Skip to main content

Posts

Showing posts from August, 2025

The Closing of American Mind by Allan Bloom द क्लोजिंग ऑफ अमेरिकन माइंड: हाऊ हायर एज्युकेशन हॅज फेल डेमोक्रसी: अँड इम्पॉवरिश्ड द सोल्स ऑफ टुडेज स्टुडंट्स

विषय ; पुस्तक परिचय पुस्तकाचे नाव : द क्लोजिंग ऑफ अमेरिकन माइंड: हाऊ हायर एज्युकेशन हॅज फेल डेमोक्रसी: अँड इम्पॉवरिश्ड द सोल्स ऑफ टुडेज स्टुडंट्स लेखक : ऍलन ब्लूम प्रकाशक : Simon and Schuster Paperbacks New York NY10020 पृष्ठे : ३९३ शब्दांकन : योगेश गोगवेकर संकेतस्थळ : जेव्हा डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली तेव्हा अमेरिकेने आपल्या राजकारणात अनियंत्रण सत्तेचे धोकादायक वळण घेतल्याचे वाटू लागले. या अनियंत्रण सत्तेचे भूत आता अमेरिकेला खूपच त्रास देऊ लागल्याची जाणीव होत आहे. जेकब एस. हॅकर आणि पॉल पिअर्सन या दोन विद्वानांनी ट्रंप यांच्या राजकारणाचे वर्णन करताना “plutocratic populism” हे शब्द वापरले आहेत. जेव्हा एखादा समाज एखाद्या श्रीमंत व्यक्तींकडून नियंत्रीत केला जाणार असेल तेव्हा  ‘plutocratic’ हा शब्द वापरला जातो. जेव्हा असे शब्द देशाच्या राजकारणात वापरले जातात तेव्हा एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे त्या देशाच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत अनिष्ट निर्माण होण्याची भीती असते. म्हणूनच लोकशाहीवादी माणसे अशा प्रकारच्या पद्धतीला विरोध करतात.   ...

Ekada Jarur vachave ase pustak-एकदा जरूर वाचावे असे पुस्तक

  रंग लेखणीचे परिवार आठवडा क्रमांक : ३५५ विषय क्रमांक : ४ विषय : एकदा जरूर वाचावे असे पुस्तक शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता : माहीम , मुंबई एकदा जरुर वाचावे असे पुस्तक हा विषय प्रत्येक व्यक्तीचा आवडी निवडीशी जोडला जाऊ शकतो कारण मला जे पुस्तक महत्वाचे वाटले ते इतर कुणाला महत्वाचे वाटेलच असे नाही. मी जी काही पुस्तके वाचली आहेत त्यातील एखादे पुस्तक एकदा तरी वाचण्यासाठी मी दुसऱ्या व्यक्तींना वाचण्यासाठी फक्त विनंती करू शकतो पण त्याने ते वाचावे म्हणून मला आग्रह धरता येणार नाही. अशी अनेक पुस्तके वेगवेगळ्या विषयांवर आहेत जी एकदा तरी वाचली गेली पाहिजेत असे मला वाटते. कारण पुस्तक हे साधन आहे , साध्य नव्हे , ती वाचल्याने मानवी मनाचा विकास होण्यास वाव मिळतो. त्यामुळे मनन , चिंतन , विश्लेषण   आणि अनुसरण करण्याची सवय लागते आणि आपल्या समाजात भोवताली घडत असलेल्या परिस्थितीचा अचूक अंदाज घेता येतो. पण इथे मला फक्त एकच पुस्तक निवडायचे आहे. म्हणून मी १९४८ रोजी जॉर्ज ऑरवेल यांनी लिहिलेली १९८४ ही कादंबरी निवडली आहे. ही एकदा तरी आयुष्यात वाचली गेली पाहिजे कारण ही कादंबरी लोकशाही राज्या...