शुभंकरोती साहित्य परिवार सप्ताह क्रमांक : १९९ विषय क्रमांक : १ विषय : २६ जानेवारी येतो आहे शब्दांकन : योगेश गोगवेकर परीक्षक : मा. प्रा. सुमतीताई पवार संकेतस्थळ: २६ जानेवारी १९५० हा दिवस सर्व भारतीयांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी भारताची राज्यघटना अस्तित्वात आली आणि भारत एक सार्वभौम , समाजवादी , धर्मनिरपेक्ष व लोकशाही प्रजासत्ताक देश म्हणून घोषित झाला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले ; मात्र त्या स्वातंत्र्याला दिशा देणारी , मर्यादा घालणारी आणि मूल्ये ठरवणारी राज्यघटना अस्तित्वात नव्हती. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संविधान मसुदा समिती नेमण्यात आली , जेणेकरून धर्म , भाषा , जात , पंथ , लिंग या सर्व भेदांपलीकडे जाऊन प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळू शकतील. ही राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारली गेली ; मात्र तिची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० रोजी झाली. यामागे ऐतिहासिक कारण होते. २६ जानेवारी १९३० रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी लाहोर काँग्रेस अधिवेशनात पूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला होता. त्यामुळे २६ जानेवारी ही केवळ एक तारीख नसू...