रंग लेखणीचे
परिवार
आठवडा क्रमांक :
१८१
विषय क्रमांक : ४
विषय : नवचैतन्य
शब्दांकन : योगेश
गोगवेकर
पत्ता : माहीम, मुंबई
प्रत्येक मानवी जीवनात नवचैतन्य निर्माण करण्याची गरज नेहमीच पडत असते. तसा तो निसर्ग नियमच आहे. आपण जरी निसर्गाकडे पाहिले तरी आपल्याला दिसून येईल की शिशिर ऋतुमध्ये सृष्टी निष्पर्ण होते आणि वसंत ऋतुचे आगमन होताच हीच सृष्टी वृक्ष वल्लरीना पालवी फुटून निसर्गात एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण होत असते. त्यामुळे या ऋतूत आनंदाला उधाण आलेले असते. शिशिरात आपला हिरवा रंग हरवून बसलेली झाडे परत एकदा नवीन रूप घेऊन आपले जादुई नखरे दाखवीत उभे राहतात. तसेच मानवी जीवन असते. रोज एकच प्रकारचे काम केल्याने माणसांचे आयुष्य कंटाळवाणे झाल्या सारखे वाटत राहते. या एकसूरी आयुष्यातून बाहेर येण्यासाठी प्रत्येक माणूस प्रयत्न करीत असतो. याला कारण म्हणजे माणूस जन्मत: वेगळा असतो. स्वतःच्या काही गुणांमुळे तो स्वतःचे असे वेगळेपण सिद्ध करीत असतो. एखाद्या परिस्थित आपण कसे वागवे की ज्यामुळे आपले नुकसान होणार नाही याची तो काळजी घेत असतो. तरीसुद्धा संवेदनशील मनामुळे त्याच्या जीवनात एकप्रकारचा न्यूनगंड तयार होतो. अशावेळीस गरज असते ती माणसाची अंतर्गत क्षमता जागविण्याची किंवा नवचैतन्य निर्माण करण्याची की जेणेकरून त्याचा आळस, अनुत्साह दूर होऊन तो माणूस नवीन ध्येयाने प्रेरित होईल आणि स्वतःची कामे तो अधिक आनंदाने व उत्साहाने करू लागेल.
मला आठवते की मी रॉबिन शर्मा या लेखकाचे The Monk who sold his Ferrari या नावाचे एक पुस्तक वाचले होते. हे पुस्तक मानवी जीवनासाठी फारच प्रेरणादायी आहे कारण हे पुस्तक एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण करते. यात जुलीयन नावाचा एक यशस्वी वकील आहे की तो सर्व गोष्टींमध्ये परिपूर्ण असतो. पण त्याची जीवनशैली असंतुलित असते. त्यामुळे एक दिवस न्यायालयात काम करीत असताना तो कोसळतो. त्यादिवशी त्याला कळते की एकतर आपण वकिली सोडली पाहिजे किंवा जगण्याची आशा. मग तो आपली सर्व संपत्ती आपल्या फेरारी गाडीसकट विकून टाकतो आणि आपले खरे सुख शोधण्यासाठी भारतात येतो. भारतात तो हिमालयात जातो आणि तिथे त्याला आपल्या जीवनाचे मर्म सापडते. तिथे त्याला जाणवते की मानवी आयुष्यामध्ये ध्येय, स्वयंशिस्त, वेळेचे महत्व आणि नातेसंबंध या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यास जाणवते बहुतेक माणसे महासागरासारखी क्षमता असूनसुद्धा त्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक क्षमतेच्या मर्यादित वर्तुळात राहणे पसंद करतात. आपल्या कामाच्या पलीकडेसुद्धा वेगळे विश्व असते याची त्यांना जाणीव पण नसते. रोजच्या कामात स्वतःला अडकून ठेवल्यामुळे त्यांच्या जीवनात नवीन विचार तयार होत नाही. जर एखाद्याने काही घडामोडींचा अर्थ चुकीचा तर्क लावून सांगितला तर त्यांना त्यात काही गैर वाटत नसते. त्यात त्यांचा आत्मविश्वास ते गमावून बसतात. अशावेळीस या माणसांना हे पुस्तक सांगते की माणसांचे मन एका सुपीक जमिनीसारखे असते. त्यात चांगल्या विचारांना खतपाणी घातलं तर ते अपेक्षेपेक्षा जास्त फुलेल आणि माणसांचा आत्मविश्वास वाढून चांगले काम त्यांच्याकडून होण्याची शक्यता वाढेल. हे पुस्तक पुढे सांगते ती दुसऱ्यांना निस्वार्थीपणाने मदत करा. त्यामुळे तुमचा दर्जा वाढण्यास मदत होईल आणि तुमचे हितसंबंध चांगल्याप्रकारे जपले जातील. असे सांगून हे पुस्तक सांगते की प्रत्येक माणसाने नेहमी वर्तमानात जगले पाहिजे. खोट्या गोष्टींच्या मागे लागून सुखाचा त्याग करू नका. प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत जीवन जगा. भूतकाळ जरूर जाणून घ्या पण त्याचे गुलाम होऊ नका. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार व्हा. असे हे पुस्तक सर्वांनी नक्कीच वाचावे कारण हे पुस्तक मानवी जीवनात नवचैतन्य निर्माण करते.
मानवी जीवनात नवचैतन्य निर्माण करण्याची ताकद संगीतातसुद्धा आहे. संगीत माणसाला एका अनोळखी जगात घेऊन जाते. एखादे सूर जेव्हा कानी पडतात तेव्हा नकळत मानवी मनाला उभारी मिळत असते. तस बघायला गेलं तर सुरांचे वर्चस्व फक्त सात सुरांवरच असते आणि प्रत्येक सुरांचा बाज वेगळा, पोत वेगळा असतो. तरीसुद्धा ते सारे फक्त सात सुरांमध्ये एकत्रित झाले आहे. मध्यंतरी मी बसंत बहार रागातील, "केतकी गुलाब जुही मन वसंत फुले" ही बंदिश ऐकली. ती ऐकताना मला झालेला आनंद मी माझ्या एका संगीत मित्राला सांगितला. तेव्हा त्याने मला सांगितले की बसंतबहार राग हा वसंत रागाचा जोड राग आहे. त्याने मला असेही सांगितले की कुमार गंधर्वांनी गौरी बसंत जो राग लोकप्रिय केला आहे तो सुद्धा वसंत रागाचा जोड राग आहे. जेव्हा मी वसंत रागातील 'कोमल मलय समीरे' ही अष्टपदी ऐकली तेव्हा मला त्यात वसंत ऋतूचे सुंदर वर्णन असल्याचे जाणवले. त्यामुळे माझ्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाल्यासारखे वाटते. Sound is form of energy अशी इंग्लिश भाषेत एक म्हण प्रचिलीत आहे. ती म्हण शंभर टक्के बरोबर असल्याचे अनेक दाखले आपण इतिहासात दिलेले आहेत. यासाठी उत्तम उदाहरण द्यायचे झाल्यास सम्राट तानसेनचे देता येईल. जेव्हा त्यांच्या कंठातून सूर निघतात आणि ते गाऊ लागतात, "झगमग झगमग दिया जला हो" तेव्हा विझलेले दिवे देखील परत पेटत असत. जेव्हा ते राग मल्हार गात तेव्हा आकाशात कृष्णमेघांची दाटी होऊन पाऊस पडत असे. इतके प्रचंड सामर्थ संगीतात आहे. तेव्हा प्रश्न पडतो हे सात सुरांचे संगीत माणसाला कसे मिळाले. यात मराठीतील सुप्रसिद्ध लेखक मारुती चित्तमपल्ली यांनी केसराचा पाऊस या पुस्तकात म्हटले आहे की सृष्टीतील पशुपक्षांकडूनच माणसाला सूर अवगत झाला असावा. ते म्हणतात की मोर षडज सुरात तर चातक ऋषभात, बकरा गांधार तर कोकीळ पंचम मध्ये, बेडूक मध्यम किंवा धैवत आणि हत्ती नाकातून निषाद स्वरांचे उच्चारण करीत असतात. म्हणूनच सात सुरांचा प्रभाव प्रत्येक माणसाला आश्वासक बनवून आधार देत असतात. जेव्हा एखाद्याचे मन उदास निराश असतं तेव्हा त्याची मरगळ घालून त्यात नवचैतन्य निर्माण करण्याचं सामर्थ्य या सात सुरांमध्ये असतते. हे सात सूर मानवी जीवनात नवचैतन्य निर्माण करीत असतात. म्हणून इथे मी एका गाण्याचा उल्लेख करीत आहे. कारण हे गाणे आपणास सांगते की सप्तसूर नेहमीच उदास मनाला उभारी देण्याचे काम करीत असते.
जब दील को सतावे गम
तू छेड सखी सरगम,
बडा जोर है सात
सुरों मे
बहते आंसू जाते है
थम
तु छेड सखी सरगम.
संगीताप्रमाणे अजून एक गोष्ट माणसांमध्ये नेहमी नवचैतन्य निर्माण करते ते म्हणजे वाचन. इथे खासकरून मी चरित्रे किंवा आत्मचरित्रे यांचा उल्लेख करीन. जगातील अनेक व्यक्तिमत्वे अशी आहेत की त्यांचे चरित्रे मला नेहमीच प्रेरणादायीक वाटतात. त्यात सुप्रसिद्ध विनोदी कलाकार चार्ली चॅप्लिन यांचे चरित्र असो किंवा जगाला दुसऱ्या महायुद्धतून बाहेर काढणारे ब्रिटिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांची चरित्रे मला नेहमीच प्रेराणादायक वाटतात. अशी अनेक चरित्रे आहेत की त्यांची नावे आपल्याला माहीत सुद्धा नसतात. जर भारतीय महापुरुषांच्या पराक्रमाच्या गोष्टी वाचल्या तर शिवाजी महाराजांचे चरित्र मला नेहमी प्रेरणा देणारे वाटले. त्यांनी शून्यातून आपले राज्य उभारताना कशा प्रकारे आपल्या लोकांच्या मनगटात पोलादी ताकद जीवघेणी खेळ खेळण्यासाठी निर्माण केली. शिवाजी महाराजांप्रमाणे मला महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आयुष्यसुद्धा खूपच प्रेरणादायी वाटत असते. दक्षिण आफ्रिकेतील आपले काम संपवून महात्मा गांधी भारतात आले तेव्हा त्यांना जाणवले की भारतीय जनता ही गरीब असून त्यांच्याकडे शस्त्र उचलण्याची ताकद नाही आहे. अशा लोकांना बरोबर तर घ्यायचे आहे पण त्यांना स्वातंत्र्याचा अर्थ समजावून लढण्यासाठी तयार केले पाहिजे. शस्त्र उचलणे त्यांना जमणार नाही. त्यासाठी त्यांना अहिंसेचा मंत्र देऊन स्वातंत्र्यासाठी तयार केले आणि चार भिंतीतील चाललेली स्वातंत्र्याची चर्चा त्यांनी सर्व भारतीय लोकांमध्ये आणली आणि भारतीय स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा झाला. महात्मा गांधी प्रमाणे मला डॉ आंबेडकर यांचे चरित्रसुद्धा प्रेरणादायक वाटते. शिक्षण घेण्यासाठी कुठलीही सोय नसताना व्यवस्थितपणे शिकून आपल्या समाजाचा उद्धार करण्यासाठी जे त्यांनी परीश्रम घेतले आहे त्यास तोड नाही. आपल्या समाजाचा उद्धार करताना त्यांनी सर्व भारतीयांचा सुद्धा विचार केलेला आहे. त्यांनी लिहिलेली सर्व पुस्तके आपल्या जीवनात नवीन गोष्टी शिकवुन जातात. ते नेहमी म्हणत की आकाशातील ग्रह तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर मनगट आणि मेंदूचा काय उपयोग. बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे मुख्य ध्येय असले पाहिजे. भारतीय संविधान त्यांनी निर्माण करताना भारतातील सर्व लोकांचा खासकरून तळ्यागाळातील लोकांचा विचार केलेला दिसतो. स्वतःचे जीवन सर्व समाजासाठी वाहिले आणि अस्पृश्यांना त्यांच्या समस्यांचा दरीतून बाहेर काढले. त्यांचे एक प्रेरणा देणारे वाक्य आहे की त्यामुळे आपल्याला आयुष्यात नवचैतन्य निर्माण करण्यास मदत करते. ते म्हणतात, " स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मजबुतीवर विश्वास ठेवा आणि स्वतःची लायकी विद्यार्थीदशेतच वाढवा. बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी उद्दिष्ट असले पाहिजे ".
वर म्हटल्या प्रमाणे संगीत व वाचन मनाला जसे नवचैतन्य निर्माण करावयास मदत करतात त्याचप्रमाणे खेळसुद्धा माणसाला नवचैतन्य निर्माण करण्यास मदत करतात. त्यात मला क्रिकेट हा खेळच मानवी जीवनाशी खूप जवळीक असल्यासारखा दिसतो. चांगले क्रिकेट खेळण्यासाठी फार चांगल्या गुणांची आवश्यकता असते. ते गुण म्हणजे संयम, भावना आणि उत्स्फूर्तता. दरवेळी खेळतांना परिस्थिती नेहमीच वेगळी असते. त्यासाठी धैर्य तर लागतेच पण सवयी बरोबर सर्जनशिलता पण लागते. कधी कधी कठीण परिस्थितीत अद्वितीय खेळ खेळावा लागतो. त्यासाठी नेहमी नावीन्य शोधावे लागते किंवा निर्माण करावे लागते. हा खेळ जिंकणे किंवा हरणे एवढ्या पुरती मर्यादित न ठेवता त्यातील सुंदरता आपण पाहिली पाहिजे. काही गोष्टींमुळे हा खेळ मला प्रत्येक ठिकाणी नवचैतन्य निर्माण करणारा वाटतो. त्या गोष्टी म्हणजे हा खेळ मला सकारात्मक गोष्टी करण्यास मदत करतो. त्यामुळे माझे मन उत्साही राहते. काळजीपूर्वक मी माझ्या भावनांना हात घालू लागतो. या खेळाचा आत्मा मला आपल्या विरोधी असलेल्या लोकांचासुद्धा आदर करण्यास शिकवतो. आपल्या विरोधी पक्षातील माणसाने चांगला खेळ केल्यास त्याची प्रशंसा करण्याची सुद्धा हिम्मत देतो. कठीण परिस्थितीत संकटाचा सामना कसा करावा व धीर कसा बाळगावा असे या खेळामुळे आपणास समजून येते. वाटताना हा खेळ मानवाच्या रोजच्या कार्यक्रमा सारखा वाटतो. नेहमी गोलंदाज चेंडू टाकणार आणि फलंदाज तो खेळणार तरीसुद्धा त्यातील विविधता दिसून येते. त्यामुळे एक प्रकारचा आत्मविश्वास मिळतो आणि उत्साहात वाढ होऊन आपली कार्यक्षमता वाढली जाते आणि एक नवीन प्रकारचे स्वतःचे व्यक्तिमत्व तयार होण्यास मदत होते. माझ्या आयुष्यात बऱ्याचवेळा या खेळाने नवचैतन्य निर्माण केले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मला इंग्रजी लिहिण्याचा किंवा बोलण्याचा सराव या खेळामुळेच झाला.
या लेखाचा शेवट मी कुसुमाग्रज यांच्या कवितेने करीत आहे. ही कविता मला नेहमीच प्रेरणा देणारी वाटते आणिमानवी जीवनात नवचैतन्य निर्माण करणारी वाटते. ती कविता आहे त्यांच्या विशाखा या संग्रहातील. त्या कवितेचे शीर्षक आहे कोलंबसाचे गर्वगीत. त्यातल्या काही ओळी मी देत आहे.
सहकार्यांनो, का ही खंती जन्म खलाशांचा
झुंजण्या अखंड
संग्राम
नक्षत्रांपरी असीम
नीलामध्ये संचरावे
दिशांचे आम्हाला
धाम!
घराची वा वितभर
कारा
मानवतेचे निशाण
मिरवू महासागरात
जिंकुनी खंड खंड
सारा!
चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती
कथा या खुळ्या
सागराला
अनंत आमुची
ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला
पामराला!
धन्यवाद
Comments
Post a Comment