रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १३५ विषय क्रमांक : ५ विषय : मंत्र ( लेख ) शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम , मुंबई मंत्र हा शब्द संस्कृत भाषेतला असून त्याचा अर्थ म्हणजे काही शब्दांची किंवा अक्षरांची विशिष्ट पद्धतीने केलेली जुळवणी. मराठीत या शब्दाचा अर्थ विचार करण्याचे साधन अगर मनाला मुक्त करणारा शब्द असा सुद्धा होऊ शकतो. माणसाला नेहमी बाह्य विचारांची काळजी वाटत असते आणि त्यातून मुक्ती मिळविण्यासाठी त्याला अनेक मंत्र हवे असतात. मग ते मंत्र अध्यात्मिक असो किंवा धार्मिक किंवा आयुष्याला उपदेश करणारे असो , ते त्याच्या मनाला व्यस्त ठेवतात आणि काळजीपासून मुक्त होण्यास मदत करतात. त्यातून मानावाचे मन सकारात्मक होते आणि दिवसभर ते उत्साही राहण्यास मदत होते. आपण जेव्हा एखाद्याचे भाषण ऐकतो आणि त्या भाषणाने आपल्याला मंत्रमुग्ध केले असे आपण म्हणतो तेव्हा आपण वैचारिक दृष्टया त्या भाषणाचे चिंतन करीत असतो. असाच प्रकार भारतीय शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत होतो. जेव्हा त्या मैफिलीचे स्वर आपल्या मनाचा ताबा घेतात तेव्हा नकळत त्या स्वरांनी आम्हाला मंत्रमुग्ध केलेले असते. ...