबेडकर यांचे आधुनिक भारताच्या इतिहासात मानाचे स्थान निर्विवाद आहे. ते एक ज्ञानमार्गी बंडखोर होते. त्यांनी निर्माण केलेली ग्रंथसंपदा वाचल्यानंतर एक गोष्ट सातत्याने जाणवते की त्यांच्या इतका विद्वान विचावंत भारतात जन्माला यासाठी परमेश्वराचे आभार मानले पाहिजे. अशा या महापुरुषाला त्यांच्या जयंतीच्या दिवशी त्रिवार सलाम.

आम्ही आमच्या आयुष्याच्या शेवट पर्यंत तुमचे ऋणी राहू. कारण तुम्हीच आम्हाला संविधान तर दिलेच पण संकुचित बुद्धीचा त्याग करून शिक्षणा मार्फत शाश्वत विकास कसा करता येईल याचे ज्ञान दिले.

धन्यवाद

योगेश गोग्वेकर

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...