रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : २५४ विषय क्रमांक : ३ विषय : जिवलगा शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम , मुंबई १९७१ साली ऋषिकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेल्या आनंद या चित्रपटात राजेश खन्ना संवाद म्हणत असताना एक वाक्य म्हणतो, “देखो बाबूमोशाय, हर एक बॉडी एक ट्रांसमीटर है और एक रिसीवर। बस उसकी बॉडी में से एक वायब्रेशन निकली और मैंने पकड़ ली, बस दोस्ती हो गई।“. या संवादाचा अर्थ असा आहे की एकत्रित आलेल्या व्यक्तींचे ऋणानुबंध जुळून येतात आणि काळाच्या ओघात ते जिवलग मित्र बनतात. मैत्री बाबतचा इतका सुंदर संवाद मला इतर कोणत्याही चित्रपटात ऐकायला मिळाला नाही. या संवादात कुठेही जिवलगा हा शब्द आला नसला तरी दोन माणसे एकत्र येतात तेव्हा त्यांचे भावनिक संबंध मजबूत असतात. यामध्ये प्रत्येक व्यक्ती एकमेकांवर विश्वास ठेवतात किंवा एकमेकांवर विसंबून राहू शकतात अथवा अशा व्यक्ती एकमेकांशी स्वतःची रहस्येसुद्धा शेअर करतात. याचाच अर्थ असा आहे की दोन व्यक्तींमध्ये संयोगाने झालेली भेट पुढे एकामेकांचे स्वभाव, विचार आणि आवडींच्या समानतामुळे आपोआपच जिवलग मित्र होऊन जातात. म्हणून जिवलगा या शब्दाचा अर्थ स...