Skip to main content

Padadyamagach Saty -पडद्यामागचं सत्य

 रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक : २०५
विषय क्रमांक : ४
विषय : पडद्यामागचं सत्य
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम मुंबई
संकेत स्थळ :

काही सार्वजनिक गोष्टी अशा घडतात की त्यांची बहुतेक लोकांना माहितीच नसते. अशाच गोष्टीना आपण नेहमी पडद्यामागचं सत्य असे म्हणत असतो. जास्त करून हे शब्द चित्रपटसृष्टीसाठी वापरले जातात. पण या शब्दांचे अनेक अर्थ आहेत. बहुतकरून या शब्दांचा मुख्य वापर दृश्याबाहेर घडणाऱ्या गोष्टी दर्शवण्यासाठी होतो. म्हणून पडद्यामागचं सत्य हे दोन शब्द वेगवेगळ्या परिस्थितीनुसार त्या परिस्थितीचा अर्थ समजून वापरले जातात. याचाच अर्थ असा की जे खासगीत किंवा गुप्तपणे घडत आहे ते सार्वजनिक किंवा सामान्य लोकांना कधीही दाखविले जात नाही. चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्यांसोबत चित्रीकरणादरम्यान घडलेल्या काही आश्चर्यकारक परिस्थिती दर्शवण्यासाठी या शब्दांचा वापर केला जातो. म्हणजे एखादे नाटक करताना रंगमंचाच्या पडद्यामागे काहीतरी घडत असते किंवा एखाद्या चित्रपटाची जेव्हा निर्मिती होत असते तेव्हा त्यातील दृश्ये ही वास्तविक जीवनाशी जोडत असताना पडद्यामागे कशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात याचे वर्णन करण्यासाठी पडद्यामागचं सत्य हे शब्द वापरले जाऊ शकतात. बऱ्याच वेळा आपण असे  पाहतो की एखाद्या गुन्ह्याचे खरे कारण शोधण्यासाठी पोलीस खाते खोटे काल्पनिक गोष्टी रचतात आणि गुन्ह्याचे खरे कारण शोधतात तेव्हा आपण पडद्यामागचे सत्य समोर आले असे म्हणत असतो.

पडद्यामागचं सत्य हे शब्द बहुतेकरून आपण लोकप्रिय व्यक्तींच्या जे आपल्या कार्यात यशस्वी झाले आहेत अशा लोकांच्या बाबतीत जास्त करून वापरत असतो. इथे अनेक सामान्य माणसांना या यशस्वी व्यक्तींची यशोगाथा कशी झाली याचे सविस्तर ज्ञान असत नाही  तेव्हा आपण पडद्यामागचं सत्य असे शब्द वापरत असतो. कारण यशस्वी होतांना या सुप्रसिद्ध व्यक्तींनी कोणत्या अडचणी अनुभवल्या किंवा त्यांनी वाटेत आलेले अडथळे कसे पार केले याची माहिती अज्ञात असते. जोपर्यंत अशी माहिती सामान्य जनतेसमोर येत नाही, तेव्हा त्या गोष्टी पडद्यामागचं सत्य म्हणून ओळखले जाते. मग त्यात भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम असोत, सचिन तेंडुलकर असो, अमिताभ बच्चन असो, रॉजर फेडरेर असो किंवा जागतिक स्तरावरील कोणतीही यशस्वी व्यक्ती असो की त्यांच्या यशाचे रहस्य सामान्य लोकांना समजले नाही तर अशा यशस्वी व्यक्तिमागील कथा ही पडद्यामागची कथा म्हणून ओळखली जाईल. इथे एक गोष्ट नमूद केली पाहिजे की केवळ सुप्रसिद्ध व्यक्तींच्या बाबतीत नाही तर सामान्य माणसांच्या आयुष्यातील सुद्धा काही रहस्ये जी त्यांच्या कौटुंबिक किंवा मित्रपरिवारांना माहित नसतात अशा रहस्यांना सुद्धा पडद्यामागचं सत्य असेच म्हणतात.

आपण अजून काही उदाहरणे पाहू की जिथे तुम्ही पडद्यामागचं सत्य हे शब्द वापरू शकता. समजा तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुम्ही परीक्षेचा अभ्यास करत असाल, तेव्हा तुम्ही अभ्यास करताना जी मेहनत घेता ती सर्वसामान्य माणसांना दिसत नसते. त्याचप्रमाणे तुम्ही एका कार्यालयात काम करणारी व्यक्ती असाल आणि तुमच्या कर्तृत्वाने तुम्ही काम करीत असलेल्या संस्थेला भरपूर फायदा झाला पण त्यासाठी तुम्ही घेतलेली मेहनत गुलदास्त्यात राहते. अशावेळीस त्या विद्यार्थ्यांची मेहनत आणि कार्यालयात काम करणाऱ्या त्या व्यक्तीची मेहनत सामान्य माणसांना माहीत नसते तेव्हा त्या गोष्टींना पडद्यामागचं सत्य असे म्हटले जाते. या शब्दांचा वापर आपण एखाद्या लेखकाच्या मेहनतीससुद्धा वापरू शकतो. एखादा लेखक स्वतःचे पुस्तक लिहितो किंवा एखादा लेख लिहितो, तेव्हा तो खूप संशोधन करीत असतो. ते संशोधन करण्यासाठी त्या लेखकाला खूप मेहनत करावी लागते. पण त्याची मेहनत पडद्यामागचं सत्य बनून राहते. जर आपण ही उदाहरणे व्यवस्थितपणे पाहिली तर आपल्याला जाणवेल की त्या विद्यार्थ्याने, कार्यालयीन कर्मचाऱ्याने आणि लेखकाने निर्माण केलेल्या गोष्टी आपणास दिसतात पण त्यासाठी घेतलेली मेहनत दिसत नसते. विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होतो, कर्मचारी कामात यशस्वी होतो आणि लेखकाचे पुस्तक बाजारात उपलब्ध होते. या एवढ्याच गोष्टी सामान्य माणूस बघत असतो. त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत पडद्यामागचं सत्य म्हणून राहते. 

पडद्यामागचं सत्य हे गुन्हेगारी प्रकरणात बऱ्याचवेळेस दिसून येते. एखादा गुन्हा घडला तर पोलीस त्यामागील गुन्हेगारास पकडतात. त्यासाठी तोच गुन्हेगार आहे हे दर्शविण्यासाठी सबळ पुरव्यांची गरज असते. तो सबळ पुरावा मिळवून पोलीस त्या गुन्हेगाराला न्यायालयात उभे करतात आणि तो गुन्हेगार असल्याची पूर्ण माहिती पुराव्याने न्यायालयात सिद्ध करतात. तेव्हा न्यायाधीश या पुराव्यावरून गुन्हा केलेल्या माणसाला गुन्हेगार म्हणून घोषित करतात. अशावेळीस पोलिसांनी ते पुरावे मिळविण्यासाठी घेतलेली मेहनत व स्वतःच्या प्राणाची लावलेली बाजी या गोष्टी लोकांपर्यंत पोचत नाही, तेव्हा त्या गोष्टींना  आपण पडद्यामागचं सत्य म्हणत असतो. कारण अशा गोष्टी नेहमीच गुप्त ठेवल्या जातात. यातील उत्तम उदाहरण म्हणजे दिल्ली पोलिसांनी भारतीय क्रिकेटमध्ये होणारे मॅच फिक्सिंगचे प्रकार ज्या प्रकारे शोधले आणि पडद्यामागचं सत्य सामान्य लोकांसमोर आणून भारतीय क्रिकेटला गुन्हेगारी जगापासून वाचविले. हे काम करीत असताना त्यांनी पडद्यामागील सत्य बाहेर काढले पण ते शोधताना दिल्ली पोलिसांनी जी मेहनत घेतली ती सर्वसामान्य माणसांना समजणार नाही. म्हणून दिल्ली पोलिसांनी घेतलेली मेहनत हे पडद्यामागचं सत्य बनून राहणार.

पडद्यामागचं सत्य हे विशेषणात्मक शब्द आहेत. त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या परिस्थितीवर अवलंबून राहावे लागेल. एखाद्दी घटना घडली की ती गुप्तपणे घडली आहे आणि ती आपण पाहू शकत नाही. म्हणून त्या घटनेला आपण पडद्यामागचं सत्य असे म्हणतो. चित्रपट किंवा नाट्य सृष्टीत काम करणाऱ्या यशस्वी कलाकारांची माहिती त्यांच्या प्रत्येक चाहत्यांना हवी असते. त्यांना नेहमी पडद्या समोरील दृश्ये पाहण्याची सवय झालेली असते. त्यामुळे पडद्यामागे हे कलाकार काय करीत असतात, त्यांचा दिनक्रम कसा असतो किंवा या कलाकारांचे कुठले प्रेम प्रकरण आहे का अशी माहिती या चाहत्यांना हवी असते. कारण अशा गोष्टी नेहमी गुप्त ठेवल्या जातात आणि त्याची कुठेही वाच्यता होत नाही म्हणूनच आपण सर्वजण त्या गोष्टींना  पडद्यामागच सत्य म्हणून ओळखतो. 

धन्यवाद 

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...