Skip to main content

Purnviram पूर्णविराम📝

 

*रंग लेखणीचे परिवार*

*आठवडा क्रमांक : 128*

*विषय क्रमांक : 4*

*विषय : पूर्णविराम📝*

*दिनांक :02/04/2021*

*शब्दांकन : योगेश गोगवेकर*

 

कुठल्याही भाषेत एखादे वाक्य  पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी आपण वाक्याच्या शेवटी एका विरामचिन्ह वापरतो, त्यास आपण पूर्णविराम असे संभवतो. आजचा इंग्लंडबरोबरचा एकदिवसीय क्रिकेटचा सामना भारताने जिंकला किंवा संत साहित्याला काळाचे बंधन नाही. अशी काही उदाहरणे आपण पाहू शकतो. पूर्णविराम जरी प्रत्येक भाषेतील वाक्य पूर्ण झाल्याचे दर्शवत असला तरी त्याचा उल्लेख मानवी जीवनाशी करायला जात असताना त्या शब्दाचा अर्थ वेगळ्यावेगळ्या प्रकारात बघायला मिळतो. कारण मानवी जीवनामध्ये अनेक पूर्णविराम माणसाच्या हातात नसून नियतीच्या हातात असतात आणि नकळत नियती मानवाला कुठल्याही गोष्टीची पूर्व कल्पना देता त्याच्या आयुष्यात पूर्णविराम एखाद्या वाक्यामध्ये आणून ठेवते. कधी कधी माणसाच्या आयुष्याचे वाक्य पूर्ण तरी होते अथवा अर्धवट तरी राहते. तरी माणूस आपले अर्धवट राहिलेले वाक्य सोडून देऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतो कारण त्यास माहित असते की पूर्णविरामा पुढेही आयुष्य बरेच असते आणि आधी आलेल्या पूर्णविरामचा थोडासा विसावा घेऊन पुढच्या पूर्णविरामासाठी पुढे जात असते. 

मानवी जीवन नेहमी विकसित होत असते. आपल्या कल्पनेच्या आधारावर माणसाने अनेक शोध लावले, अनेक स्मारके बनवली, नवीन यंत्रे आणली आणि मानवी जीवन अधिक फुलवले. तरी सुद्धा मानवाला पूर्णविरामाची गरज असते. जर पूर्णविराम नसेल तर त्याचे जीवन कधीहि आनंदी होणार नाही आणि आपल्या आयुष्यातील शांतता सुसंस्कृतपणा तो हरवून बसेल. पूर्णविराम जसा आपलं वाक्य विभक्त करून नवीन वाक्य तयार करण्यास मदत करतो त्याचप्रमाणे मानवी आयुष्यातील पूर्णविराम मानवाला नवी निर्मितीकडे नेण्यास मदत करते. पण घाना येथे राहणारे सुप्रसिद्ध प्रेरणादायक लेखक Israelmore Ayivor पूर्णविराम बद्दल सांगताना म्हणतात, " Leave no "full stop" in between the sentences that make up your life story. If anything, let "commas" show that when you were brought down by challenges, you rose up with passion and moved on again". ते जरी अस सांगत असले तरी मला वाटते की मानवी आयुष्यात आलेल्या पूर्णविरामला अल्पविराम मानून प्रत्येक मानवाला पुढे जावे लागेल.म्हणूनच सुप्रसिद्ध डच पाकिस्तानी पत्रकार, विचावंत आणि कवी Ehsan Sehgal म्हणतात, "पूर्णविराम म्हणजे नवीन अध्यायचा पर्याय" (Full Stop means the  option of a new chapter).

एकदोन वर्षापूर्वी माझ्या वाचनात डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि प्रा. . रा.आर्डे लिखित अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम हे  पुस्तक आले होते. हे दोघेही महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन समितेचे आरंभपासूनचे कार्यकर्ते होते. हे पुस्तक लिहिण्याचे कारण देताना ते सांगतात की अलीकडच्या काळात अंधश्रद्धा निर्मूलणासाठी कोणतेही विचारमंथन झाले नाही. नेहमी त्यांच्या व्याख्यानानंतर किंवा चर्चेनंतर अनेक प्रश्न विचारले जात असत. ते प्रश्न व्यवस्थितपणे मांडून त्याची वैज्ञानिक दृष्टीकोनातून उत्तरे देऊन अंधश्रधेला पूर्णविराम द्यायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. प्रश्नांची निवड करताना त्यांनी सर्व प्रकारची उत्तरे त्यात येतील अशी काळजी घेतली आहे आणि त्यात विचारमंथनाला चालना मिळेल असा प्रयत्न केला आहे. तरीसुद्धा दिलेल्या उत्तरातून अजून काही प्रश्न निर्माण होतात आणि अंधश्रधेला पूर्णविराम मिळत नसल्याचे जाणवते. ह्याचे कारण म्हणजे विज्ञान म्हणजे नक्की कायवैज्ञानिक संशोधन आणि त्याचे फलित याची चर्चा करून अंधश्रधेला पूर्णविराम दिला असता तर ती चर्चा अधिक रंगली असती असे वाटते. प्रत्येक समाज अपेक्षित आणि मान्यताप्राप्त वागण्याच्या चौकटी बांधला जातो. जेव्हा माणसाचे वागणे ह्या चौकटी बाहेर होऊ लागले की समाज भयभीत बनतो. त्यात कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता असते. त्यासाठी मानवाची मानसिक अवस्था लक्ष्यात घेऊन त्याची दखल व्यावहारिक आणि तात्विक पातळीवर घेणे जरुरीचे आहे. असे मला वाटते. हे पुस्तक फक्त अंधश्रधेला प्रवृत्त करणाऱ्या मानसिकतेबद्दल  लिहिले असून अंधश्रधेला पूर्णविराम दिला गेला नाही असेच जाणवत राहते. 

प्रत्येक मानवी आयुष्यात माणसाच्या भावना विलक्षण रूप धारण करतात. या भावना मानवी जीवनात येतात कश्या आणि त्याचा मानवाच्या जीवनावर कसा प्रभाव पडतो हे समजत नसते. त्यासाठी शिक्षण आणि मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रेरणादायक लेखिका व्हेनेसा आयटकेन ह्यांचे विचार समजून घेऊ. त्या सांगतात की मानवी जीवनात जे विचार येतात जेव्हा माणूस चिंताग्रस्त होतो आणि त्या चिंताग्रस्त विचारातून भावनिक चिंता निर्माण होत असते.त्यासाठी त्या एक उदाहरण देतात. त्या म्हणतात की बहुतेक माणसे, "मला बरेच काही करायचे आहे " असा विचार मांडतात. वास्तविक बघायला गेलं तर हा काही मोठा विचार नाही. पण मानव ह्या विचाराचा अनुसरण करतो आणि मग मला हे करायला जमत नाही कारण मला पुरेसा वेळ नाही असे सांगत ते काम टाळत जातो. इथे व्हेनेसा आयटकेन सांगतात ह्या सर्व विचारांना पूर्णविराम फार आवश्यक आहे. जर आपण पूर्णविराम दिला नाही तर आपण आयुष्यातील अनेक चांगल्या संधी घालवून बसू. सर्व प्रथम माझ्याकडे वेळ नाही ह्या विचारांना पूर्णविराम द्या. 

पूर्णविराम जसा प्रत्येक भाषेतील सुंदरता वाढवतो तसाच तो मानवी जीवन सुसंस्कृत करण्यास मदतसुद्धा करतो. त्यामुळे माणूस आपले विचार शक्तिशाली बनवू शकतो.

 धन्यवाद 

 

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...