रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : २०९ विषय क्रमांक : ४ विषय : सणांना नावं ठेवणे योग्य आहे काय? शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई संकेत स्थळ : भारत हा अनेक संस्कृतींचा देश आहे आणि आम्हाला या समृद्धी संस्कृतीचा अभिमान आहे. या संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे आपले सण. मग ते सण कोणत्याही धर्माचे असो किंवा राष्ट्रीय सण असो, ते सण आपण दिमाखदार आणि भव्यतेने साजरे करीत असतो. मग त्यात दिवाळी किंवा होळी असो, ख्रिसमस किंवा ईद असो हे सर्व सण आपल्याला सर्वांना एकत्र आणतात आणि आपली ओळख मजबूत करण्यास मदत करतात. हे सर्व सण आपल्याला नेहमीच चांगला संदेश देत असतात. असे म्हणतात वैदिकांची यज्ञसंस्था म्हणजे सण आणि उत्सवच होते. याचाच अर्थ प्राचीन भारतात ऋग्वेदकालीसुद्धा सण साजरे करीत असले पाहिजे. याबाबतीत पश्चिमी वैदिक पंडित पिशेल म्हणतो ऋग्वेदामध्ये अत्यंत महत्वाचा असा सोमयाग हा लोकप्रिय उत्सव किंवा सण साजरा केला जात होता. या उत्सवात कवी कविता करीत म्हणजे ऋचा करीत असे आणि गवई या ऋचांच्या आधारे सामगायन करीत असे. यात नृत्यांगनांही आपली नृत्यकला सादर करीत असे. योद्ध्ये धनुष्यबाणाची अचूक लक्षवेध...