रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : २०५ विषय क्रमांक : ४ विषय : पडद्यामागचं सत्य शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम मुंबई संकेत स्थळ : काही सार्वजनिक गोष्टी अशा घडतात की त्यांची बहुतेक लोकांना माहितीच नसते. अशाच गोष्टीना आपण नेहमी पडद्यामागचं सत्य असे म्हणत असतो. जास्त करून हे शब्द चित्रपटसृष्टीसाठी वापरले जातात. पण या शब्दांचे अनेक अर्थ आहेत. बहुतकरून या शब्दांचा मुख्य वापर दृश्याबाहेर घडणाऱ्या गोष्टी दर्शवण्यासाठी होतो. म्हणून पडद्यामागचं सत्य हे दोन शब्द वेगवेगळ्या परिस्थितीनुसार त्या परिस्थितीचा अर्थ समजून वापरले जातात. याचाच अर्थ असा की जे खासगीत किंवा गुप्तपणे घडत आहे ते सार्वजनिक किंवा सामान्य लोकांना कधीही दाखविले जात नाही. चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्यांसोबत चित्रीकरणादरम्यान घडलेल्या काही आश्चर्यकारक परिस्थिती दर्शवण्यासाठी या शब्दांचा वापर केला जातो. म्हणजे एखादे नाटक करताना रंगमंचाच्या पडद्यामागे काहीतरी घडत असते किंवा एखाद्या चित्रपटाची जेव्हा निर्मिती होत असते तेव्हा त्यातील दृश्ये ही वास्तविक जीवनाशी जोडत असताना पडद्यामागे कशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात याचे व...