विषय: पुस्तक परीक्षण पुस्तकाचे नाव: द पर्सनल इज पॉलिटिकल: ॲ न ॲ क्टिव्हिस्ट मेमो यर लेखक: अरुणा रॉय प्रकाशक: हार्पर कॉलिन्स इंडिया पाने: २७२ किमत: रुपये ४७० शब्दांकन : योगेश गोगवेकर बऱ्याच कालावधी नंतर भारतीय समाजाला रहस्यमय पद्धतीने जागृत करणारे अरुणा रॉय लिखित ‘The Personal is Political An Activist’s Memoir नावाचे एक इंग्रजी पुस्तक नुकतेच वाचनात आले. हे पुस्तक म्हणजे लेखिकेने आपले आयुष्य विधायक कार्यात कसे व्यथित केले याचा लेखाजोगा आहे. १९६८ रोजी आयएएस झालेल्या एका महिलेला कळून चुकले की नागरी सेवेमध्ये केवळ नोकरशाही पद्धतीने काम करणे यासाठी तिचे आयुष्य नाही म्हणून तिने १९७५ रोजी नागरी सेवेतून राजीनामा दिला आणि तिलोनिया , राजस्थानमधील बेअरफुट कॉलेज सोशल वर्क अँड रिसर्च सेंटर ( SWRC) मध्ये आपले पती बंकर रॉय यांच्यासोबत काम करू लागली. त्यांचे पती बंकर अनेक गरीब लोकांना खास करून अनवाणी पायाच्या अभियंत्यांना तंत्रज्ञान शिकवत होते जेणेकरून गावकऱ्यांचे जीवन सुसह्य आणि समाधानी होऊ शकेल. त्याचवेळी लेखिकेने म्हणजे अरुणा रॉय यांनी तेथील स्...