रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : १७९ विषय क्रमांक : ४ विषय : स्वातंत्र्य आणि स्वैराचारातील पुसट रेघ शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम स्वातंत्र्य आणि स्वैराचार यांच्यात नेहमीच एक पुसट रेघ असतेच. ही रेघ कळत नकळत प्रत्येक माणसांच्या आचारात आपल्याला दिसते आणि जाणवते सुद्धा. ही पुसट रेघ समजून घेण्या अगोदर आपण स्वातंत्र्य आणि स्वैराचार या दोन शब्दांची व्याख्या काय आहे हे नीटपणे समजून घेणे गरजेचे आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वतःला मुक्तपणे अभिव्यक्त करणे किंवा प्रत्येक मानवाला कोणत्याही शक्तीशी समरस न होता स्वमर्जी प्रमाणे वागण्याची क्षमता. स्वातंत्र्य ही एक संकल्पना असून त्याचा उगम भारतीय तात्विक विचारांत आहे. स्वातंत्र्य म्हणजे मुक्त , हक्क आणि जबाबदारी या तीन गोष्टींचा संगम आहे. जेव्हा मी म्हणतो की मी प्रत्येक बाबतीत स्वतंत्र आहे तेव्हा माझी जबाबदारी खूप वाढत असते. येत्या १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होतील. केवळ परकीय सत्तेपासून मुक्ती मिळणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे. सुप्रसिद्ध विचारवंत हेरॉल्ड लास्की यांच्या मते प्रत्येक व्यक्ती...