Skip to main content

Posts

Showing posts from April, 2022

Mahastra Maza महाराष्ट्र माझा

 रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १८४ विषय क्रमांक : ४ विषय : महाराष्ट्र माझा शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई संकेत स्थळ :  १ मे १९६० रोजी भारताच्या पश्चिमी भागात मराठी भाषेचे सुंदर राज्य महाराष्ट्र या नावाने निर्माण झाले. तसे बघायला गेलं तर महाराष्ट्र हा प्राचीन काळापासून सुंदर प्रदेश होता. १ मे १९६० रोजी त्याने आपले नवीन रूप धारण केले. मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ आणि मराठवाडा असे अनेक मराठी प्रांत एकत्र येऊन मराठी भाषेचे राज्य निर्माण केले आणि आपल्या  सामर्थांनी मराठी संस्कृती भारताच्या  कानाकोपऱ्यात तर नेली तशीच भारताबाहेरसुद्धा पोहचविली. भारतात वेगवेगळ्या भाषांची राज्ये आहेत. ती सर्व राज्ये त्या भागातील भाषिकांना त्यांच्या प्राणापेक्षाही प्रिय आहेत. तसाच महाराष्ट्रसुद्धा आम्हा मराठी भाषिकांना प्राणापेक्षा खूप प्रिय आहे. याचे समर्थन करताना आचार्य अत्रे म्हणतात, " महाराष्ट्र हे आमच्या भाषाप्रदेशाचे आणि भाषिक राज्याचे अभूतपूर्व नाव आहे ! त्या नावातच केवढा अभिमान, केवढे आव्हान आणि केवढी भावना भरलेली आहे. नुसतें ना...

On Occasion of 23rd April -World book Day

  Subject: On Occasion of 23 rd  April -World book Day Written By Yogesh Gogwekar Website: https://yogeshgogwekar.blogspot.com/ Friends, There are endless wonders of books. These wonders help us to increase our happiness by eliminating our stress and also help to improve intelligence. When I start reading the books, I unknowingly try to remove the darkness and open the doors of light to get the knowledge. It is not only reading the books and keep aside after reading. It is also a pat of sharing the information after analyzing the facts with others in written form. Therefore, I feel to share with you some of the best books which have been read by me. These books are not only enlightening but also entertaining. These books lead to intellectual and metal development and help us to change our perspective about the wrong information. These books are ultimate and interesting to read. Following are the list of these books Fictions in English 1.     ...

Mee ani Sakaratmaka मी आणि सकारात्मकता

 रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १८२ विषय क्रमांक : ४ विषय : मी आणि सकारात्मकता शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई प्रत्येक माणसाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक आहे की नकारात्मक पडताळून पाहण्यासाठी पूर्वी एक प्रश्न विचारला जात असे. तो प्रश्न म्हणजे, तुमचा पाण्याचा ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे? जेव्हा एखादी व्यक्ती म्हणते की ग्लास अर्धा भरलेला आहे तेव्हा ती व्यक्ती जीवनाकडे सकारात्मक नजरेने बघते आणि प्रत्येक गोष्टींमध्ये आशावादी असते असे म्हटले जाते. सकारात्मकता म्हणजे आशावादी मार्गाचा विचार करणे किंवा अशा गोष्टींची निर्मिती करणे की जेणे करून स्वतःचे जीवन आनंदायी आणि चिंतामुक्त करणे. सकारात्मक विचार नेहमी आपणास कोणत्याही परिस्थितीत चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करण्यास मदत करते. याचा परिणाम आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर चांगल्या प्रकारे होऊ शकतो. त्यामुळे सकारात्मक विचारसरणी ही प्रत्येक माणसाला त्याच्या कामामध्ये चांगले यश तर देतेच पण चांगले आरोग्य देऊन त्याचे जीवन आनंदायी करते. म्हणूनच असे म्हणतात की सकारात्मक विचार ही मानसिक आरोग्याची ग...

incident taken from book, " The Lost World of Hindustani Music"written by Kumar Prasad Mukherji

 *From : Yogesh Gogwekar* *Following incident taken from book, " The Lost World of Hindustani Music"written by Kumar Prasad Mukherji* Two legend Hindustani classical singers Ali Baksh Khan and Fate Ali Khan used to sing jugalbandi in Khyal. For twenty years they practiced taankari before they came to Doab. They were popularly known as Alia-Fatu. Once they came to Jaipur Court to perform their music. Pandit Vishambhar Nath was one of the court musicians whose name has been mentioned by Ustad Vilayat Husain Khan of Agra Gharana as one of the his forty-one Gurus. He was well versed in dhrupad and heavier type of khyal.  The young musicians Alia-Fatu were naturally keen to ascertain the reaction of venerable old Pandit who heard them singing in Court. Not satisfied with the customary words of praise, they wanted to know his true opinion. Pandiji invited them to his house, made them sit on a charpoy and brought out a looking glass. After holding the mirror in front of Ali Baksh, h...

Navchaitanya-नवचैतन्य

रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १८१ विषय क्रमांक : ४ विषय : नवचैतन्य शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम , मुंबई प्रत्येक मानवी जीवनात नवचैतन्य निर्माण करण्याची गरज नेहमीच पडत असते. तसा तो निसर्ग नियमच आहे. आपण जरी निसर्गाकडे पाहिले तरी आपल्याला दिसून येईल की शिशिर ऋतुमध्ये सृष्टी निष्पर्ण होते आणि वसंत ऋतुचे आगमन होताच हीच सृष्टी वृक्ष वल्लरीना पालवी फुटून निसर्गात एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण होत असते. त्यामुळे या ऋतूत आनंदाला उधाण आलेले असते. शिशिरात आपला हिरवा रंग हरवून बसलेली झाडे परत एकदा नवीन रूप घेऊन आपले जादुई नखरे दाखवीत उभे राहतात. तसेच मानवी जीवन असते. रोज एकच प्रकारचे काम केल्याने माणसांचे आयुष्य कंटाळवाणे   झाल्या सारखे वाटत राहते. या एकसूरी आयुष्यातून बाहेर येण्यासाठी प्रत्येक माणूस प्रयत्न करीत असतो. याला कारण म्हणजे माणूस जन्मत: वेगळा असतो. स्वतःच्या काही गुणांमुळे तो स्वतःचे असे वेगळेपण सिद्ध करीत असतो. एखाद्या परिस्थित आपण कसे वागवे की ज्यामुळे आपले नुकसान होणार नाही याची तो काळजी घेत असतो. तरीसुद्धा संवेदनशील मनामुळे त्याच्या जीवनात एकप्रकारचा ...

GUDHI PADAVA ANI MARATHI NAVIN VARSH -गुढी पाडवा / मराठी नववर्ष

 रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १८० विषय क्रमांक : ३ विषय : गुढी पाडवा / मराठी नववर्ष शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई  संकेत स्थळ :  हिंदू पंचांगानुसार (कॅलेंडर) चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्ल प्रतिपदा या दिवशी येणारा सण म्हणजे गुढी पाडवा. महिन्याच्या सुरुवातीला येणारा हा सण भारताच्या काही भागात खासकरून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, जम्मू आणि काश्मीर  मोठया उत्साहाने आणि थाटामाटात नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो. गुढी म्हणजे ध्वज किंवा भगवान ब्रम्हाचे प्रतीक आणि पाडवा म्हणजे चंद्राच्या टप्प्याचा पहिला दिवस. उपलब्ध असलेल्या काही पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान ब्रम्हाने अनेक देव-देवता, पुरुष-स्त्री आणि राक्षस निर्माण केले असे म्हटले जाते. थोडक्यात म्हणजे या दिवशी भगवान ब्रह्माने विश्वाची स्थापना केली. म्हणून या प्रतिपदेच्या तिथीला भगवान ब्रम्हाची विधीवत पूजा केली जाते. तशी पूजा केल्याने सर्व वाईट प्रवृत्तीचा नाश होऊन सर्व चराचरात सुख- समृद्धी नांदत असते. वेदांग ज्योतिष ग्रंथानुसार हा दिवस साडेतीन मुहुर्तांपैकी एक मु...