Skip to main content

Posts

Showing posts from September, 2021

Small writing on Nightingale Lata Mangeshkar

  f seven decades,  she has recorded  more than 10000 songs in Hindi & sung for 36 regional languages other than Marathi. Written by : Yogesh Gogwekar A ddress : Mahim, Mumbai  Website  : https://yogeshgogwekar.blogspot.com/ Today is the birthday of great  Singer who has been awarded with Bharat Ratna in 2001 by Indian Government and she is nothing but Lata Mangeshkar who has turned 92. Her birth name was Hema but her parents changed her name and renamed as Lata after female character, Latika in one of her father's play "Bhaav Bandhan " and world started knowing her as Lata Mangeshkar. Born on 28.09.1929 in Princess state Indore under British India,  Lata Mangeshkar started her career in 1942 by recording her first Marathi song " Naacha Ya Gade, Khelu  Sam mani Hous Baan" for film Kiti Hasal and music composed by Sadashiv Narvekar and after that over the span o She took her first music lesson from her father & for Hindusthani classical mus...

Nakki ha desh Konacha नक्की हा देश कोणाचा

  रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १५३ विषय क्रमांक :४ विषय : नक्की हा देश कोणाचा शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम , मुंबई भारताच्या सत्तराव्या प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला भाषण करताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या भाषणात भारताची विविधता मान्य करताना म्हटले होते की , " आपण कोणत्याही समुदायाचे , कोणत्याही भागाचे असलो तरी देशाच्या साधनसंपत्तीवर सर्वांचा समान अधिकार आहे. विविधता हेच भारताचे बलस्थान आहे. सर्व वर्ग , समुदायांना योग्य स्थान देणाऱ्या राष्ट्राच्या रूपात जाऊया. विकास , एकतेतील विविधता आणि लोकशाही या तत्वांचा स्विकार करून लोकशाहीच्या सर्व उत्सवांमध्ये सामील होऊ या ". यात राष्ट्रपतीने भारतातील विविधता नुसती मान्य केली नाही तर त्या विविधतेचे बलस्थानसुद्धा मान्य केले आहे. मग प्रश्न पडतो तो म्हणजे विविधता म्हणजे काय ?  विविधता ही कुठल्या प्रकारची असू शकते ? याचे उत्तर द्यायचे झाल्यास असे म्हणता येईल की विविधता म्हणजे विविध पार्श्वभूमी आणि दृष्टिकोन असलेल्या व्यक्तींचा समूह. मग त्यात वेगवेगळे पण असलेला   वांशिक , सामाजिक , आर्थिक आणि सांस्...

Manuspan माणूसपण

  रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १५२ विषय क्रमांक : ४ विषय : माणूसपण शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम , मुंबई संकेत स्थळ : https://yogeshgogwekar.blogspot.com/   माणूसपण हा मानव जातीतील एक महत्वाचा मानवी गुण आहे. पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक मानवाने   प्रेम करण्याच्या क्षमतेवर मिळवलेला हा गुण आहे. इथे प्रेम करणे म्हणजे फक्त स्वतःवर आणि स्वतःच्या कुटुंबावर किंवा मित्रांवर करणे नसून , सर्व मानवजातीवर करणे असा आहे. स्वतःवर आणि आपल्या कुटुंबावर किंवा मित्रांवर प्रेम करणे सोपे असते पण अखंड मानवजातीवर प्रेम करणे खूपच कठीण असते. त्यासाठी हवा असतो सर्व मानवी समाजाला समजून घेण्याचा समजूतदारपणा. नाहीतरी माणूस स्वतःची ओळख त्याच्या एका विशिष्ट वंशाशी , धर्माशी , त्वचेच्या रंगाची व आर्थिक प्रश्नाशी करून घेत असतो. या कक्षेतील लोकांना तो आपले मानतो किंवा आपल्याला त्यांच्यापैकी एक मानतो. जी माणसे आपल्या सामाजिक स्तरात येत नाही अशा लोकांकडे एकतर आपण संशयाने पाहतो किंवा त्यांच्याकडे जीवनात दुर्लक्ष करतो. म्हणूनच आपल्याला सर्व मानवजातीबद्दल प्रेम किंवा आदर वाटत नाह...

Ganesh ustav गणेशत्सव : उत्सवांचा शिरोमणी

  रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक :१५१ विषय : गणेशत्सव : उत्सवांचा शिरोमणी शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम , मुंबई गणपती हे एक भारतीय संस्कृतीचे आराध्य दैवत. हे दैवत प्रणवस्वरूप असून या दैवताला विनायक ,  गणेश ,  गजानन ,  सुमुख ,  एक दंत ,  विध्वंसक ,  भालचंद्र ,  गणाध् यक्ष ,  धूमकेतू वगैरे नावे आहेत. या दैवताला विघ्नराज व विघ्नहर्ता असेही म्हटले जाते. म्हणून या दैवताची पूजा विघ्नविनाशक मंगलमूर्ती म्हणून केली जाते. सोळा विद्या व चौसष्ट कला यांही या दैवताला माहित असल्यामुळे त्याची पूजा करून त्यास प्रसन्न केल्यानंतर    त्याच्या कृपेने सु्बुद्धी व सुविद्या यांचा लाभ होतो असे म्हटले जाते.    कार्य लहान असो वा मोठे असो ते निश्चितपणे पूर्ण करण्यास या दैवताचा आशीर्वाद फार जरुरीचा असतो. आपण कुठलेही कार्य करत असताना काही अदृश्य शक्ती अशा काही अडचणी उभ्या करतील हे आपणास माहित नसते ,  त्यासाठी प्रत्येक कार्याच्या आरंभी , "  श्री गणेशाय नमः " असे म्हणत या विघ्नहर्ता परमेश्वराची प्रार्थना करून त्याचा आशीर्वा...