*रंग लेखणीचे परिवार*
*आठवडा क्रमांक 121*
*विषय क्रमांक : 2*
*विषय : शत जन्म शोधताना(वैचारिक)📝*
*दिनांक : 10/02/2021*
*शब्दांकन : योगेश गोगवेकर*
शत जन्म शोधिताना | शत आर्ती व्यर्थ झाल्या |
शत सूर्य मालिकांच्या | दीपावली विझल्या ||
ह्या दोन ओळी मराठी नाटक सन्यस्त खडग ह्या नाटकातील शत जन्म शोधिताना ह्या गीतातील आहे. हे गीत स्वातंत्रवीर सावरकरांनी लिहिले आहे. त्यातील पहिल्या दोन ओळी ऐकताना मला नेहमी अशा काही व्यक्तींची आठवण देते आणि असे वाटते की स्वातंत्रवीरानी हे गाणे जणू काही त्या व्यक्तीसाठी लिहिले आहे. कारण त्यांनी केलेला त्याग हा फार मोठा असतो. काही माणसे अशी असतात की त्यांच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो अपूर्ण असतो. कारण त्यांची कर्तृत्वे इतकी मोठी असतात की त्यांच्या सुखदुःखाच्या कल्पना सुद्धा व्यर्थ ठरतात. मग त्यामध्ये समाज सुधारक असोत अथवा राजकीय व्यक्ती असोत, खेळाडू असोत किंवा कलाकार असो, वैज्ञानिक असो किंवा गायक. अशी कर्तृत्वान माणसे आपली काया, वाचा, मन सर्व एकत्रित करून आपलं अवघ व्यक्तिमत्व अंतरबाह्य तेजस्वी करून टाकतात.जीवनाचा प्रत्येक क्षण त्यांच्या अमोघ कर्तृत्वाने उजळून निघालेला असतो. तेव्हा अशा मागे किती माणसांची संख्या आहे, ह्याचा शोध निरर्थक असतो. कारण त्यामध्ये फक्त असतात नवे विचार आणि त्या नवीन विचारांची ओळख समाजाला करून देण्याची निष्ठा. त्यासाठी त्यांना कोणतेही बंधन नको असते. मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे, ही केशवसूतांच्या कवितेतील एक ओळ त्यांना तंतोतंत लागू पडते. आपणच जिंकणार अश्याच पद्धतीने ते आपले आयुष्य जगत असतात. अश्या माणसांचा शोध घेताना शत म्हणजे शंभर जन्म शोधावे लागतात.
इतिहास वाचताना अश्या काही व्यक्तींचे कर्तृत्व आपल्या समोर येतात तेव्हा आपण त्यांचा विचारांचा व कार्यांचा गाभा काय आहे ते लक्ष्यात घेत असतो. त्या व्यक्तींच्या विचारांचा आढावा घेत असताना एक दिसून येईल की ह्या व्यक्ती आपला भारत देश आधुनिक, विज्ञाननिष्ठ आणि लोकशाहीवादी बनवू पाहत होते. त्यांना माहित होते की हि एका रात्रीची प्रक्रिया नसून क्रमाक्रमाणे विकसित होत जाणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी ते नेहमी प्रयत्नाशील राहतात आणि ज्या जुन्या परंपरा आणि रूढी आहेत त्यांचा त्याग करून आधुनिक मूल्यांचा स्वीकार करावयास सांगतात. भारताच्या संविधानाला प्रमाण मानायला सांगतात. त्यामुळे प्रत्येक भारतीयांचे जीवन समृद्ध व सुखकर होण्यास मदत होईल अशी त्यांच्या विचारांची भावना असते. नुसत्या राजकीय सत्ता परिवर्तनाने हे घडणार नसून सामाजिक व्यवस्थेत बदल होणे गरजेचे आहे. जर समाजातील प्रत्येक व्यक्ती प्रगत झाली तरच ती आपल्या जाती धर्माच्या भिंती पाडून सर्व मानव जातीचा विचार करून शोषितांचे दुःख कमी करण्याचे प्रयत्न करतील. अश्या बऱ्याच व्यक्ती भारतात मोलाचे काम करून गेल्या आहेत. त्यातील दोन व्यक्ती अश्या आहेत की त्यांचे कार्य भारतास आधुनिकते कडे नेण्यास फार उपयुक्त ठरते. त्या दोन व्यक्ती आहेत हमीद उमर दलवाई आणि वेरियर होलमन एल्वीन. त्यांच्या कार्याची ओळख करून घेताना म्हणावासे वाटते शत जन्म शोधताना, शत आर्ती व्यर्थ झाल्या.
महाराष्ट्रामधील रत्नागिरी जिल्यात चिपळूण तालुक्यात वशिष्ठ नदीवर बसलेल्या मिरजोळी ह्या गावात हमीद उमर दलवाई ह्यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण चिपळूण मध्ये झाले तर पुढील शिक्षण मुंबईत इस्माईल युसूफ ह्या महाविद्यालयात झाले. लहानपणापासून आपल्या धर्माच्या अतिरेकी वापरामुळे मुस्लिम समाजाची हेळसांड ते पाहत होते. त्यामुळे आपला समाज नुसता धर्मनिष्ठ न राहता तो विज्ञाननिष्ठ व्हावा असे त्यांना वाटू लागले. त्यासाठी त्यांना वैज्ञानिक शिक्षणाची गरज आपल्या धर्मातील लोकांसाठी गरजेची वाटू लागली. खास करून मुस्लिम समाजातील स्त्रियांनी शिक्षण घेणे जरुरीचे आहे हा विचार ते मांडू लागले आणि इस्लामची चिकित्सा करू लागले. मुस्लिम समाजातील तोंडी तलाक आणि बहुपत्नीत्व कायद्याने बंदी घालावी त्याचप्रमाणे धर्मांतर जबरदस्तीने न होता कायद्याने व माणसांच्या इच्छेनुसार व्हावे अशी मागणी ते भारत सरकारकडे करू लागले. समान नागरी कायद्याचा फायदा ते आपल्या समाजातल्या लोकांना सांगू लागले. त्यासाठी त्यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना इ. स. 1970 साली केली. हमीद दलवाई ज्या मुस्लिम समाजात सामाजिक परिवर्तन करू पाहत होते तिथे त्यांना मुस्लिम समाजाचा पाठिंबा मिळणार नव्हता. तरीसुद्धा त्यांनी प्रयत्न सोडले नाही आणि बघता बघता त्यांना हजारावर अनुयायी मिळाले. त्यात अनेक मुस्लिम स्त्रिया सुद्धा होत्या. हे सर्व करत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली आणि 3 मे 1977 रोजी वयाच्या 44 व्या वर्षी हे जग सोडून गेले. ह्यांच्या सारख्या माणसाचे कार्य पाहिल्यानंतर असे वाटून राहते की शत जन्म शोधिताना, शत आर्ती व्यर्थ झाल्या.
असेच एक दुसरे व्यक्तिमत्व म्हणजे वेरिअर होलमन एल्वीन. एल्वीन ह्यांचा जन्म 29 ऑगस्ट 1902 रोजी एका बिशप कुटुंबात इंग्लंडमध्ये झाला. इंग्रजी आणि धर्मशास्त्र ह्यात पदवी शिक्षण पूर्ण करून ख्रिस्ती धर्माचा प्रचार करण्यासाठी ते भारतात आले होते. भारतात त्यांची भेट गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि महात्मा गांधींशी झाली आणि त्यांच्यात बदल घडून ख्रिस्ती धर्माच्या प्रचाराचे काम सोडून दिले आणि 1935 साली त्यांनी हिंदू धर्माचा स्वीकार करून ते महात्मा गांधीबरोबर त्यांच्या आश्रमात राहू लागले. ते भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी झाले. त्याचवेळी त्यांना भारतीय आदिवासी समाजाची बिकट अवस्था नजरेत आली आणि ही आदिवासी जमात भारताच्या लोकसंख्येत आठ टक्के असून सुद्धा कुठल्याही भारतीय प्रवाहात दिसत नव्हती. तेव्हा त्यांना भारतीय प्रवाहात आण्याचे काम करण्याची तयारी केली. महात्मा गांधीजीने त्यांना काम करण्यासाठी प्रेरणा दिली आणि ते ओरिसा मधील बैगास आणि मध्य प्रदेश मधील गोंड समाजात काम करू लागले आणि गोंड जमातीतल्या मुलीबरोबर लग्न केले. 15 ऑगस्ट 1947 साली भारत स्वातंत्र्य झाल्यावर त्यांनी भारतीय नागरितत्व स्वीकारले. 1954 साली भारताचे प्रतंप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना नेफा ( नॉर्थ ईस्ट फ्रंटिअर एजन्सी ) प्रशासनाच्या कामकाजाचे सल्लागार म्हणून नेमले कारण नॉर्थ ईस्ट मध्ये आदिवासी समाजाचा मोठा प्रदेश बहुतेक भारतीयांना अज्ञात होता. एल्वीन ह्यांनी हि जबाबदारी स्वीकारली आणि तेथे दहा वर्षे काम करून त्या सर्व आदिवासी समाजाला भारतीय प्रवाहात घेऊन आले आणि मेघालयातील शिलॉंग मध्ये स्थायिक झाले. त्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट आणि केलेला त्याग ह्याची तुलना होऊच शकत नाही त्यांनी आदिवासी समाजाला माणूस म्हणून उभे केले आणि भारताला अभिमान आणि बळकटी देऊन स्वतः एक आधुनिक भारताचे निर्मितिकार झाले आणि 22 फेब्रुवारी 1964 साली वयाच्या 62 व्या वर्षी त्यांनी आपली इहलोकाची यात्रा संपवली. त्यांच्या कार्याचा आढावा घेत असताना स्वातंत्र्यवीराने लिहिलेल्या ओळी सारख्या आठवतात आणि खरोखर म्हणावसे वाटते, शत जन्म शोधिताना, शत आर्ती व्यर्थ झाल्या.
धन्यवाद
Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...
Comments
Post a Comment