Skip to main content

Posts

Showing posts from June, 2021

Bhramanti Pravasvarnan भ्रमंती (प्रवासवर्णन) 📝

  रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १४० विषय क्रमांक :३ विषय : भ्रमंती (प्रवासवर्णन ) शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम , मुंबई मी माझ्या आयुष्यात खूप भ्रमंती केली आहे. मग ती भ्रमंती कधी कामानिमित्त घडलेली असो किंवा वैयक्तिक ठरवून केलेली असो. तो एक घडलेला सुखमय प्रवास असतो. मग तो प्रवास डोंगर खोऱ्यातील असो किंवा समुद्र किनाऱ्यावरचा किंवा आपण ज्या शहरात राहतो त्या शहरात केलेली भ्रमंती असो. भ्रमंती किंवा प्रवास ही अशी गोष्ट आहे की ती आपल्या शरीरातील सुप्त असलेले उत्साहाचे इवलेसे कारंजे मोकळे करते , मनाचा शिणवटा कमी करून मन प्रसन्न करते. जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. नवीन देश प्रदेश पाहिल्याने किंवा फिरल्याने आपल्याला जे ज्ञान मिळते व अनेक अनुभव येतात त्यातून आपली संवेदना वाढीस लागण्यास मदत होते आणि आपल्याला मनसोक्त आनंद मिळत असतो. भ्रमंती करत असताना त्या प्रदेशाची भौगोलिक माहिती तर मिळतेच पण त्या प्रदेशाचा इतिहास , तिथली माणसे व त्यांचे राहणीमान , त्यांची वेशभूषा , त्यांचे संगीत व साहित्य , त्यांचे खेळ , त्या भागातील प्रेक्षण...

Rashichakra (Lekh) राशीचक्र (लेख)📝

  रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १३९ विषय क्रमांक : २ विषय : राशीचक्र (लेख) शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम , मुंबई   प्राचीन वेदकालीन भारतात ऋषींजनांनी सूर्याला पृथ्वीवरील सजीव सृष्टीचा आधारभूत ठरवले व सूर्याची अनेक प्रकारे स्तुती केली आहे. त्यासाठी त्यांनी सूर्य व चंद्र यांना महत्व देण्यासाठी मास , ऋतु , नक्षत्र यासंबधी काही सिद्धांत ठरविले. त्यामुळे पुराणात अनेक ठिकाणी आपणास असे आढळेल की सूर्य कधीच अस्त पावत नाही. जेव्हा आपण म्हणतो सूर्य अस्तास जातो तेव्हा त्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की सूर्य दिवसाच्या अंतास जाऊन स्वतःच उलटा फिरतो आणि एकीकडे रात्र व दुसरीकडे दिवस करतो. उदय याचा अर्थ असा की सूर्य रात्रीचा अंत करून स्वतःस उलट फिरतो. सूर्य आणि चंद्र यांच्यामुळे पृथ्वीवर प्रकाश आणि अंधःकार यांचे सिद्धांतानुसार नियमन होऊन सजीव पदार्थाचे स्थित्यंतर होत असते. त्यामुळेच ज्योतिष शास्त्राचा उदय झाला असे वाटते. याचे कारण ज्योतिषशास्त्रज्ञानी कालमानाचे माप ठरवून वर्ष , ऋतु , मास , वार असे मुख्य भाग पाडले. भारतीय ज्योतिषशास्त्र असे सांगते की सूर्य आणि चंद्र एका ठ...

Ankhi kay hav आणि काय हवं

  रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १३८ विषय क्रमांक : २ विषय :आणि काय हवं शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम , मुंबई माणसाचे मन नेहमी सुखाच्या भोवती फिरत असते आणि ते सुख मिळविण्यासाठी माणूस जगभर हिंडत असतो. त्यासाठी तो भरपूर मेहनतही करतो पण त्याला बऱ्याच ठिकाणी सुखी झालेली माणसे जवळजवळ दिसत नाही. कारण सुख म्हणजे नक्की काय असते याचा पूर्ण विचार तो कधीच करत नाही. प्रत्येक छोट्या गोष्टी आपल्या मनासारखी झाली नाही तर तो नाराज होतो आणि सुखापासून दूर जातो. " सुख हे कणभर गोष्टीमध्ये लपलेले असते फक्त ते मनभर जगता आले पाहिजे ", हे वाक्य मी कुठेतरी वाचले होते . नक्की कुठे ते सांगता येत नाही. पण या वाक्यात खुप खोलवर अर्थ रुजला गेला आहे. समजा आपल्याला एक पुस्तक   वाचायला हवे असते आणि ते पुस्तक   मिळवण्यासाठी आपण वाचनालयात गेलो व तिथे गेल्यावर ते पुस्तक अचानक आपल्या समोर टेबलावर ठेवलेले असते , तेव्हा आपल्या मनाला खूप आनंद होतो हे आपण शब्दात सांगू   शकत नाही. तसेच अजून एक उदाहरण पाहू. वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणारी अनेक व्यक्तिमत्वे आपण पाहत असतो....

Jagatik Paryavaran Din जागतिक पर्यावरण दिन (लेख )

  रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १३७ विषय क्रमांक : ३ विषय : जागतिक पर्यावरण दिन (लेख ) शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम , मुंबई ५ जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून सर्व जगभर साजरा केला जातो. आज माणसाला पर्यावरणचा समतोल राखणे फार जरुरीचे आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी मनुष्य आपल्या कृतीने पर्यावरणाचा समतोल बिघडून टाकत आहे. विकासाच्या नावाखाली वृक्षतोड करणे , नद्याचे आणि समुद्राचे पाणी प्रदूषित करणे असे प्रकार आपल्या रोज पाहण्यात येत आहे. त्यामुळे वातावरणात कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढून ऑक्सीजनचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे. त्यामुळे भविष्यात माणसाला गंभीर परिणामास तोंड द्यावे लागणार आहे. औद्योगिक क्रांती कितीही माणसाला उपकारक ठरली असली तरी त्याचे बरेच दुष्परिणामसुद्धा दिसू लागले आहेत. दोन महायुद्धामधून निर्माण झालेली आण्विक शस्त्रे निसर्गावरील एक प्रकारचे आघात असून पर्यावरण बिघडवण्यास कारणीभूत ठरत आहे. जर माणसाने आवश्यक अशी कृती करून पर्यावरण सुरक्षित व सुदृढ केले नाही तर निसर्गाकडून माणसाला मिळणारे अन्न , पाणी आणि श्वास घ्यायला मिळणारी हवा बंद होऊन ही सर्...