रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १६७ विषय क्रमांक : ४ विषय : वसुधैव कुटुंबकम शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता :. माहीम, मुंबई यस्तु सर्वाणि भुतानि आत्मन्ये वानुपश्यति | सर्वभुते्षु चात्मानं ततो न विजुगुप्सते || वरील श्लोक एकदा माझ्या वाचनात आला होता. त्याचा अर्थ असा आहे की या भुतलावर प्रत्येक मनुष्य प्राणी सर्व अस्तित्वा मध्ये स्वतःला पाहतो, त्याचप्रमाणे कुणाचाही द्वेष किंवा तिरस्कार करीत नाही. या श्लोकाचा अर्थ फक्त संकुचित विचारांचा नसून खूपच व्यापक आहे. हा श्लोक आपणास सांगू इच्छितो की या पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्या सर्व देशातील लोकांनी कुटुंबपद्धती प्रमाणे खेळीमेळीचे वातावरण निर्माण करून एकत्र राहावे. त्यामुळे सर्व जगातील अशांती संपेल आणि सर्वजण गुण्यागोविंदाने जगू शकतील. तसे पाहिले तर ही संकल्पना फारच प्राचीन असून भारतीय वैदिक काळामध्ये राबविली जात होती आणि त्या संकल्पनेचे नाव होते वसुधैव कुंटुंबकम. वसुधैव कुटुंबकम वर एक संस्कृत श्लोक आहे. तो श्लोक असा आहे, "अयं निज: परोवंती गणना लघुचेतसाम | उदारचारितानां तु वसुधैव कुटुंबकम ||". या श्लोकात वसुधैव असा पृथ्वीचा उल्ले...