One Beautiful Song एक सुंदर इंग्रजी गाणे
मी योगेश गोगवेकर तुम्हास सांगू इच्छितो....
22 मार्च 2020 पासून आपण सर्वजण एका विचित्र परिस्थितीतून जात आहोत. आज नऊ महिन्यानंतरहि परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. त्यातून अनेक वाईट बातम्या कानावर येत आहेत. अशावेळेस मन खूपच अस्वस्थ होते आणि काहीही करावासे वाटतं नाही. मग अशा अस्वथ मनाला फुंकर घालण्यासाठी स्वतःला आवडलेल्या काही गोष्टी परत एकदा वाचणे, ऐकणे किंवा पाहणे एवढाच कार्यक्रम राहतो. ते करत असतानाच कोणीतरी नवीन काव्य करतो, कुणी सुंदर गाणं गातो, कुणी छान लिहीत असतो. तेव्हा मनात निर्माण झालेला अस्वस्थपणा दूर होतो आणि जगाकडे पाहण्याची नवीन दृष्टी तयार होते.
ह्या टाळेबंदीच्या काळात अशा अस्वथ वेळी मी एक इंग्रजी चित्रपट परत परत पाहत असे. तो इंग्रजी चित्रपट होता The Sound Of Music. एक सुंदर संगीतमय चित्रपट. ह्या चित्रपटाबद्धल मी माझा लेख लिहिणार आहे पण इथे मी त्या चित्रपटातील एक गाणे जे मला खूप आवडते आणि मला कठीण परिस्थितीत जगण्याची ऊर्जा निर्माण करते. ते मूळ गाणं इंग्रजी भाषेतील देत आहे आणि त्याचा मराठी अनुवाद मला जमेल तसा केला आहे. चूक झाल्यास माफी असावी.
The hills are alive sound of Music
With songs they have sung for a thousand years
The hills fill my heart sound of music
My heart wants to sing every song it hears
My heart wants to beat like the wings
Of the birds that rise from the lake to the trees
My hearts want to sing like a chime
That flies from church on a breeze
To laugh like a brook when it trips and falls
Over stones on its way
To sing through the night like a lark who is learning to pray
I go to the hill when my heart is lonely,
I know I will hear what I have heard before
My heart will be blessed with the sound of music
And I will sing once more.
हजारो वर्षां पासून चालत आलेलं संगीत मी या पर्वतांच्या टेकडी मधून आजही ऐकत आहे आणि हे संगीत मला भारावून टाकत आहे. हि प्रत्येक गाणी त्यातील प्रत्येक ओळ माझ्या मनाला हवी हवीशी वाटते. त्यासाठी मला माझ्या हृदयासाठी पंख हवे आहेत जे मला तलावापासून झाडापर्यंत सहज पणे नेऊन आणतील. त्यातून होणारा ढगाचा आवाज, ते पाण्याचे झरे, वाटेवरील दगड मला गाणे शिकवत राहतील. जेव्हा माझे हृदय एकाकी पडेल तेंव्हा मी परत टेकडीवर जाईन आणि मला परत माझे गाणे मिळेल.
आणि मी पुन्हा एकदा गाईन.
संपूर्ण चित्रपटावर पुढील आठवड्यात.
मुंबई
01/12/2020
Comments
Post a Comment