Skip to main content

Posts

Showing posts from April, 2021

Ramduta Prabjanjana रामदूता प्रभंजना (लेख

  रंग लेखणीचे परिवार आव्हानात्मक विषय   आठवडा क्रमांक : 132 विषय क्रमांक : 1 विषय : रामदूता प्रभंजना (लेख) दिनांक : 28/04/2021 शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम , मुंबई मारुती हे हिंदुधर्मातील एक लोकप्रिय दैवत आणि रामायणातील मोठी व्यक्तिरेखा. या देवतेची प्रतिमा जनमानसात इतकी खोलवर रुजलेली आहे की भारतातील प्रत्येक गावात ह्या देवतेचे मंदिर आपण पाहत असतो. सप्तचिरंजीवीपैकी एक चिरंजीव असलेले हे दैवत अनेक नावाने ओळखले जाते.   यास एकशे आठ नावे असली तरी ह्या दैवतास कुणी अंजनेय , महावीर , महाबली , हनुमान , मारुती , रामदूत , कपीश्वर , महाकाय , वज्रकाय वगैरे नावाने ओळखतात. या देवाची खरी ओळख प्रभू श्रीरामचंद्राचा प्रमुख सेवक अशीच आहे. तरीसुद्धा हे दैवत शक्तिशाली असून भूत , प्रेत , पिशाच्च यापासून सुटका करणारं आहे असे मानले जाते. त्यामुळे या दैवताची देवळे गावाबाहेर झाडाखाली शेंदूर लावलेली मूर्ती आपल्या नजरेस पडतात. रामायणातील शक्तिशाली असलेलं हे दैवत आपणास महाभारतात आणि अनेक पुराण कथेतपण आलेले दिसते. रामायणात हे दैवत प्रभू श्रीरामचे परमभक्त तर आहेतच तरीसुद्धा महाभ...

Asambhav Short story -असंभव(कथा)

  रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : 131 विषय क्रमांक : 4 विषय : असंभव(कथा) दिनांक : 24/04/2021 शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम , मुंबई मुंबईच्या एका नामांकित कंपनीमध्ये गेली पाच वर्षे प्रथमेश ऑडिट विभागात काम करीत आहे. दरवर्षी दोनदा तरी कंपनीच्या इतर भागात कार्यरत असलेल्या शाखेत जाऊन ऑडिट करणे आणि त्याचा वृत्तांत कंपनीच्या वरिष्ठाना देणे हा त्याच्या कार्याचा भाग आहे. त्याप्रमाणे यावेळेस तो छत्तीसगड या राज्यात जाऊन तिकडे कार्यरत असलेल्या शाखांचे ऑडिट करणार होता. त्याची सुरुवात तो बिलासपूर या शहरापासून करणार होता. त्यासाठी मुंबई बिलासपूर रेल्वेने प्रवास करण्यासाठी त्याने मुंबई वरून सकाळी सहा वाजता सुटणारी गीतांजली एक्सप्रेस या ट्रेनचे तिकीट काढले पण ती गाडी बिलासपूरला मध्यरात्री सव्वादोन वाजता पोचत असे. इतर कोणत्याही गाडीचे तिकीट मिळाले नसल्यामुळे त्याला याच गाडीने प्रवास करणे जरुरीचे होते. तेव्हा त्याच्या मनात एक प्रश्न उभा राहिला की एवढ्या मध्यरात्री आपण त्या गावी पोहचल्यावर गावाकडे जाण्यासाठी काही वाहन मिळेल का ? मग मनाची तयारी करून त्याने ठरवले की जर वाहन ना...

Vachnatun Janale mee: या आठवड्याचे वाचन BOMBAY PLACE-NAMES AND STREET-NAMES

  रंग लेखणीचे परिवार उपक्रम : वाचनातून जाणले मी दिनांक : 23/04/2021 शब्दांकन : योगेश गोगवेकर   संकेत स्थळ : पुस्तकाचे नाव : BOMBAY PLACE-NAMES AND STREET-NAMES लेखक : सॅम्युअल टी शेपार्ड वाचनासाठी लागलेला कालावधी : 3 दिवस   वाचनानुभव :   मला जर कुणी विचारलं की भारतातील तुझी आवडती ठिकाणे कोणती तर माझे उत्तर असेल मुबंई आणि गोवा. त्यात मुंबई फारच प्रिय. मुंबई माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी. या शहराच्या रस्तावर फिरत खेळत मोठा झालो. त्यामुळे ह्या शहराचा इतिहास काय आहे , ह्या शहराच्या रस्त्याला कशी नावे दिली गेली ह्याचे मला नेहमीच कुतूहल असायचे. जेव्हा मी मुंबईत फिरू लागलो तेव्हा मला अनेक रस्त्यांची नावे कशी आली याचे कोडे उलगडत नव्हते. गिरगांव , भुलेश्वर , चर्नी रोड , क्रॉफर्ड मार्केट , पायधूनी , वगैरे नावे कशी दिली गेली त्यामागे काही करणे आहेत का ? असे प्रश्न मला नेहमीच पडत असे. त्याबद्दल मी अनेक लोकांकडे ह्याची चौकशी केली तर मला व्यवस्थित उत्तरे मिळत नव्हती. तेव्हा मी ठरवले की मुंबईचा इतिहास वाचायचा आणि त्यातील उत्तरे शोधायची. सुरुवातीला काही मराठी पुस्...

Vachnatun Janale Mee : पुस्तकाचे नाव : 84, Charing Cross Road

  रंग लेखणीचे परिवार उपक्रम : वाचनातून जाणले मी दिनांक : 17/04/2021 शब्दांकन : योगेश गोगवेकर संकेत स्थळ : पुस्तकाचे नाव : 84, Charing Cross Road लेखिका : हेलन हँफ्फ वाचनासाठी लागलेला कालावधी : एक दिवस वाचनाभूव: फोर्ट , मुंबई येथील स्ट्रॅण्ड बुक स्टॉल हे माझे पुस्तके विकत घेण्याचे आवडते ठिकाण. साधारणता अडीच वर्षापूर्वी (दुकान बंद होण्यापूर्वी) मी दुकानात गेलो असता मला एक इंग्रजी पुस्तक हाती लागले. ते पुस्तक काही कादंबरी किंवा प्रेम कथा किंवा प्रणयरम्य पुस्तक नव्हते तर ते पुस्तक होते दोन व्यक्तीने पुस्तकासाठी पत्राद्वारे केलेला संवाद. हा पत्रव्यवहार होता एका पुस्तक प्रेमी वाचकाचा आणि पुस्तकाच्या दुकानात काम करण्याऱ्या दुसऱ्या पुस्तकप्रेमी कर्मचाऱ्याचा. मी जेव्हा पुस्तक चाळू लागलो तेव्हा मला पहिलेच पत्र आवडले. म्हणून मी पुढची दोन पत्रे सुद्धा वाचली आणि मी आश्चर्यचकित झालो. लगेच पुस्तक विकत घेऊन माझ्या पुस्तकांच्या संग्रहात जमा केले. या पुस्तकातील लिखाण जरी कलात्मक नसले तरी मनोरंजक आहे. मी घरी येऊन हे पुस्तक वाचू लागलो तेव्हा मी त्या पुस्तकातील संवाद वाचून   खूपच...

Vachnatun Janale Mee ; पुस्तकाचे नाव : जागर

 विषय  : वाचनातून जाणले मी दिनांक : 17/04/2021 शब्दांकन : योगेश गोगवेकर संकेत स्थळ : पुस्तकाचे नाव : जागर   लेखक : नरहर अंबादास कुरुंदकर वाचनासाठी लागलेला कालावधी : तीन दिवस वाचनानुभूव   काही लेखक असे असतात की त्यांचे राजकीय , सामाजिक आणि आर्थिक विचार कुठल्याही कालखंडाशी सुसंगत असतात. मग ते विचार इतिहासाबद्दल असो किंवा वर्तमानातील प्रत्येक घडामोडीबद्दल असो. त्यांनी   चिकित्सक पद्धतीने केलेले लिखाण आपल्याला कुठल्याही काळातील राजकीय , सामाजिक आणि आर्थिक मूल्यप्रणाली समजून घेण्यास मदत करते. कारण अश्या लेखकांची कक्षा एवढी प्रचंड असते की त्यांना कुठलाही विषय वर्ज्य नसतो. त्यांचे वाचन चौफेर तर असतेच पण बुद्धिमत्ता फारच तीक्ष्ण असते आणि व्यासंग म्हणाल तर खूपच मोठा असतो. अश्या लेखकांपैकी एक लेखक म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले नरहर अंबादास कुरुंदकर. इतिहास , सौंदर्यशात्र , नाट्यशात्र , स्वातंत्र्याचा लढा , संगीत , साहित्य समीक्षा अश्या वेगवेगळ्या विषयांवर सडेतोडपणे लिखाण करून त्यांनी अवघ्या वैचारिक विश्वाला   हळुवारपणे विचार करायला लावले आणि पूर्...