Skip to main content

Posts

Showing posts from November, 2022

Seventy three Years for adoption of our constitution

Written By : Yogesh Gogwekar Address : Mahim, Munbai Subject : Seventy three Years for adoption of our constitution Today, 26th November is an important day in the history of free India because on 26th November 1949, Indian Constituent Assembly adopted the Constitution of India and it became effective on 26 January 1950. This constitution declared India as sovereign, Democratic republic, and a secular country and also assuring the justice, equality and liberty to its Citizens. It also promotes the fraternity.  And for last seventy years, Indian constitution assures us the dignity of the individual and unity of India. The India Constitution is the longest constitution. It covered 165 days to consider the draft of Constitution. It had 395 articles in 22 parts and 8 schedules which have been amended more than 100 times till now. The Constitution Assembly took three years to complete the drafting of the Constitution of Independent India. It has given us perfect policies for its structu...

Patra पत्र

 रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : २१२ विषय क्रमांक : ४ विषय : पत्र शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई पत्र म्हणजे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला एका माध्यमातून पाठवलेला लेखी संदेश आहे. जेव्हा आपण पत्रलेखन म्हणतो तेव्हा पत्र लिहिण्याचा एक प्रकार असतो. पत्र या शब्दाचे एक वैशिट्यपूर्ण स्वरूप आणि संकल्पना आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पत्र लिहिते तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की ती व्यक्ती एका कागदावर आपल्या भावना किंवा विचार दुसऱ्या व्यक्तीसमोर व्यक्त करीत असते. इथे जी व्यक्ती पत्र घेत असलेली व्यक्ती ज्याने पत्र लिहिले आहेत त्या व्यक्तीला उत्तर देण्यासाठी परत पत्र लिहीत असते. त्यातून एकमेकांशी संवाद होत जातो. ज्या कागदावर पत्र लिहिले जाते, तो कागद टपाल खात्याच्या माध्यमातून (Postal System) ज्यांना जे पत्र लिहिले आहे त्यांना पोहोचवले जाते. हे लिहिलेले पत्र औपचारिक किंवा अनौपचारिक असू शकते. त्यामुळे पत्र हे जसे एकमेकांशी संवाद करण्यासाठी महत्वाचे साधन असले किंवा त्याद्वारे माहिती सुद्धा  मिळत असली तरी पत्र लिखाण एक महत्वाची कला म्हणून आपली भूमिका बजावत ...

Nanyachya Don Baju-नाण्याच्या दोन बाजू

 रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : २११ विषय क्रमांक : ४ विषय : नाण्याच्या दोन बाजू शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई जेव्हा आपण नाण्याच्या दोन बाजू असे म्हणतो तेव्हा आपण नाण्यावर असलेला छापा आणि काटा इतकाच मर्यादित विचार करीत नसतो. इथे एवढेच म्हणावयाचे असते की एकाच गोष्टीला दोन पैलू असतात. म्हणजे दोन्ही बाजू एकाच संदर्भाच्या चौकटीतून काम करताना एकमेकांच्या विरुद्ध शक्यतांचे प्रतिनिधित्व करीत असतात. याचा अर्थ असा आहे की ज्या दोन गोष्टी आपल्याला वरवर विरुद्ध दिसतात पण मूलभूतपणे त्या समान असतात. शोकांतिका आणि विनोद, शिक्षण आणि तत्वज्ञान, प्रेम आणि द्वेष, आस्तिक आणि नास्तिक, श्रद्धा आणि संशय, वेग आणि विस्थापन, अगतिकता आणि लवचिकता अशा  काही उदाहरणांचा वापर आपण नाण्याच्या दोन बाजूचा अर्थ समजून घेताना होऊ शकतो. आपल्याला दिसताना दोन गोष्टी खूप दूर असलेल्या दिसतात पण त्या खूप खोलवर एकमेकांना जोडलेल्या दिसतात. असे बघा जेव्हा आपण उत्साही असतो तेव्हा आपल्याला आनंदाच्या उकळ्या फुटू लागतात आणि जेव्हा आपण एखाद्या तणावाखाली असतो तेव्हा खूप अस्वस्थ असतो. जेव्हा बऱ्याच दिवसानंतर आप...

Manus Kharach Badalato ka? माणूस खरंच बदलतो का?

 रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : २१० विषय क्रमांक : ४ विषय : माणूस खरंच बदलतो का? शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई माणूस हा प्राणिसृष्टीचा एक महत्वाचा भाग आहे. पुढे त्याने प्राणिसृष्टीचा त्याग करून स्वतःची अशी एक मानव सृष्टी निर्माण केली. त्यात त्याने नैसर्गिक अडचणीवर मात  करण्याची शक्ती निर्माण केली. याप्रकारात त्याने स्वतःच्या बुद्धीचा विकास केला आणि स्वतःचे जीवन विवेकाने जगण्यास शिकला. त्या विवेकाच्या आधारे त्याने नुसत्या हत्यारांचा शोध लावला नाही तर स्वबळावर त्याने प्रगत विज्ञानाची आणि सभ्य संस्कृतीची निर्मिती केली. ते करताना त्याने भाषेची निर्मिती तर केलीच पण स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्याने मिथकांचीसुद्धा निर्मिती केली. स्वतःला जगण्यासाठी त्याने शेतीची निर्मिती केली. त्यासाठी जंगलतोड केली आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या संरक्षणासाठी राज्यव्यवस्था तयार केली आणि त्या राज्यव्यवस्थेला संरक्षण देण्यासाठी त्याने सैन्याची उभारणी केली. या त्याच्या विकास कामात तो एका ठिकाणी कुठेही थांबला नाही. मानवसृष्टी अनेक दृष्टीने विकास पावण्यासाठी तो सतत प्रयत्नशील ...