Skip to main content

Sorry : Marmbandhatali thev hi-सॉरी : मर्मबंधातली ठेव ही ( वैचारिक)

*रंग लेखणीचे परिवार*
*आठवडा क्रमांक 114*
*सॉरी : मर्मबंधातली ठेव ही ( वैचारिक)📝*
*शब्दांकन : योगेश गोगवेकर*
 *दिनांक :26/12/2020*

बहुतेक माणसे काही ना काही छंद जोपासत असतात. मला पुस्तकांचा संग्रह करून वाचण्याचा आणि त्यातील उपयुक्त माहिती नोंद करून ठेवण्याची आवड आहे. मग ती पुस्तकं राजकीय इतिहासा बद्दल असो किंवा चित्रपटा बद्दल असो किंवा क्रिकेटच्या खेळाबद्दल असो. तो वाचण्यात मला खूप आनंद मिळत असतो. जसा आनंद मला पुस्तकं वाचल्यामुळे मिळतो, तसाच आनंद मला क्रिकेटचे सामने बघताना आणि भारतीय संगीत ऐकतानाही होतो. मग तो क्रिकेटचा सामना कुठलाही असो, त्याच्या हारजीत पेक्षा त्या खेळाची सुंदरता बघण्यात मजा येते. तसेच भारतीय संगीताबद्दल. मला वेगवेगळ्या प्रकारचे संगीत ऐकायला खूप आवडते. 

हल्लीच माझ्या एका शालेय वर्ग मैत्रीणेने अहीर भैरव रागातील अलबेला साजन घर आयो ही बंदिश आमच्या शाळेच्या Whatsup ग्रुप वर पाठवली.  ती  बंदिश गायली होती अबी आणि अंतरा नंदा ह्यांनी. ती ऐकत असताना अनेक आठवणी जाग्या झाल्या. त्यातील एक आठवण झाली ती म्हणजे कुमार गंधर्व ह्यांनी सादर केलेले भैरव रागाचे अनेक प्रकार. ही गोष्ट माझ्या मैत्रिणीला सांगताच तिने कुमारांनी सादर केलेला भैरव के प्रकार ह्या कार्यक्रमाची रेकॉर्डिंग Whatsup वर पाठवली. ती ऐकून झाल्यावर मन प्रसन्न झालं. त्यात कुमारांनी भैरव रागा बरोबर अहीर भैरव, शिवमत भैरव, गुणकली, भवमत भैरव, बिहद भैरव आणि भैरव रागातील तुकाराम महाराजांचा एक अभंग गायाला आहे. त्यात असलेले भवमत भैरव आणि बिहड भैरव हे दोन राग कुमारांची निर्मिती आहेत. कुमारांनी हे भैरव रागातील वेगवेगळे प्रकार अशाप्रकारे गायले की ते मनाला सहज  भिडतात. कुमारांनी अशी किमया अनेक रागासाठी केली आहे.

कुमार गंधर्व म्हणजे भारतीय संगीत सृष्टीतील अखंड झरणारा प्रचंड प्रवाह. त्यांनी संगीतातील पारंपरिक पद्धती मोडून काढल्या आणि शात्रीय संगीतातील व्याकरणाचा वापर करून त्यातील कलात्मक सौंदर्य अगदी सहजपणे सादर केले. ते सर्व करू शकले कारण त्यांची श्रुतीवर असलेली हुकूमत, स्वरांचे असलेले उत्स्फूर्त ज्ञान आणि रागाच्या मूळ स्वरूपाचे अचूक अध्ययन. ते नेहमी म्हणत असत की बंदिश बनवली जात नाही, ती स्फूरते व स्वर, लय आणि रागसकट साकार होते. त्यांच्या मते राग फक्त गायचा नाही तर त्याला बंदिशीच्या माध्यमातून नटवायचे  आहे. ह्याचा अर्थ कुमारजी पारंपरिक घराणे पद्धतीवर टीका करत होते किंवा त्यांना ती पद्धत मान्य नाही असा बिलकुल नाही. उलट ते अनेक घरांणे  गायकांचे चाहते होते.त्यांच्या मते परंपरा ही एक वाहती नदी आहे त्यात आपण कधी दोनदा पाऊल टाकत नाही. जेव्हा ते वाहणे थांबेल, तेव्हा नवीन निर्मिती होणार नाही. त्यांचा विरोध घराणे पद्धती मधील एकमुखी पणाला आणि नक्कल करण्याला होता.

कुमारांकडे ख्याल, ठुमरी, टप्पा, तराणा , भजन आणि अभंग ह्या संगीताचा प्रचंड संग्रह होता. आयुष्याच्या सुरुवातीला क्षय रोगाचा त्रास सहन करत कुमारांनी परत आपली गायकी सुरु केली. त्यानंतर त्यांनी अनेक रागांची निर्मिती केली. त्यातील प्रमुख रागांची नावे देत आहे. मालवती, अहिमोहिनी, गौरी बसंत, लंकेश्री, संजारी, लगन गांधार , मधवा, सहेली तोडी,  भवमत भैरव,  बिहाड भैरव, चैती भूप, दुर्गा केदार, नंद केदार आणि गांधी मल्हार. नवीन निर्मिती रागांबरोबर त्यांनी अनेक कार्यक्रम सुद्धा केले आहेत. ते असे आहेत. गीतवर्षा, मला उमजलेले बाल गंधर्व, तुकाराम: एक दर्शन, ठुमरी टप्पा तराणा, गौड मल्हार दर्शन, तुलसी : एक दर्शन त्रिवेणी ( कबीर, मीरा आणि सूरदास ह्यांच्या वरील कार्यक्रम ) आणि निर्गुण भजनाना शास्त्रीय रागरूप देणे. याशिवाय त्यांनी संगीतावर ग्रंथलेखन केले आहे तसेच बंदिशीची रचना लिहून ठेवली आहे.

कुमारांच्या बऱ्याच रेकॉर्डिंग्स  उपलब्ध आहेत. पण मला त्यांची निर्गुण भजनावरील रेकॉर्डिंग खूप आवडते. त्यात त्यांनी संगीतातील असंख्य पैलूचे दर्शन घडवले आहे. त्यामुळेच त्यांच्यातला विचारवंत आणि प्रतिभासंपन्न गायक कलाकाराची ओळख होते. म्हणूनच ते नुसते गायक नव्हते, ते नायकही होते. कारण नायक चिजाही करतो, ज्ञानीही असतो आणि गवई सुद्धा असतो.

आज कुमार आपल्यात नाही. त्यांना जाऊन एकोणतीस वर्षे झाली. त्यांनी निर्माण केलेल्या गोष्टी पुढे येण्याऱ्या अनेक पिढीला उपयुक्त होतील. त्यांचा अनोखा दृष्टीकोन त्यांचे शिष्य किंवा अनुयायी आम्हा सर्वापर्यंत पोचवतील.

कारण हा अमूल्य ठेवा आहे, सॉरी : मर्मबंधातील ठेव ही.

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...