Skip to main content

Posts

Showing posts from July, 2022

Tyacha Abhiman Vatel-त्याचा अभिमान वाटेल

 रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १९७ विषय क्रमांक : ४ विषय : त्याचा अभिमान वाटेल शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई संकेत स्थळ : एखादी चांगली गोष्ट यशस्वीपणे केल्यानंतर निर्माण होणारी भावना म्हणजे अभिमान. याचाच अर्थ ती गोष्ट गौरव करण्यास प्राप्त झाली आहे. अभिमान म्हणजे गर्व नव्हे. गर्व म्हणजे फाजील अहंकार. जर आपण काही चांगल्या गोष्टी केल्या असतील तर त्याचा गर्व किंवा अहंकार बाळगण्या ऐवजी त्याचा अभिमान जरूर बाळगावा तरच त्या कामाचा गौरव केला जातो. याचा अर्थ असा की एखादे काम करताना प्रत्येक व्यक्तीने आपला अहंकार बाजूला ठेवला तरच उत्कृष्ट दर्जाचे काम निर्माण होण्याची शक्यता असते. अभिमान ही भावना नेहमी सुसंस्कृत समाजाचे लक्षण दाखवते तर गर्व किंवा अहंकार ही भावना असंस्कृत समाजाचे लक्षण दाखवत असते. म्हणूनच वैयक्तिक दृष्टया स्वतःच्या मानसिक व बौद्धिक कुवतीचा रास्त अभिमान असणे जरुरीचे आहे. कारण असा अभिमान आपल्याला प्रेरणा देतो आणि आपण काहीही करू शकतो याचा आत्मविश्वास निर्माण करतो. त्यामुळे जी निर्मिती माणसांकडून निर्माण होते त्याचा उपयोग समाजातील प्रत्येक व्यक्तीस होत असतो. प्...

Abhinay अभिनय

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १९६ विषय क्रमांक : ४ विषय : अभिनय शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम , मुंबई " माणूस जन्माला येतो तो एक अभिजात नट म्हणूनच! तो तान्हा असताना रडण्याचा अभिनय करतो. त्याच्या डोळयांत पाण्याचा टिपूस   देखील नसतो. कारण त्याला माहिती असते की रडण्याचा आवाज काढला की , त्याला कोमट दुधाचे घुटके प्यायला मिळतात! जेव्हा तो खरोखर रडतो तेव्हा मात्र त्याच्या डोळ्यांमधून गंगा-यमुना वाहात असतात. त्यावेळी तो अभिनय करीत नसतो. " हा उतारा आहे सुप्रसिद्ध चित्रपट लेखक , दिग्दर्शक , अभिनेते , निर्माते श्री गजानन जगीरदार यांच्या ' अभिनय कसा करावा ' या पुस्तकातील. यात त्यांनी अभिनय कला ही माणसाच्या जन्मापासूनच त्याला मिळालेली मोठी देणगी आहे आणि त्यातला अभिनय कसा ओळखावा याचे अचूक उदाहरण देऊन सांगितले आहे. अभिनय या शब्दाची व्याख्या अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे केली आहे. माझ्या वाचनात आलेली अभिनयाची उत्तम व्याख्या म्हणजे जो कलाकार नृत्य , नाटक , चित्रपट या सारख्या प्रायोगिक कलांमध्ये आपला आशय व्यक्त करण्यासाठी कृती , देखावा , भाषण आणि वेशभूषा या माध्...

Jeevan He Jeevan Ki Vanvan : जीवन हे जीवन की वणवण

 रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १९५ विषय क्रमांक : ४ विषय : जीवन हे जीवन की वणवण शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई  माणूस म्हटले की जगणे आले. जर त्याला सुखाने जगायचे असेल तर त्याला सतत काम केले पाहिजे. जर त्याने काम न करता स्वतःचे जीवन सुखमय करण्याचा प्रयत्न केला तर त्याने स्वतःला संपविण्याचा निर्धार केला आहे असेच म्हटले पाहिजे. म्हणून असे म्हणतात की माणूस स्वतःच्या श्रमाच्या भरवशावर जेवू लागतो तेव्हा त्याला त्यात स्वतःचे हित दिसत राहते. जगण्यासाठी संघर्ष आवश्यक आहे कारण त्या संघर्षात त्याला जिंकायचे असते किंवा स्वतःला घडवायचे असते. स्वतःचा उत्कर्ष करून घेणं किंवा विकास करणे हाच मानवजातीचा खरखुरा गुणधर्म आहे. त्यासाठी माणसाला कुठल्याही खडतर मार्गांचा विचार करूनच आपले उद्दिष्ट साध्य करावयाचे असते. म्हणून सुप्रसिद्ध इंग्लिश तत्वज्ञ बट्रेंड रसेल आपल्या, "New Hopes For The Changing The World" या पुस्तकात म्हणतात माणसाला जीवन जगण्यासाठी तीन गोष्टींशी संघर्ष करावा लागतो. त्यातील पहिला संघर्ष आहे निसर्गाशी, दुसरा आहे तो राहत असलेल्या समाजाशी आणि तिसरा आहे त्याला स्वत...

YUGANDHAR - युगंधर ( लेख )

 रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १९४ विषय क्रमांक : ३ विषय : युगंधर ( लेख ) शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई संकेत स्थळ :  युगंधर या शब्दाचा अर्थ आहे चिरस्थायी. तसे बघायला गेलं तर या शब्दाला अनेक अर्थ आहेत.  युगंधर  म्हणजे लक्षपूर्वक, सक्षम, उदार, आनंदी, आधुनिक, सर्जनशील, भाग्यवान, अनुकूल असेही म्हटले जाते. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला युगंधर या नावाने ओळखण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती व्यक्ती आपल्याला प्रखर विवेकबुद्धी असलेली खगोलीय देवता वाटत असते. अशा व्यक्ती आपल्या सर्वार्थाने जीवन घडवीत असतात. या व्यक्ती जिथं जिथं जातात तिथे आपल्या चाणक्ष बुद्धीने जीवन बिघडवून टाकणारे आव्हान निपटून टाकतात. त्याचप्रमाणे थक्क करणारा नवा अकल्पित अविष्कार जीवनात  घडवीत असतात. तसे करताना त्या व्यक्ती प्रत्येक प्रसंगी वेगवेगळे उपाय त्या वातावरणानुसार हाताळतात. ते करताना त्यांची दृष्टी नेहमी सकारात्मक असते आणि अतिशय डोळसपणे राबविलेली असते. अशावेळीस त्यांचा अहंकार, स्वार्थ मध्ये येत नसतो. दुसऱ्यांना चालना देणे त्यांना खूपच आवडत असते. असे करताना त्यांच्यात प्रामाणिकपण...

Samantar : समांतर (लेख )

 रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक :१९३ विषय क्रमांक : ३ विषय : समांतर (लेख ) शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई संकेत स्थळ :  समांतर हा शब्द आपण बऱ्याच वेळा अनेक ठिकाणी वापरत असतो. समांतर म्हणजे समान अंतरावर असलेला किंवा सोबत चालणारा. हा शब्द जास्त प्रचलीत आहे तो भूमिती शास्त्रात. भूमिती शास्त्रानुसार समांतर म्हणजे समान अंतर होय. एकाच प्रतलात असणाऱ्या दोन सरळ रेषा एकमेकींना कोणत्याही बिंदूत छेदत नसतील तर अशा दोन रेषाना समांतर रेषा असे म्हणतो. पण समांतर हा शब्द बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात आपण वापरलेला पाहतो. उदाहरण द्यायचे झाल्यास समांतर साहित्य संमेलन, समांतर अर्थ व्यवस्था, समांतर आरक्षण वगैरे. आपण सरकार, शासन आणि प्रशासनाचा उल्लेख करताना म्हणत असतो की प्रशासन ही एक समांतर व्यवस्था आहे. जेव्हा आपण प्रशासनाला समांतर व्यवस्था म्हणतो तेव्हा सरकार, शासन आणि प्रशासन यातील फरक जाणून घेतला पाहिजे. भारतीय संविधानानुसार दर पाच वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात. त्या निवडणुकीत आपण एखाद्या पक्षाच्या आमदार खासदारांना निवडून देतो, मग ज्या पक्षाचे आमदार किंवा खासदार बहुसंख्या...