Skip to main content

OLAKH-ओळख

 

रंग लेखणीचे परिवार

आठवडा क्रमाक : २५३

विषय क्रमांक : ३

विषय: ओळख

शब्दांकन : योगेश गोगवेकर

पत्ता: माहीम ,मुंबई

ओळख ही एक आभासी गोष्ट असल्यामुळे त्याची अनुभवात्मक व्याख्या करणे शक्य होत नाही. त्यासाठी या  शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी मानसशास्त्राची मदत घ्यावी लागते. मानसशास्त्रामध्ये ओळख हा शब्द माणसांचे वैयक्तिक गुण किंवा माणसाच्या वैशिष्टांचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे इथे असे म्हणता येईल की ओळख म्हणजे एखाद्या माणसाचे गुण, विश्वास किंवा व्यक्तीमत्वाचे वैशिष्ट्ये समजून घेणे. म्हणून ओळख हा शब्द आत्म-संकल्पना, स्व-प्रतिमा, आत्म-सन्मान आणि व्यक्तिमत्व यांच्यांशी संबंधित आहे. एखाद्या व्यक्तीची ओळख समजून घेण्यासाठी त्या व्यक्तीची वृत्ती, आत्म-ज्ञानाची क्षमता, त्या व्यक्तीचा भूतकाळ आणि वर्तमान काळातील वर्तन, त्याची सामाजिक भूमिका, त्याचे समाजातील इतर माणसांशी असलेले संबंध इत्यादी गोष्टी महत्वाच्या ठरतात. ही वैशिष्ट्ये जेव्हा एकत्रितपणे परिभाषित केली तर ती व्यक्ती कोण आहे, कशी आहे आणि त्या व्यक्तीचे समाजातील इतर घटकाबद्दल काय मत आहे तेव्हा त्या व्यक्तीची ओळख होत असते. एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की कोणत्याही व्यक्तींची ओळख ही कधीच स्थिर असू शकत नाही. प्रत्येक संदर्भानुसार किंवा परिस्थितीनुसार ती बदलत असते. म्हणून माणसाच्या ओळखीमध्ये दोन महत्वाची वैशिष्टे सतत आढळून येतात. ती म्हणजे सातत्य आणि परस्परविरोध. सातत्यात माणसाची ओळख नेहमी तीच राहते जी काल होती किंवा आज आहे आणि उद्यासुद्धा तशीच राहणार. पण परस्परविरोधात लोक बदलतात त्यामुळे माणसाची ओळख पूर्वीसारखी न राहता ती बदलत जाते. याचाच अर्थ ओळख माणसांच्या विविध पैलूंचा म्हणजे धार्मिक, व्यवसायिक, राष्ट्रीय, लिंग, शैक्षणिक आणि राजकीय मतांशी निगडीत असते.

असे म्हणतात की एखाद्या व्यक्तीची ओळख त्याच्या लहानपणापासूनच होत जाते कारण लहानपणीच मुले त्यांच्या आत्मसंकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. जरी माणसाची वैयक्तिक ओळख सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांद्वारे आकारली जात असली तरी एखाद्याची ओळख समाजातील इतर लोक ती कशाप्रकारे स्विकारतात यावर अवलंबून असते. म्हणून ओळख या शब्दाची व्युत्पत्ति एखाद्या व्यक्तीची मानसिकता आणि इतर लोकांची समानता यावरून ठरविले जाऊ शकते. याचाच अर्थ ओळख स्व-नियामक संरचना म्हणून काम करत ती प्रत्येक व्यक्तीला अंतर्गत सुसंवाद वाढविण्यास मदत करीत असते आणि भविष्यात दीर्घकालीन उद्दीष्ट्ये स्थापित करण्यास मदत करते. हे सर्व मानसशास्त्राच्या आधारे सांगता येते. पण समाजशास्त्रामध्ये सामुहिक ओळखीला महत्व दिले जाते. त्यामध्ये एखाद्या व्यक्तीची ओळख त्याची कामाशी किंवा वर्तणुकीशी परिभाषित केली जाते. कॅलिफोर्निया विद्यापीठातील समाजशास्त्राचे प्राध्यापक व लेखक पीटर बर्क यांच्या मते ओळख हे अर्थाचे संच आहेत जे आपल्या भूमिकांच्या संदर्भात आपण कोण आहोत हे परिभाषित करीत असतात. ते पुढे म्हणतात की ओळख हा सिद्धांत उत्पत्तीचे पुनरावलोकन करतो आणि प्रत्येक व्यक्त्ती कोणत्या सामाजिक श्रेणीमधली आहे किंवा त्या व्यक्तीची इतरांपेक्षा वेगळी ओळख असण्यासाठी त्यांची वैशिष्ट्ये कोणती आहेत याबद्दलची माहिती देत असतो. एखाद्या व्यक्तीने त्याच्या क्षेत्रात स्वतःची अशी काही ओळख निर्माण केलेली असते की त्या व्यक्तींचे नाव घेताच आपल्याला त्या व्यक्त्तीचे क्षेत्रच आठवत असते. इथे आपल्याला खेळाडू, डॉक्टर, वकील, उद्योजक वगैरे यांची उदाहरणे देता येईल. म्हणून समाजशास्त्रात ओळख ही संकल्पना प्रत्येक व्यक्ती स्वतःला वैयक्तिक आणि सामाजिकरित्या कोण समजते हे संशोधनासाठी मनोरंजन क्षेत्र आहे असे वाटायला लागते.

ओळखीची निर्मिती आपण नेहमी माणसाच्या विकासाशी किंवा त्यांनी केलेल्या निर्मितीशी जोडत असतो. ही एक जटील प्रक्रिया असून ज्यात मानव स्वतःबद्दल किंवा त्याच्या ओळखीबद्दल स्पष्ट आणि अद्वितीय दृष्टिकोन तयार करतो. याचाच अर्थ स्व-संकल्पना, व्यक्तिमत्वाचा विकास आणि त्याची मुल्ये या सर्वांचा ओळख निर्मितीशी जवळचा संबंध आहे. त्यामुळे ओळख निर्मितीमध्ये व्यक्तित्व फार महत्वाचे आहे आणि सातत्य व आंतरिक ऐक्य ही निरोगी ओळख निर्मिती आहे. म्हणूनच वांशिकता आणि अध्यात्म सारख्या गोष्टी ओळख निर्मितीसाठी महत्वाचे घटक बनतात. वैयक्तिक ओळख या संकल्पनेमध्ये एखादी व्यक्ती स्वतःबद्दल प्रश्न उभे करून स्वतःच्याच मूळ धारणेला आव्हान देत असते. त्यामुळे निरनिराळे घटक एखाद्या व्यक्तीची ओळख बनतात की ज्यामध्ये सातत्य, इतरांपासून वेगळेपणाची भावना आणि व्यवसायाची भावना असते. जेव्हा अनेक पातळ्यांवर ओळख निर्माण होत असते तेव्हा वैयक्तिक दृष्टीकोनातून पाहिलेल्या समस्या, तात्काळ समुदाय आणि कुटुंब या गोष्टीमधून परिभाषित करून ती राष्ट्रीय किंवा जागतिक स्तरावर जोडली जाते. म्हणून असे म्हटले जाते की ओळख ही संकल्पना अनेकदा मर्यादित म्हणून ओळखली जाते आणि त्यात वेगवेगळे भाग पडले जातात. याचाच अर्थ मानवी विकासाच्या संदर्भात ओळख निर्मितीचे अनेक पैलू समाविष्ट झालेले असतात. हाच संदर्भ घेऊन अनेक मानसशास्त्रज्ञांनी ओळखीचा सिद्धांत मांडण्यास सुरुवात केली. त्यात प्रामुख्याने तीन मानसशास्त्रज्ञानाची नावे घेतली जातात. ती म्हणजे एरिक एरिक्सन, जेम्स मर्सिया आणि जेफ्री अर्नेत. यामध्ये जर्मन-अमेरिकन मनोविश्लेषक एरिक एरिक्सन यांनी पहिल्यांदा पहिल्यांदा माणसाच्या मनोवैज्ञानिक विकासाच्या सिद्धांतासाठी ओळख या शब्दाचा सिद्धांत मांडला. या तिघांनी मांडलेल्या ओळख या शब्दाचा  सिद्धांत थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू.

एरिक एरिक्सन यांचा ओळखीचा सिद्धांत असे सांगतो की सर्व मानवजात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्ष किंवा संकटाचा अनुभव घेत असते. अशा संकटाचे किंवा संघर्षाचे निराकरण करून मानव स्वतःचे मनोवैज्ञानिक सामर्थ विकसित करीत असतो. त्यामुळे मानव स्वतःचा आत्मविश्वास वाढवून स्वतःचे जीवन निरोगी बनवू शकतो. त्यासाठी त्यांनी मानवी जीवनातील आठ टप्पे दिले आहेत. विश्वास विरुद्ध अविश्वास, स्वायतत्ता विरुद्ध शंका, पुढाकार आणि अपराधीपणा, उद्योग आणि कनिष्ठता असे चार टप्पे माणसाच्या जन्मापासून ते त्याच्या बालपणाच्या समाप्तीपर्यंतचा कालखंडात येतात असे सांगताना तो म्हणतो इथे लहान मुले सर्व गोष्टीसाठी आईवडिलांवर किंवा दुसऱ्या कोणावर अवलंबून असतात. त्यामुळे मुलांमध्ये सुरक्षिततेची भावना तयार होते जी त्यांची ओळख बनण्यास मदत करते. ओळख आणि गोंधळ हा पाचवा टप्पा सांगताना तो मानवी जीवनाचा १२ ते १८ वर्षाचा कालखंड पकडतो. इथे माणसाला स्वतःच्या भावना विकसित करण्यासाठी स्वतःचे ध्येय आणि मुल्ये तपासून स्वतःची ओळख विश्वासाने तयार करावी लागते. इथे माणूस स्वतःला ,”मी कोण आहे ?”, असे प्रश्न करत स्वतःची ओळख तयार करतो. आत्मीयता आणि वेगळेपण या सहावा टप्पा वयाचं १९ ते ४० वर्षातील असतो. इथे एरिक्सन म्हणतो की प्रत्येक माणूस स्वतःची ओळख तयार करून इतर व्यक्तींशी ओळख करून त्यांच्या समवेत काम करण्यासाठी तयार होतात. सातव्या आणि आठव्या टप्प्यात एरिक एरिक्सने  जनरेटिव्हिटी विरुद्ध स्थिरता आणि अखंडीता विरुद्ध निराशा हे दोन टप्प्ये सांगताना माणूस समाजाला चांगले योगदान कुठल्या कार्यक्रमा मार्फत देता येईल असा विचार करतो आणि त्याचे मुल्यांकन तो सातव्या आणि आठव्या टप्प्यात करत जातो.  तो आठव्या टप्प्याचे विश्लेषण करताना म्हणतो जर माणूस स्वतःचीओळख निर्माण करताना सामायिक ओळख निर्माण करू शकला नाही तर त्याच्या उत्तर आयुष्यात त्याला निराशा येऊ शकते. एरिक्सनचा मनोसामाजिक विकासाचा सिद्धांत आपल्याला एखाद्या व्यक्तीचा संपूर्ण विकास पाहण्यासाठी मार्ग देत असला तरी त्याच्या सिद्धांताला मर्यादा आहेत असे म्हटले जाते कारण त्याचा सिद्धांत वावदांचे निराकरण करण्याचा अचूक मार्ग सांगत नाही आणि एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात कसे जाता येईल याचा तपशीलही देत नाही.

प्राध्यापक जेफ्री अर्नेटचा सिद्धांत एरिक एरिक्सनपेक्षा वेगळा आहे. हा सिद्धांत असे सांगतो की ओळख मुख्यतः उदयोन्मुख प्रौढत्वामध्ये सर्वात महत्वाची संकल्पना आहे. त्याच्या म्हणण्यानुसार ओळख निर्मितीमध्ये जीवनातील विविध संधी आणि शेवटी जीवनातील महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यात यांचा समावेश होतो. जेफ्री अर्नेट सांगतो की प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये ओळख निर्मितीसाठी तीन भिन्न क्षेत्रांत मिळणाऱ्या संधी महत्वाच्या आहेत. त्यातील पहिली आहे प्रेम , ज्यात प्रत्येक माणूस आत्मीयतेची गहन भावना शोधत असतो. दुसरे क्षेत्र आहे काम, जिथे माणूस स्वतःचे करियर शोधत असतो जेणे करून ते काम त्याला दीर्घ काळासाठी समाधानकारक वाटेल. तिसरे आणि शेवटचे क्षेत्र आहे जागतिक दृश्ये. यात जेफ्री अर्नेट सांगतो की प्रत्येक माणूस हा महाविद्यालयात जाणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांना जगातल्या घडामोडींची दृश्ये समजू लागतात आणि त्यातून माणसांची ओळख निर्माण होण्याची प्रक्रिया सुरु होते. जी माणसे महाविद्यालयात जात नाही अशा माणसांच्या श्रद्धा आणि मुल्ये काय आहेत हे ठरवावे लागेल. जेफ्री अर्नेट प्रमाणे जेम्स मर्सिया यांनी सुद्धा ओळखीचा सिद्धांत मांडताना एखाद्या व्यक्तीने विविध पर्यायांचा शोध घेतला आहे की नाही, त्याचप्रमाणे व्यवसाय, धर्म, लैगिक आणि राजकीय मुल्यांची वचनबद्धता केली आहे की नाही असे विचार मांडले आहेत. तसे करताना त्यांनी ओळखीच्या सिद्धांतामध्ये चार स्थितीचा उल्लेख केला आहे. पहिल्या स्थितीत ते म्हणतात की माणसाने ओळखीचा सिद्धांत मांडताना व्यक्तीने त्याच्यावर असलेले संकट नीटपणे हाताळले आहे की नाही याचा विचार केला पाहिजे. दुसरी स्थिती योग्य कामाचा शोध घेण्याची प्रक्रिया ओळख ठरविण्यास मदत करते. तिसरी स्थिती म्हणजे कोणत्याही माहितीचा शोध पूर्णपणे घेऊनच ती माहिती दुसऱ्यापर्यंत घेऊन जाता आली पाहिजे नाहीतर चुकीची माहिती दिली जाईल. त्यामुळे ओळख पूर्णपणे होऊ शकणार नाही. शेवटची स्थिती ओळखीचा सिद्धांत सिद्ध करण्यासाटी जरुरीचे आहे ती म्हणजे माणसाने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उद्दिष्ट्ये मिळविण्यासाठी विश्वास आणि सामाजिक मुल्यांचा व्यवस्थित वापर केला आहे की नाही.

वर ओळख या शब्दाचा सिद्धांत सांगताना ओळखीची व्याख्या आणि तीन मानसशास्त्रज्ञाचा सिद्धांत सांगण्याचा प्रयन केला आहे. तरी सुद्धा एक प्रश्न पडतो तो म्हणजे ओळख आवश्यक आहे का ? याचे उत्तर सकारात्मकच आहे. कारण कोण किंवा कोणती व्यक्ती अथवा कोणती गोष्ट ठरवणारी वैशिष्ट्ये ओळख या शब्दात परिभाषित केली जाते. घटक किंवा ओळखीच्या वैशिष्ट्यांमध्ये वंश, वांशिकता, लिंग, वय, शारीरिक गुणधर्म, व्यक्तिमत्व, राजकीय संलग्नता, धार्मिक श्रद्धा, व्यावसायिक ओळख इत्यादींचा समावेश असेल. ओळख असल्यामुळे माणसाला आपलेपणाची भावना मिळू शकते जी त्याच्या हितासाठी आणि आत्मविश्वासासाठी महत्वाची आहे. ओळखीमुळे प्रत्येक माणूस स्वतःची रुची असलेल्या इतरांशी मैत्री  करू शकेल आणि आपले आयुष्य अधिक आशावादी बनवेल आणि मानवी जीवन वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील लोकांसाठी अधिक खुले होईल.

धन्यवाद

योगेश गोगवेकर

 

Comments

Popular posts from this blog

The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music

  Subject: The Unheard Architects of a Golden Era: Contribution of Goan Christians to Hindi Film Music Written by: Yogesh Gogwekar Address: Mahim, Mumbai  While reading Hindi Film Songs: Music Beyond Boundaries , the seminal work of Dr. Ashok D. Ranade, an ethnomusicologist and pioneer of cultural musicology, encounters a striking idea: though cinema is a visual medium, Indian cinema has for decades functioned as a dream factory where the song is its chief currency. According to Dr. Ranade, the Hindi film song is both deeply embedded in the cinematic narrative and yet capable of living a life entirely beyond it. As a cultural-musical unit, it transcends the film, the language, and even the region that produced it. Hindi film music, he observes, flows “here, there, and everywhere”—a truth every Indian instinctively recognizes. These songs are not merely entertainment; they are collective memory, cultural identity, and a shared national soundtrack. This is especially evide...

मी कशाला बंधनात राहू?

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक .: १९८ विषय क्रमांक .: ३ विषय : * ' मी कशाला बंधनात राहू ?'* शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा . राधिकाताई भांडारकर संकेतस्थळ : जेव्हा एखादी स्त्री ठामपणे म्हणते , “ मी स्वतंत्र आहे ”, तेव्हा ते वाक्य केवळ आत्मविश्वासाचे नाही , तर संपूर्ण व्यवस्थेला दिलेले आव्हान असते . मात्र आपल्या समाजाने या वाक्याचा अर्थ नेहमीच सोयीस्करपणे लावला आहे . स्वतंत्र स्त्री म्हणजे पुरुषद्वेषी , कुटुंबविरोधी , बंडखोर किंवा ‘ मर्यादा न पाळणारी ’ अशी लेबले तिच्यावर पटकन चिकटवली जातात . प्र त्यक्षात स्त्रीचे स्वातंत्र्य म्हणजे पुरुषांचे अस्तित्व नाकारणे नव्हे , तर पुरुषप्रधान सत्ताकेंद्रांना प्रश्न विचारण्याचे धैर्य आहे . स्वतंत्र स्त्री असणे म्हणजे सूड नव्हे ; तो स्वतःच्या आयुष्यावर हक्क आहे . स्वातंत्र्य म्हणजे काय ? आपल्या विचारांना शब्द देण्याचे स्वातंत्र्य , निर्णय स्वतः घेण्याची मुभा , आयुष्य स्वतःच्या अटींवर जगण्याचा आत्मविश्वास हेच खरे स्वातंत्र्य . त्यासाठी केवळ आर्थिक आत्मनिर्भरता पुरेशी नसते ; तर मतभिन्नता मांडण्याचे धैर्य आणि ‘ नाही ’ ...

इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता

  विषय :  इंग्रजीच्या सावलीतली मला समजलेली मराठी भाषा आणि आजची वास्तवता  शब्दांकन : योगेश गोगवेकर आज २७ फेब्रुवारी २०२६. मराठी भाषेचे आधुनिक कवी, नाटककार आणि कादंबरीकार वि. वा. शिरवाडकर यांचा आज जन्मदिन; आणि हाच दिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो. दरवर्षी हा दिवस साजरा करताना मला एक प्रश्न नेहमी पडतो, आज मराठीचे मराठी माणसांमध्ये नेमके स्थान काय आहे? आजची मराठी पिढी कितपत शुद्ध आणि आत्मीयतेने मराठी बोलते किंवा मराठी साहित्य किती वाचते? आजच्या पिढीला कवी कुसुमाग्रज कोण आहेत हे तरी माहिती आहे का? असे अनेक प्रश्न मनात उभे राहतात. हल्लीच आमच्या परिसरातील एका विशीतल्या तरुणीने पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल बोलताना, “ते आमच्या वडिलांच्या काळातील विनोद करणारे गृहस्थ होते,” असे म्हटले. पण पु. ल. देशपांड्यांनी मराठीत अत्यंत दर्जेदार साहित्य निर्माण केले आहे, हे तिला माहिती नव्हते; कारण तिच्या आई-वडिलांनीसुद्धा त्यांची पुस्तके वाचलेली नव्हती. मग कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख असण्याचा प्रश्नच दूर राहतो. माझ्या एका नातेवाईकाच्या मुलाने तर “सोपे मराठी समजते, पण वाचता येत नाही,” ...