रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १७५ विषय क्रमांक : ५ विषय : तडजोड ( लेख ) शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई संकेत स्थळ : नेहमी आपण म्हणत असतो की कोणत्याही नातेसंबंधात तडजोड असावीच लागते. मग तो तुमचा मित्र असो किंवा सहकर्मी, कुटुंबातील सदस्य असो किंवा तुमचा जोडीदार असो. याला कारण म्हणजे स्वयंपूर्ण असं कोणीही असत नाही. कितीही केलं तरी काही न काही गोष्टी राहूनच जातात. तडजोड करणे म्हणजे एकमेकांना समजून घेऊन आपल्या टोकाच्या तत्त्वांना मुरड घालणे. तडजोड करून आपण सर्वांमध्ये स्वतःचे भले करू शकतो. याचा अर्थ असा की प्रत्येकाच्या स्वभावाचा बाज ओळखून त्यात थोडीशी सवलत देणे होय. तडजोड ही आपण संवादाद्वारे सर्वबाजूने मान्य होणाऱ्या अटींचा स्वीकार करण्याचा एक करार असतो. त्यामुळे आपला संघर्ष टाळण्यास मदत तर होतेच पण नकळत काही लाभ सुद्धा होत असतात. तत्वनिष्ठ आणि व्यावहारिक तडजोड, तर्कशुद्ध तडजोड किंवा काही प्रमाणात सडलेल्या गोष्टींची तडजोड असे काही प्रकार तडजोडीचे असतात. सुप्रसिद्ध अमेरिकन राजकारणी आणि बराच काळ United States House of Representatives चे अध्यक्ष (Speaker) म्हणून...