शिक्षणक्षेत्रात माणसाने इतकी आघाडी घेतली असतानाही नीतिमूल्यांची सतत घसरण होत आहे; माणसातील राक्षसी वृत्ती वाढत चालली आहे.यावर मात कशी करावी? (वैचारिक लेख)
शुभंकरोति साहित्य परिवार सप्ताह क्र.: १९५ | विषय क्र.: ४ विषय :शिक्षणक्षेत्रात माणसाने इतकी आघाडी घेतली असतानाही नीतिमूल्यांची सतत घसरण होत आहे; माणसातील राक्षसी वृत्ती वाढत चालली आहे.यावर मात कशी करावी? (वैचारिक लेख) शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा. प्रा. सुमतीताई पवार शिक्षण हे कोणत्याही मानवी समाजाच्या यशाचे आणि विकासाचे मूलभूत अधिष्ठान आहे. समाजाच्या बौद्धिक, सांस्कृतिक आणि नैतिक प्रगतीसाठी सुदृढ शिक्षणव्यवस्था आवश्यक आहे, याबाबत कोणाचे दुमत नाही. तसेच कोणत्याही समाजाचा शैक्षणिक दृष्टीकोन न्याय, समता आणि बंधुत्व या मूल्यांवर आधारित असायला हवा. म्हणूनच कोणत्याही देशाच्या शासनाने अशी शिक्षणव्यवस्था उभारली पाहिजे, जी समाजातील सर्व घटकांना, त्यांची सामाजिक किंवा आर्थिक पार्श्वभूमी काहीही असो, समान संधी देणारी असेल. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय शिक्षणधोरण आखताना सामाजिक समानता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कशुद्ध विचारसरणी यांना केंद्रस्थानी ठेवले. कोणतेही शिक्षण विशिष्ट धर्म, श्रद्धा किंवा अंधपरंपरांच्या प्रभावापा...