Skip to main content

Jeevan He Jeevan Ki Vanvan : जीवन हे जीवन की वणवण

 रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमांक : १९५
विषय क्रमांक : ४
विषय : जीवन हे जीवन की वणवण
शब्दांकन : योगेश गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई 

माणूस म्हटले की जगणे आले. जर त्याला सुखाने जगायचे असेल तर त्याला सतत काम केले पाहिजे. जर त्याने काम न करता स्वतःचे जीवन सुखमय करण्याचा प्रयत्न केला तर त्याने स्वतःला संपविण्याचा निर्धार केला आहे असेच म्हटले पाहिजे. म्हणून असे म्हणतात की माणूस स्वतःच्या श्रमाच्या भरवशावर जेवू लागतो तेव्हा त्याला त्यात स्वतःचे हित दिसत राहते. जगण्यासाठी संघर्ष आवश्यक आहे कारण त्या संघर्षात त्याला जिंकायचे असते किंवा स्वतःला घडवायचे असते. स्वतःचा उत्कर्ष करून घेणं किंवा विकास करणे हाच मानवजातीचा खरखुरा गुणधर्म आहे. त्यासाठी माणसाला कुठल्याही खडतर मार्गांचा विचार करूनच आपले उद्दिष्ट साध्य करावयाचे असते. म्हणून सुप्रसिद्ध इंग्लिश तत्वज्ञ बट्रेंड रसेल आपल्या, "New Hopes For The Changing The World" या पुस्तकात म्हणतात माणसाला जीवन जगण्यासाठी तीन गोष्टींशी संघर्ष करावा लागतो. त्यातील पहिला संघर्ष आहे निसर्गाशी, दुसरा आहे तो राहत असलेल्या समाजाशी आणि तिसरा आहे त्याला स्वतःशीच करावा लागणारा संघर्ष. असे सांगून रसेल म्हणतात की वरील तिहेरी स्वरूपाचा संघर्ष मानवी जीवनातात कमी अधिक प्रमाणात अखंडपणे चालत असतो.  भारतीय तत्वज्ञानामध्ये मानवी संघर्ष अधिभौतिक, अधिदैविक आणि अध्यात्मिक अशा तीन पातळीवर केला आहे. यात संघर्षाला त्रासदायक, तापदायक आणि दुःखदायक  म्हणून संबोधिले आहे. असे असले तरी हे तत्वज्ञान आपणास सांगत असते की मानवी जीवन हे एका मृगजळासारखे आहे आणि हे जाणून घेण्यासाठी संघर्ष अटळ आहे. याचाच अर्थ असा होतो जीवन घडविण्यासाठी धडपड करणे किंवा कष्ट करणे जरुरीचे आहे. म्हणून जीवन सुखी करण्यासाठी वणवण करणे जरुरीचे आहे.

आपले जीवन जगण्यासाठी सर्व जीव प्रत्येक गोष्टीसाठी वणवण फिरत असतात. मग तो मनुष्य असो किंवा वन्यजीव असो. आपल्या अन्न आणि पाण्याची सोय करण्यासाठी त्याला वणवण फिरावेच लागते. या सृष्टीतील अनेक भागात पाणी आणि अन्नाची खूप कमतरता असते. प्रत्येक ठिकाणी खळखळणारे नदीनाले, पाण्याने भरलेले डोह किंवा झुळझुळ वाहणारे पाण्यांचे प्रवाह असेलच असे नाही. काही ठिकाणी अन्न निर्माण करण्यासाठी सुपीक जमीन असते तर काही ठिकाणी नापिक जमीन असते. अशावेळीस या सृष्टीतील प्रत्येक जीव इकडे तिकडे अन्न किंवा पाणी मिळविण्याठी वणवण करणारच.  यात मानवी जीवन हे खूपच वेगळे आहे. त्याचे स्वरूप, विविध अंगाने बनलेले त्याच्या चिंतानाचे स्वरूप आणि वर्णन यांचे अनोळखे दर्शन आपणास जाणवत असते. जन्माला आल्यापासून माणूस मरेपर्यंत प्रपंच म्हणून, संसार म्हणून घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे चाके फिरवत राहतो. ते करत असताना तो दमतो, थकतो आणि शेवटी थकून हे जीवन सोडून जातो. हे सर्व करताना त्याने स्वतःचा आणि मानवजातीचा विकाससुद्धा केलेला आहे हे विसरून चालणार नाही. त्यासाठी पाणी हा त्याच्या आयुष्याचा महत्वाचा घटक बनला आहे. त्याचे शरीर बऱ्याच अंशी पाण्याने बनले आहे. माणूस एक वेळ अन्नाशिवाय राहू शकेल पण पाण्याशिवाय नाही. त्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्याला वणवण करावी लागत आहे. पाणी हे माणसासाठी जीवन आहे. त्याला  पाण्यासाठी करावी लागणारी वणवण थांबवायची असेल तर पाण्याचा मुबलक साठा तयार करण्यासाठी अनेक वैज्ञानिक प्रकल्प तयार  करावे लागतील जेणेकरून त्याला पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही. 

'जगाच्या पाठीवर' नावाचा एक मराठी चित्रपट चाळीस वर्षांपूर्वी येऊन गेला होता. त्यात एक गाणे होते. एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे | जरतारी  हे वस्त्र मानवा, तुझिया आयुष्याचे|| खरोखरच या गाण्यात कवी ग. दि. माडगूळकारांनी मानवी जीवनाचे खरे स्वरूप सांगितले आहे. एखाद्या गोष्टीसाठी माणूस सुखाच्या भ्रामक कल्पनेच्या मागे धावत असतो. अशावेळी त्यातील सुखाचे आणि दुःखाचे प्रमाण किती व्यस्त असते हे तो अनुभवत असतो. हे तत्वज्ञान सर्व मानवाला व्यवस्थितपणे लागू पडते. मग तो दिवसभर अंग मेहनत करणारा मजूर असो किंवा लक्षावधी रुपयांची उलाढाल करणारा श्रीमंत मनुष्य असो. असे कितीतरी प्रश्न मानवी जीवनाशी वेढून असतात. कधी त्याची उत्तरे सापडतात तर कधी नाही. कधी तडजोड करावी लागते तर कधी गुंता सुटत नाही म्हणून दोरच कापावे लागतात. मग हेच तुटलेले दोर वेगळ्या प्रकारे जीवनात परत नावीन्य निर्माण करीत येत असतात. कुणाचे जीवन कधी कुणाला काय शिकवून जाईल तर कुणाला त्यातून काहीच बोध होणार नाही. क्षणभर असे समजुया की आयुष्य नुसते गोड गोड असते किंवा  संकटे, अडचणी दुःख या सर्व गोष्टी आयुष्यापासून दूर आहेत. मग प्रश्न पडतो की असे आयुष्य जगण्यात चव आहे का? हे खरे आहे की कधी दुःख लांबते तर कधी नैराश्य पण कधीतरी ते संपणारच. सुख जसे कायम नसते तसे दुःख सुद्धा नसते. उलट सुखापेक्षा दुःख अधिक डोळस वृत्ती तयार करते आणि जीवन समृद्ध करीत असते. म्हणून मानवी जीवनामध्ये एकच धागा सुखाचा असतो तर शंभर धागे दुःखाचे असले तरी वस्त्र जरतारी हे एक महावस्त्र आहे. ते कसे विणायचे  हे माणसालाच शिकायचे आहे. त्यासाठी त्याला जीवनात वणवण करणे जरुरीचे आहे.

सत्तरच्या दशकात आनंद नावाचा एक हिंदी चित्रपट येऊन गेला होता. त्यात मानवी जीवनाचे खूप छान तत्वज्ञान सांगितले गेले आहे. राजेश खन्ना या हिंदी चित्रपट कलाकाराने आनंदची व्यक्तिरेखा आपल्या अफाट अभिनयाने खूप सुंदर बनविली. मृत्यू समोर दिसत असतानासुद्धा आनंद या व्यक्तिमत्वाचा ढंग एकाचवेळी हसवणारा आणि रडवणारा होता. जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नही | हे वाक्य छोटसं आयुष्य सुद्धा छानपणे जगता येत हे सूचित करून जातं. खरोखरच आनंद म्हणतो त्याप्रमाणे जीवन एक सुंदर रंगभूमी आहे. त्यात दोन घडीचा डाव आहे. संघर्ष आहे. त्यात चढउतार हे जरूर असतात. सतत सुख किंवा सतत दुःख असे आढळणार नाही. कुठल्याही क्षेत्रात गेलात तर कोणी मागे तरी असेल तर कोणीतरी फारच पुढे गेलेला असेल. त्यासाठी आपल्याला जीवनात नेहमी गतिमान राहून प्रगतीपथावर जाण्यासाठी प्रयत्न  केले पाहिजे. जरी जीवनाच्या व्याख्या अनेक थोर पुरुषांनी केल्या असल्या तरी स्वतःचे जीवन जगण्याचा अनुभव अधिक महत्वाचा असतो. त्यासाठी मानवी जीवनात प्रेमाला फार महत्व आहे. द्वेष, तिरस्कार माणसांचे जीवन घडवीत नसतात तर ते त्याचे जीवन संपवीत असतात. द्वेष केल्याने माणूस सुखी न होता फार दुःखी कष्टी होतो. त्यासाठीच मानवी जीवनात प्रेम या शब्दाचे अतूट नाते आहे. म्हणून आनंद या चित्रपटात मृत्यू आपल्या समोर दिसत असूनसुद्धा त्यातील नायक उरलेले आयुष्य हसत खेळत जगतो आणि आयुष्य सुंदर करून मृत्यूला जवळ करतो. आयुष्यातील नुसते दुःख गोंजारण्यापेक्षा आजूबाजूला दिसणाऱ्या सुंदर गोष्टी पाहून त्यात आनंदी होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सतत खळखळणारे लहान मुलांचे हसणे, पहाटेच्या प्रहरी कोणीतरी बासरीतून घातलेली साद, आभाळात मनसोक्त फिरणारे पक्ष्यांचे थवे, कोणीतरी सुंदर लिहिलेली कविता वाचताना होणारा आनंद, अचानकपणे आपल्या जुन्या प्रिय व्यक्तीशी झालेली भेट, रंगलेला एक सुंदर क्रिकेटचा खेळ अशा कितीतरी गोष्टी आपले जीवन सुंदर करीत असतात. असे आयुष्य जगण्याचा माणसाने प्रयत्न जरूर केला पाहिजे, मग त्यासाठी कितीही वणवण करावी लागली तरी ती केली पाहिजे. कारण कितीही अडचणी आल्या तरी मेहनतीने जे फळ मिळते त्याने ते जीवन खूपच सुंदर वाटू लागते.

मराठीतील सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर जीवनावर भाष्य करताना आपल्या कवितेत जीवनावर समरसून प्रेम कसे करायचं, कसे जगायचं याचे विश्लेषण करतात. म्हणूनच एका कवितेत ते म्हणतात,
"या जन्मावर, या जगण्यावर,शतदा प्रेम करावे
रंगाचा उघडूनिया पंखा, सांज कुणीही केली
काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे.
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे ".

खरोखरच जीवन सुंदर आहे आणि ते अधिक सुंदर करण्यासाठी वणवण आवश्यक आहे.

धन्यवाद 


Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...