Skip to main content

Posts

Showing posts from August, 2022

Dhund Zalya Katarveli धुंद झाल्या कातरवेळी

 रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : २०१ विषय क्रमांक : ४ विषय : धुंद झाल्या कातरवेळी शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई संकेत स्थळ : दिवे लागण्याची वेळ म्हणजे कातरवेळ असे लहानपणापासून आम्ही ऐकत आलेलो असतो. असे म्हणतात की सूर्य जेव्हा मावळत असतो त्यावेळेस कातर वेळ म्हटली जाते कारण ही वेळ आपल्या जीवाला कातर लावत असते. अनेक मित्र नातेवाईक जरी आपल्याभोवती असले तरी काही खास मित्रांची किंवा नात्यातील माणसांची आठवण या वेळेस प्रकर्षाने येत असते. अशा आठवणी आपल्याला दिव्याच्या मंद प्रकाशात अलगद प्रकारे येऊन आपले मन अंतरबाह्य ढवळून काढते. जेव्हा दिवस आणि रात्री एकमेकांना दुभागलेल्या असतात. यालाच आपण कातरवेळ म्हणत असतो. अशावेळेस  आपण कोणत्यातरी उदास गोष्टींशी जोडत असतो. कारण मानवी मन नेहमीच असेच मानते की प्रकाश आपल्यात  सकारात्मक भाव निर्माण करतो तर काळोख किंवा अंधार नेहमी उदासीनता  निर्माण करतो. त्यामुळे कातरवेळी उदास वाटणे हे साहजिकच आहे. म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सायंकाळी देवापुढे दिवे लावणे आणि छान सुगंध येणारी उदबत्ती लावण्याची जी प्रथा आहे ती आपल्या मन...

Ani ya deshache apan dene lagato आणि या देशाचे आपण देणे लागतो

 रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक: २०० विषय क्रमांक : ४ विषय : आणि या देशाचे आपण देणे लागतो शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई संकेत स्थळ : १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय स्वातंत्र्य दिवसाला ७५ वर्षे पूर्ण झाली. या वर्षी अनेक भारतीयांनी आपल्या घरावर झेंडे लावून या ७५ व्या स्वातंत्र्य दिवसाचे स्वागत केले. अनेक भारतीय लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी मिरवणूका काढल्या तर काही जणांनी सकाळी झेंडावंदन करून स्वातंत्र्याचा ७५ वा सोहळा साजरा केला. अशावेळेस मला एक गोष्ट आवर्जून जाणवली ती म्हणजे सर्व भारतीयांनी ७५ वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला खरा पण त्यांना या दिवसाचे महत्व काय आहे याची जाणीव होती का? या स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी ज्यांनी आपल्या आयुष्याची होळी केली किंवा आपल्या सुखाचा होम केला याची जाणीव तरी होती का? ज्या स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेल्या कार्यकर्त्यांनी अखंड छळ, कारावस सोसला तो कशासाठी? याची माहिती तरी होती का? आजच्या सोशल मीडियातून येणाऱ्या चुकीच्या माहितीच्या आधारे  तोच स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आहे असे आवर्जून सांगत असलेली तरुण पिढी पाहिली हिली की वाईट वाटू लागते. आ...

India’s 75th Independence Day

  Subject: India’s 75th Independence Day Written By: Yogesh Gogwekar Address : Mahim, Mumbai Date : 15/08/2022 On 15th August 2022, India is going to celebrate 75th year of Independence. Yes, it is a great achievement. Therefore, we have to celebrate our achievements for the last seventy five years. At the time of celebration of such a great event, I am remembering the visionary speech of India’s first Prime Minister Pandit Jawaharlal Nehru, ”A Tryst With Destiny” which was delivered on 14th August 1947, the night before India was going to be freed from British rule. This speech has been considered as one of the best speeches of the 20th Century which gives us lessons of peace, unity, perseverance and pride. In this connection, I always like the words used by him in his speech such as freedom and power bring responsibility or pledge ourselves to cooperate with them in furthering peace, freedom and democracy. From this speech one can easily find his approach towards natio...

Chaitanya-Shravanache Dene चैतन्य-श्रावणाचे देणे

 रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १९८ विषय क्रमांक : ४ विषय : चैतन्य-श्रावणाचे देणे शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम, मुंबई संकेत स्थळ :  श्रावण महिना हा हिंदू पंचांगाप्रमाणे पाचवा महिना असून चातुर्मासातील हा श्रेष्ठ महिना आहे. वैशाखाच्या उन्हाने आणि जेष्ठ आषाढातील पावसामुळे बेजार झालेल्याना वर्षा ऋतूत येणारा श्रावण महिना हा एक नवीन चैतन्य निर्माण करून देतो. आषाढांमध्ये भरपूर पडलेल्या पावसामुळे नदीनाले, तलाव भरभरून वाहात असतात. त्यामुळे श्रावणात सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. रामायणात हेमंत ऋतूला, तर गीतेत मार्गशिष महिन्याला फार महत्व दिले असले तरी मला श्रावण महिनाच मानवी मनांमध्ये चैतन्य निर्माण करतो असेच वाटत असते. निसर्ग आणि मानवी मन यांचे एक अनोखे नाते आहे. निसर्गामध्ये होणारे बदल माणसामध्ये चैतन्य निर्माण करीत असतात. जेव्हा अशा निसर्गातील बदलाला सण- उत्सवांची जोड मिळते तेव्हा मानवी जीवन खूपच आनंदाने बहरून जाते. हे सर्वकाही आपल्याला श्रावण महिन्यात अनुभवायला मिळते. चैत्रादी वर्षातील या पाचव्या महिन्याला श्रावण असे नाव देण्याचे मुख्य कारण म्हणजे या महिन्यात पौर्णिमेला ...