Skip to main content

Posts

Showing posts from February, 2021

Mala samjleli rajya bhasha ; मला समजलेली राज्यभाषा

  *रंग लेखणीचे परिवार* *विषय क्रमांक :1* *विषय : मला समजलेली राज्यभाषा 📝* *दिनांक : 27/02/2021* *शब्दांकन : योगेश गोगवेकर* आज 27 फेब्रुवारी 2021. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटकार आणि कादंबरीकर वि. वा. शिरवाडकर ह्यांचा आज जन्म दिवस आणि हा दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी साजरा करताना मला  एक प्रश्न नेहमी पडतो तो असा की आज मराठीचे मराठी माणसात नक्की स्थान काय आहे. आजची मराठी पिढी किती मराठी व्यवस्थित बोलते किंवा किती मराठी साहित्य वाचते. आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहित आहे का? असे अनेक प्रश्न पडत असतात. हल्लीच आमच्या इथे एका विशितील तरुणीने पु. ल. देशपांडे आमच्या वडिलांच्या काळातील एक विनोद करणारे गृहस्थ होते असे म्हटले. पण पु. ल. देशपांडेनी मराठीत काही छान पुस्तके लिहिली आहेत हे तिला माहित नाही कारण तिच्या आई वडिलांनी सुद्धा त्यांनी लिहिलेली पुस्तके वाचलेली असत नाही.  मग कुसुमाग्रजांच्या कविता तर दूरच. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने आम्हाला सोप मराठी समजत पण वाचायला जमत नाही असे मला सांगितले. मग अश्या वेळी एक प्रश्न पडतो की मराठी भाषा,...

Athvanitil Kusumagraj ; आठवणीतले कुसुमाग्रज 📝

  *रंग लेखणीचे परिवार* *आठवडा क्रमांक 123* *विषय क्रमांक 3* *विषय : आठवणीतले कुसुमाग्रज 📝* *दिनांक : 26/02/2021* *शब्दांकन : योगेश गोगवेकर* मला नक्की आठवत नाही, पण मी बहुधा नववीत दहावीत असेन तेव्हा कवी कुसुमाग्रजांची एक कविता आमच्या शाळेच्या अभ्यासक्रमात होती. मला ती कविता खूपच आवडली होती आणि आजही मला ती कविता पूर्णपणे पाठ आहे किंवहुना त्या कवितेमुळेच कुसुमाग्रज माझ्या आयुष्यात आले, असे म्हणावयास हरकत नाही. कारण त्या कवितेत दिसलेली कवीची विशाल कल्पनाशक्ती. ती कविता आजही वाचताना असे वाटते की कवीने आपली व्यापक कल्पना शक्तीचा वापर करून एका वैज्ञानिक सिद्धांताला छानपैकी वस्त्राभुषणांनी सजवून एक काव्य निर्माण केले. त्यात त्यांनी सूर्याला प्रियकर केले आणि पृथ्वीला प्रेयसी आणि त्या कवितेस नाव दिले पृथ्वीचे प्रेमगीत. पृथ्वीचे प्रेमगीतमध्ये कुसुमाग्रज पृथ्वी सूर्याकडे कशी प्रीतीची याचना करत आहे असे सांगताना भव्य आणि उदात्त प्रेमाचा दृष्टीकोन सहजपणे मांडतात.पृथ्वी सूर्या भोवती फिरते हा झाला वैज्ञानिक दृष्टीकोन आणि अनेक युगे हा दृष्टीकोन तसाच चालत राहणार ह्यात दुमत नाही. पण कुसुमाग्रज आपल्या...

Eknath Dhondu Solkar: An Inspirational All-Rounder Who Overcome All the Challenges in His life To Became the Top Cricketer.

Eknath Dhondu Solkar: An Inspirational All-Rounder Who Overcome All the Challenges in His life To Became the Top Cricketer . “I don’t remember him taking evasive action at all nor for that matter getting hit by a batsman. He was not afraid of fielding close to the batsmen because he had this extraordinary anticipation of catches at the forward short-leg position and could sense when a batsman even offered a half chance that he could turn into a catch”. These are the words of great Indian Off spinner Erapalli Prasanna has said this when he was talking with such a cricket player who could open the inning or could play in middle order as a batsman; he could bowl with new ball or could spin the ball once it became old and revolutionized close up fielder in the game of cricket. He was a left-handed batsman and a left-arm bowler and was known as poor man’s Sobers for his all-round abilities. He had not made any records with his bat and bowl but he was a genius fielder and very few could be c...

Dhaga : धागा 📝

  * रंग लेखणीचे परिवार* * आठवडा क्रमांक : 122* * दिनांक : 17/02/2021* * विषय क्रमांक : 4* * विषय : धागा 📝 * * शब्दांकन : योगेश गोगवेकर*   धागा हा कापूस , रेशीम किंवा लोकरीचा लांब पातळ तुकडा जो दुसऱ्या धाग्यात आपोआप विणला जातो किंवा उसवलाही जातो. त्यामुळे बऱ्याचदा हे विणलेले धागे गुंतागुंतीचे होतात आणि मध्येच उसवतातही. मानवी आयुष्यातील   नाती सुद्धा अश्याच रेशमी धाग्यात विणली   गेली आहे. मानवाचे मन सहजरीत्या कुठेही रमते. कोणीही व्यक्ती आपल्या जवळ येऊन आपल्याला मदत करू लागते तेव्हा ते आनंदीत होते आणि आपली व्यक्ती दूर गेल्यावर ते दुःखी होते. म्हणून मानव आपली नात्यातील धागे इतकी घट्ट विणतो की ते धागे सहजपणे उसवले जात नाही. बऱ्याचदा हे धागे उसवतातही. म्हणूनच जगाच्या पाठीवर ह्या चित्रपटासाठी लिहिलेल्या एका गाण्यात ग दि माडगूळकर म्हणतात , " एक धागा सुखाचा , शंभर धागे दुःखाचे ,  जरतारी हे वस्त्र माणसा , तूझ्या आयुष्याचे ". ह्या गाण्यात त्यांनी मानवी आयुष्याचे सुख दुःख जरतारीच्या वस्त्रानी कसे विणले गेले आहे हे अतिशय सुंदर मांडले आहे. ग दि मा.नी ह्या गाण्य...

Barrister Pandharinath Bapu Pai: Liberal, Democratic, visionary , leader of people and Pioneer of Konkan Railway

Barrister Pandharinath Bapu Pai :  Liberal, Democratic, visionary , leader of people and Pioneer of Konkan Railway “It is a lovely little town, what with its many temples, its blue sea, golden sand beach and its intelligent, friendly citizens. Blessed are those who live in that little town.  And you have visited the dreamy, poetic, enchanting little village nearby? I mean Dabholi, Aravli, Shiroda, Redi, Math, and Vetora. Their very names breathe music. Konkan is the land of beauty, land of poetry, land of great personalities. Now, you do not accuse me of parochialism. What I have written is an objective appreciation of the people and I had the good fortune of knowing intimately.  I am sure you must have built a fine cadre in Vengurla. Life on Thames is as usual, foggy, cloudy, bleak. The song of the sea, glorious sunset, the intoxicating moonlight, and the starry blue skies are calling me back, pulling me homeward. I cannot hold any longer”. These beautiful and poetic wor...

Shat Janm Shudhtana -शत जन्म शोधताना

*रंग लेखणीचे परिवार* *आठवडा क्रमांक 121* *विषय क्रमांक : 2* *विषय : शत जन्म शोधताना(वैचारिक)📝* *दिनांक : 10/02/2021* *शब्दांकन : योगेश गोगवेकर* शत जन्म शोधिताना | शत आर्ती व्यर्थ झाल्या | शत सूर्य मालिकांच्या | दीपावली विझल्या || ह्या दोन ओळी मराठी नाटक सन्यस्त खडग ह्या नाटकातील शत जन्म शोधिताना ह्या गीतातील आहे. हे गीत स्वातंत्रवीर सावरकरांनी लिहिले आहे. त्यातील पहिल्या दोन ओळी ऐकताना मला नेहमी अशा काही व्यक्तींची आठवण देते आणि असे वाटते की स्वातंत्रवीरानी हे गाणे जणू काही त्या व्यक्तीसाठी लिहिले आहे. कारण त्यांनी केलेला त्याग हा फार मोठा असतो. काही माणसे अशी असतात की त्यांच्या व्यक्तिमत्वाचा शोध घेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो अपूर्ण असतो. कारण त्यांची कर्तृत्वे इतकी मोठी असतात की त्यांच्या सुखदुःखाच्या कल्पना सुद्धा व्यर्थ ठरतात. मग त्यामध्ये समाज सुधारक असोत अथवा राजकीय व्यक्ती असोत, खेळाडू असोत किंवा कलाकार असो, वैज्ञानिक असो किंवा गायक. अशी कर्तृत्वान माणसे आपली काया, वाचा, मन सर्व एकत्रित करून आपलं अवघ व्यक्तिमत्व अंतरबाह्य तेजस्वी करून टाकतात.जीवनाचा प्रत्येक क्षण त्य...

Suman Kalyanpur: Whose Voice is remarkable for its purity and also always touches high level of expressiveness

Suman Kalyanpur: Whose Voice is remarkable for its purity and also always touches high level of expressiveness Very recently, I was listening duet song ‘Yeh Mausum Rangeen Sama’ from the film Modern Girl which was made in 1961 and its music was composed by Ravi and written by Gulshan Bawara. Even though this is the duet song, I felt that female voice of this song was so impressive and has confidently created the mood of sentiment of love. Similarly, such confidence of female voice can also be listened in the flirty song ‘Aaj Kal Tere Mere Pyar Ke Charche‘ from film Brahmachari made in 1968 whose music was composed by Shankar Jaikisan and lyric penned by Hasrat Jaipuri.  I can quote one more example of same female voice for duet song and that song is ‘Na, Na Karate Pyar’ from the film Jab Jab Phool Khile made in 1965 and music of this film was composed by Kalyanji Anandji and lyrics penned by Anand Bakshi. In this song, Female voice has expressed bright and innocent love with the ca...

My Small Writing On Rishipanchami Day

  *My Small Writing On Rishipanchami Day*   Rishipanchami is getting celebrating on second day of Ganesh Chaturthi. It is not a festival but a fasting day observed by women to pay respect  & gratitude  to Sapta Rishi or seven sages who devoted their life for the welfare of the society. These Seven Sages are Kashyapa, Atri, Bharadhvaj, Vishvamitra, Gauthama, Jamadagni & Vashishta.   *From Yogesh Gogwekar*   On Rishipanchami day,  women observe fasting for purification. In Hinduism, Purification has highest priority and there are guidelines to maintain it. During menstrual cycle, women are not allowed to do any religious functions and also not allowed to enter in kitchen. Thus, to avoid such guidelines ,women are observing the fast.   In Maharashtra especially in Konkan part and Goa, a special dish is cooked which is being called as Rishichi Bhaji which contains mix veggies.  Such veggies are made in such way which can b...

UthalPanyala Khalkhalat Far-उथळ पाण्याला खळखळाट फार (वैचारिक)📝

  * रंग लेखणीचे परिवार * * आठवडा क्रमांक : 120* * विषय क्रमांक : 2* * विषय : उथळ पाण्याला खळखळाट फार ( वैचारिक ) 📝 * * दिनांक : 02/02/2021* * शब्दांकन : योगेश गोगवेकर * आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात माहिती आणि ज्ञान मिळवण्याची सोय एकदम सोपी झाली आहे . पूर्वी एखाद्या गोष्टी बद्दलची माहिती हवी असल्यास ग्रंथालयात जाऊन पुस्तके पाहावी लागत असत . आता ही माहिती इंटरनेटद्वारे सहज उपलब्ध होते . टीव्ही , कॉम्प्युटर आणि मोबाईल फोनमुळे माहितीचा साठा खुला झाला आहे किंवा विस्तारलेला आहे . त्यामुळे आपली क्रयशक्ती वाढण्यास खूपच मदत झाली आहे . तरीसुद्धा एका गोष्टीची उणीव वाटू लागते ती म्हणजे सहज मिळवलेली माहिती बरोबर आहे की चुकीची आहे किंवा मोकळ्या व्यासपीठावरून मांडण्यात आलेले विचार योग्य आहेत की अयोग्य . कारण बऱ्याचदा माहितीद्वारे मांडलेले विचार उथळ असण्याची शक्यता अधिक असते . त्यासाठी सखोल ज्ञानाची गरज आहे . म्हणूनच मिळालेल्या माहितीचे विश्लेषण नीटपणे होण्याची गरज आहे . अन्यथा उ...