Skip to main content

Posts

Showing posts from November, 2021

Adhi Kelechi Pahije आधी केलेची पाहिजे

 रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १६२ विषय क्रमांक : १ विषय : आधी केलेची पाहिजे शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई संकेत स्थळ : केल्याने होत आहे रे | आधी केलेची पाहिजे || यत्न तो देव जाणावा | अंतरी धरिता बरे || या ओळी आहेत संत रामदास स्वामींच्या. ते सांगतात कोणतीही व्यक्ती त्यांचे ध्येय निश्चितपणे साध्य करू शकतात पण त्यासाठी आधी त्यांनी कामाला सुरुवात केली पाहिजे. काम करणे म्हणजेच परमेश्वराला प्रसन्न करणे हे आपल्याला मनात बिंबवले पाहिजे. आपला  आळस झटकून टाकला पाहिजे. जर आपण कर्म करत राहिलो तर ते कर्म आपल्या आयुष्याचा एक भाग होऊन जाते आणि त्यातच आपल्याला परमेश्वर दिसू लागतो. प्रत्येक माणसाच्या जीवनात कर्माला फार महत्व आहे. जर माणसाने आपले आयुष्य कर्म न करता आळस करण्यात घालवीले तर त्याचे पुढील आयुष्य हे कष्टदायक किंवा त्रासदायक होऊ शकते. कोणतेही कर्म करताना अडचणी आणि अडथळे येऊ शकतात. म्हणून कर्म न करता नुसते पडून राहणे हा काही त्यावरील उपाय नाही. अशा अडचणीवर मात करण्यासाठी मार्ग शोधला पाहिजे. त्यासाठी प्रथम कामाला सुरुवात केलीच पाहिजे. भगवान श्रीकृष्णाने तर कर्मयोगा...

Vyakti Titktach Prakruti -व्यक्ती तितक्या प्रकृती

 रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक :१६१ विषय क्रमांक :१ विषय : व्यक्ती तितक्या प्रकृती शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई संकेत स्थळ : माणूस हा पृथ्वीवरचा सर्वात हुशार आणि बुद्धीमान प्राणी आहे. तो लिहू शकतो, वाचू शकतो, बोलू शकतो. आपल्या विलक्षण बुद्धीच्या जोरावर हवे ते करू शकतो. विचार, आणि कृतीच्या द्वारे तो आपल्या भावना व्यक्त करू शकतो. या त्याच्या गोष्टी जरी नैसर्गिक असल्या तरी प्रत्येक व्यक्तीचे विचार त्याच्या स्वभावानुसार घडत असतात. म्हणूनच समाजामध्ये एक म्हण तयार झाली ती म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती. इथे प्रकृती हा शब्द प्रवृत्ती म्हणून वापरला गेला आहे असे वाटते. पाहायला गेले तर असे दिसेल की प्रकृतीची मोजदाद गणिती पद्धतीने करणे शक्य होत नाही. त्यासाठी कोणतेही परिणाम नाही आहेत. याला कारण म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा असलेला वेगळा दृष्टीकोन. अशा वेगवेगळ्या दृष्टीकोन असलेल्या अनेक व्यक्ती बऱ्याच ठिकाणी भेटत असतात किंवा दिसत असतात. मुंबईमध्ये लोकल ट्रेन किंवा बस मधून प्रवास करताना, देवळाच्या रांगेत उभे असताना, कार्यालयात काम करत असताना, मुंबईहून बाहेरगावी जाताना कधी विमान ...

Mukttata मुक्तता

 रंग लेखणीचा परिवार आठवडा क्रमांक : १६० विषय क्रमांक: ५ विषय : मुक्तता शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई संकेत स्थळ :  https://yogeshgogwekar. blogspot.com/ मुक्तता म्हणजे एखाद्या बंधनातून सुटण्याची क्रिया किंवा  एका त्रासातून, जंजाळातून किंवा बंधनातून मानवाला सोडविणे. माणसाला अनेक गोष्टींपासून मुक्तता हवी असते. मग प्रश्न पडतो की अशा कोणत्या गोष्टीं आहेत की त्यापासून माणूस मुक्त होऊ इच्छितो. जर त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर एक गोष्ट दिसून येईल की प्रत्येक माणसाला जीवनात सुख आणि शांती हवी असते. त्यासाठी त्याला मुक्तता हवी असते ती अहंकारापासून, द्वेषापासून, व्यसनापासून, भयापासून, क्रोधा पासून आणि विकारापासून. जर आपण नुसत्या याच गोष्टी मुक्तीचा शोध घेताना घेतल्या तर तो शोध मर्यादित स्वरूपाचा असू शकतो. जेव्हा आपण माणसाचाच शोध घ्यायचा प्रयत्न केला तर आपल्याला एक गोष्ट जाणवते की माणसाला सर्वात मोठी मुक्तता हवी असते ती गुलामगिरीतून किंवा पारंपारिक बंधनातून. मग ती मुक्तता  सामाजिक, आर्थिक, धार्मिक, वैचारिक, शैक्षणिक अशा कोणत्याही प्रकारची असू शकते. कारण माण...

Maze Avadate Vyaktimatv माझे आवडते व्यक्तिमत्व

विषय : माझे आवडते व्यक्तिमत्व शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई व्यक्तिमत्व या शब्दावर अनेक व्याख्या आहेत. निसर्गाने माणसाला अनेक जीवन-बीजे दिली आहेत. मानवी जीवनात आलेल्या सामाजिक, भावनिक व शारीरिक परिस्थिती नुसार त्या बीजांची वाढ होऊन त्याचा एक पिंड तयार होतो. माणसाचा हा पिंड म्हणजेच त्याचे व्यक्तिमत्व असे म्हटले जाते. पण ही व्याख्या एकांगी वाटते. कारण त्यात माणसाच्या स्वभाववैशिष्ट्यांचा, बुद्धीचा, भावनांचा, गुणांचा व वृत्तीचा त्यात समावेश होत नाही. त्यामुळे माणसाच्या व्यक्तिमत्वाची व्याख्या करायची असल्यास असे म्हणावे लागेल की सर्वसामान्यपणे व्यक्तीच्या वर्तनाची सर्वांगस्पर्शी व संघटकस्वरूप गुणात्मकता म्हणजे व्यक्तिमत्व. अशी अनेक व्यक्तिमत्वे जगात होऊन गेली आहेत, होतही आहेत आणि पुढे सुद्धा होत राहतील. पण त्यातील एक व्यक्तिमत्व माझे आवडते आहे असे शोधणे सुद्धा खुप कठीण आहे. काही व्यक्तिमत्वे आपल्या जीवनावर असा काही ठसा उमटवून जातात की त्यावर लिहिण्यासाठी चार पानी लेख कमी पडू लागतो. भारताबद्दल बोलायचे झाल्यास अनेक व्यक्तिमत्वे अशी आहेत की त्याबद्दल किती लिहू असे होऊन जाते. शि...