रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १७१ विषय क्रमांक : ४ विषय : आम्ही सुसंस्कृत? (टीकात्मक लेख) शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई संकेत स्थळ : खरोखर आपण सुसंस्कृत आहोत का? असा प्रश्न जेव्हा कुणी विचारतात तेव्हा आपण सहजपणे हो म्हणून उत्तर देत असतो. अशा वेळेस आपण स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेतो त्यावेळीस आपण सहजपणे सुसंस्कृत या शब्दाचा अर्थ शिक्षित किंवा श्रीमंत असा लावत असतो. एखादी व्यक्ती सुसंस्कृत ठरविताना आपण फक्त त्या व्यक्तीचे शिक्षण, त्याची मातृभाषेप्रमाणे इंग्रजी भाषेवर असलेली पकड, त्याची बँकेतील ठेवी, ती व्यक्ती वापरत असलेले महागडे डिझायनर कपडे, त्याच्याकडे असलेली संपत्ती इत्यादी गोष्टी लक्षात घेतो. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे जरी सुसंस्कृत हा शब्द शिक्षणाशी संबंधित असला तरी सुसंस्कृत असणे म्हणजे श्रीमंत होणे नाही. श्रीमंत लोक व्यवस्थितपणे शिक्षण घेऊन सुसंस्कृत होऊ शकतात पण महागाड्या वस्तू विकत घेण्याची क्षमता कोणालाही सुसंस्कृत बनवत नाही. म्हणून जेव्हा आपण एखाद्याला सुसंस्कृत म्हणतो तेव्हा आपल्याला हे जाणवते की त्याच्याकडे चांगले शिक्षण आहे, चांगले ...