Skip to main content

Jagnyat Mouj Aahe -जगण्यात मौज आहे (कथा)

*रंग लेखणीचे परिवार*
*आठवडा क्रमांक: ११३*
*विषय क्रमांक- ४: जगण्यात मौज आहे (कथा)*
*शब्दांकन : योगेश गोगवेकर*

हल्लीच सुंदराबाई हॉल मध्ये पुस्तकांचे प्रदर्शन लागले  होते. तेथे काही पुस्तकं विकत घेत असताना माझ्या पाठीवर एक थाप पडली. मागे वळून पाहतो तर माझा कॉलेज पासून असलेला मित्र शंतनू होता. खूप दिवसांनी  आम्ही भेटत होतो. आम्ही पुस्तके घेऊन बाहेर आल्यावर बराच वेळ बोलत उभे राहिलो आणि जुन्या आठवणी काढत आजपर्यंत काय केले यावर चर्चा करत राहिलो.

तो मला सांगत होता आज माझ्याकडे सर्व आहे. मुंबईत दोन घरं आहेत, वीकएंड साठी पुण्याजवळ एक सुंदर घर बांधले आहे. आजच्या स्पर्धात्मक जगात इतका गुंतून गेलो की त्यातून बाहेर येणे जमलेच नाही. सर्व काही मिळवले, लग्न झालं, मुलं झाली आणि वाटलं आता मस्त पैकी आराम करून आयुष्य घालवू. पण कसले काय! वाढत्या वयाबरोबर स्पर्धेमध्ये भाग घेणे अशक्य होऊ लागले. आता तर ऑफिसची कामे फोनवर होऊ लागली होती. शरीर सहज पणे साथ देत नव्हते. घरात सर्वाना त्यांची त्यांची कामे होती, त्यामुळे आपापसातील संवाद कमी  होत गेला. मित्र हि आता भेटत नव्हते. रोजचे कार्यक्रम तेच तेच होते आणि नवीन काय घडत नव्हते. कुणाला आता आपली गरज नाही असे वाटत होते. थोडक्यात आयुष्य जगण्याचा कंटाळा आला होता.

आणि अचानक एका संध्याकाळी You Tube वर  बेगम अख्तर ह्यांनी गायलेली पिलू रागातील एक गजल मिळाली आणि लगेच चालू केली. ती गजल होती " दूर है मंझिल,  राहे मुश्किल, आलम है तनहाई  का ". बेगम अख्तर ह्यांच्या सुरांनी साजलेले ते शब्द अधिक अर्थपूर्ण वाटले. ह्या गजलमध्ये म्हटल्याप्रमाणे अजून आपले ध्येय गाठण्यासाठी वाट कठीण आहे तरीपण एकट्यानेच चालायला हवे. तेव्हा एक गोष्ट जाणवली ती म्हणजे बेगम अख्तर म्हणजे सर्व वातावरणात भरून राहिलेला स्वर आणि रसपूर्ण अविष्कार! त्यासाठी परत एकदा बेगम अख्तर नव्याने  ऐकू लागलो. त्याचबरोबर कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, माणिक वर्मा, वगैरे ऐकू लागलो आणि परत एकदा आयुष्याची मजा घेऊ लागलो. स्पर्धात्मक जगापासून हळू हळू बाजूला होत परत एकदा क्रिकेटचा खेळ पाहू लागलो, गाण्याची मैफिल ऐकू लागलो,  नवीन कथा कादंबरी वाचू लागलो आणि वाटू लागले कुणीतरी नव्याने गात आहे, कुणी काहीतरी लिहीत आहे,  कुणी परत एकदा आपली चित्रकला सादर करीत आहेत. त्यामुळे परत एकदा जीवनाकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन बदलला आणि वाटू लागले की अजूनही जगण्यात मौज आहे.

आयुष्य जरी लहान असले तरी मोकळ्या मनाने ते जगण्यास पुरेसे आहे. वेगवेगळ्या गोष्टींचा आस्वाद घेत मजा करू कारण जगण्यात मौज आहे.

मुंबई
19/12/2020

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...