Skip to main content

Posts

महात्मा फुले स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते (लेख)

शुभंकरोति साहित्य परिवार सप्ताह क्रमांक : २०९ विषय क्र. : ४ विषय : महात्मा फुले स्त्रीशिक्षणाचे पुरस्कर्ते (लेख) शब्दांकन : योगेश गोगवेकर, मुंबई परीक्षक : सौ सपनाताई फुलझेले नागपूर संकेतस्थळ: आधुनिक भारताच्या इतिहासात महात्मा फुले यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. आधुनिक भारताचे निर्माते म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांचे कार्य एवढे व्यापक आहे की, त्याचा आढावा घेतल्याशिवाय आधुनिक भारताचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. शतकानुशतके अंधकारात चाचपडणाऱ्या बहुजन समाजाला आणि विशेषतः स्त्रियांना शिक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. ते म्हणत असत की, शिक्षणाचा उपयोग फक्त उदरनिर्वाहासाठी नसून गुलामगिरीतून मुक्तता मिळवण्यासाठी आणि वैचारिक दृष्टीकोन वैज्ञानिक बनवण्यासाठी होतो. शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी म्हटले आहे— “विद्येविना मती गेली | मतिविना नीती गेली || नीतीविना गती गेली | गतिविना वित्त गेले || वित्ताविना शूद्र खचले | इतके अनर्थ एका अविद्येने केले ||” या ओळींतून शिक्षणाशिवाय समाजाची होणारी दुरवस्था स्पष्ट होते. अशा या आधुनिक महात्मा फ...
Recent posts

सामाजिक बांधिलकी (वैचारिक लेख)

  शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक : २०८ विषय क्र. : ४ विषय : सामाजिक बांधिलकी (वैचारिक लेख) शब्दांकन : योगेश गोगवेकर, मुंबई परीक्षक : मा. माधुरीताई वानखडे, हिंगणघाट संकेतस्थळ : सामाजिक बांधिलकी हे केवळ शब्द नसून ती एक महत्त्वपूर्ण जीवनमूल्य आहे. ही मूल्ये आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनुभवत असतो. आपल्या शेजाऱ्यांच्या सुख-दुःखात आपण कळत-नकळत सहभागी होतो, तेव्हा सामाजिक बांधिलकीची जाणीव आपल्याला होते. एखाद्याला मदत करणे, अपघात घडल्यास तात्काळ धावून जाणे, वादळ, पूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये अडकलेल्या लोकांना सहाय्य करणे, रक्तदान करणे या सर्व कृतींमधून आपण सामाजिक बांधिलकी जपत असतो. समाज बदलण्याची वाट पाहणारे अनेक असतात, पण बदल घडवणारे थोडेच असतात. म्हणूनच ‘सामाजिक बांधिलकी’ या संकल्पनेची नेमकी व्याख्या करणे कठीण आहे. साध्या शब्दांत सांगायचे झाल्यास ती ‘माणुसकी’ म्हणून ओळखता येईल; परंतु हा अर्थही अपूर्णच आहे. सामाजिक बांधिलकी ही अत्यंत व्यापक संकल्पना आहे, कारण मानव हा मूलतः सामाजिक प्राणी आहे. समाजाशिवाय माणसाचे अस्तित्व अपूर्ण आहे. समाजाकडून आपण ज्ञान, संस्कृती आ...

गुन्हा न कळताही शिक्षा : Franz Kafka यांच्या The Trial मधील अस्तित्ववादी संघर्षाची कहाणी

  विषय : पुस्तक परिचय पुस्तकाचे नाव : The Trial लेखक : Franz Kafka प्रकाशक : Penguin Classics पृष्ठे : २०८ शीर्षक : गुन्हा न कळताही शिक्षा उपशीर्षक : Franz Kafka यांच्या The Trial मधील अस्तित्ववादी संघर्षाची कहाणी शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम , मुंबई संकेतस्थळ : एखाद्या व्यक्तीवर आरोप काय आहे हेच माहित नसताना त्याला शिक्षा होऊ शकते का ? हा अस्वस्थ करणारा प्रश्न The Trial ही कादंबरी वाचताना सतत मनात घोळत राहतो. ही कादंबरी Franz Kafka यांनी १९१४ साली लिहिलेली असून , त्यांच्या मृत्यूनंतर १९२५ मध्ये प्रकाशित झाली. जोसेफ के. या बँक कर्मचाऱ्याच्या आयुष्यात घडणाऱ्या विचित्र आणि भयावह घटनांभोवती ही कथा फिरते. येथे कोणताही ठोस खलनायक नसून , संपूर्ण राज्यव्यवस्थाच एका खलनायकाच्या रुपात अदृश्य शक्ती म्हणून उभी राहते. जोसेफ के. हा प्राग शहरात राहणारा एक यशस्वी बँक कर्मचारी. एके दिवशी पहाटे अचानक दोन अधिकारी त्याच्या खोलीत येऊन त्याला अटक करतात. मात्र त्याच्यावर कोणता आरोप आहे , हे कोणीच सांगत नाही. तरीही त्याच्याकडून स्वतःचा बचाव अपेक्षित असतो. हीच या कथेची सर्वात मोठी...

अंधश्रद्धेच्या विळख्यात महिला (वैचारिक लेख)

  शुभंकरोति साहित्य परिवार सप्ताह क्रमांक : २०७ विषय क्र. : ४ विषय : अंधश्रद्धेच्या विळख्यात महिला (वैचारिक लेख) शब्दांकन : योगेश गोगवेकर, मुंबई परीक्षक : मा. ऋचाताई पारेख मुंबई आज आपण अशा युगात राहतो आहोत, ज्यात विज्ञानाने खूपच प्रगती केली आहे. नवीन-नवीन तंत्रज्ञान निर्माण होत आहे. आज विज्ञानाने चंद्र, मंगळ गाठले; कृत्रिम बुद्धिमत्तेपासून अवकाश संशोधनापर्यंत मानवाने अभूतपूर्व प्रगती साधली आहे. तरी एक प्रश्न अस्वस्थ करतो तो म्हणजे विज्ञानाच्या प्रकाशात जग झगमगत असताना स्त्री अजूनही जादूटोणा, नजर, तंत्र-मंत्र यांच्या अंधारात का अडकलेली आहे? अलीकडील काही घटनांनी हा प्रश्न अधिक तीव्र केला आहे. महाराष्ट्रातील सिन्नर तालुक्यात एका भोंदू व्यक्तीने ज्योतिषाच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याची बातमी प्रसिद्ध झाली. त्यातच एका संविधानिक पदावरील महिलेने त्या आरोपीचे पाय धुतल्याचे छायाचित्र समोर आले. अशा घटना पाहिल्यावर प्रश्न निर्माण होतो की ज्या व्यवस्था महिलांच्या संरक्षणासाठी आहेत, त्यांच्याच कृतींमुळे जर अंधश्रद्धेला बळ मिळत असेल, तर पीडित महिलांनी न्याय कुणाकडे मागायचा? या घटनेने पुन्हा ...

पुस्तक परिचय : India After 1947: Reflections and Recollections by Rajmohan Gandhi

  विषय : पुस्तक परिचय पुस्तकाचे नाव :   India After 1947: Reflections and Recollections लेखक :   राजमोहन गांधी प्रकाशक :   रूपा पब्लिकेशन इंडिया पृष्ठे :   ११८ शब्दांकन :   योगेश गोगवेकर पत्ता :   माहीम ,  मुंबई काही जणांचा असा समज असतो की भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले आणि तिथेच भारताचा इतिहास जणू संपतो. स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या समकालीन इतिहासाबद्दल त्यांना फारशी माहिती नसते. परंतु असा इतिहास सांगणारी काही महत्त्वाची पुस्तके नव्वदच्या दशकानंतर लिहिली गेली आणि भारताने विविध क्षेत्रांत केलेल्या प्रगतीची नोंद त्यात आढळते. सुनील खिल्लानी यांचे   The Idea of India ,  रामचंद्र गुहा यांची   Makers of Modern India   आणि   India After Gandhi   अशी काही पुस्तके समकालीन इतिहास अत्यंत प्रभावीपणे मांडतात. ही पुस्तके केवळ माहिती देत नाहीत ;  ती आपल्याला इतिहासाचे आकलन करून त्याचा अर्थ समजून घेण्यास मदत करतात. असेच एक इंग्रजी पुस्तक दोन वर्षांपूर्वी माझ्या वाचनात आले होते. अलीकडे पुन्हा एकदा ते वाचावेसे वा...