Skip to main content

Posts

Showing posts from December, 2024

कृत्रिम बुद्धीमत्ता आणि साहित्यासामोरील आव्हाने

विषय : कृत्रिम बुद्धीमत्ता आणि साहित्यासामोरील आव्हाने शब्दांकन : योगेश गोगवेकर पत्ता: माहीम, मुंबई संकेतस्थळ : कृत्रिम बुद्धिमत्ता हे शब्द इंग्रजी भाषेमध्ये Artificial Intelligence म्हणून संबोधले जातात. या शब्दांची कुठेही व्यवस्थितपणे व्याख्या दिलेली आढळत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता हे  संगणकाच्या विज्ञान शाखेने बनविलेले एक मानवी यंत्र आहे जे माणसांप्रमाणे तर्क करण्याची क्षमता ठेवते आणि एखाद्या गोष्टींचे विश्लेषण करून अर्थ शोधते. याचा अर्थ असा आहे की हे मानवी रोबोट असलेले मशीन आहे. हे मानवी रोबोट माणसांप्रमाणे शिकते, नियोजन करते आणि समस्या सोडविण्यासाठी माणसाला मदत पण करते. सोप्या भाषेत बोलायचे झाले तर असे म्हणता येईल की कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक असे बुद्धिवान मशीन आहे जे मानवी भावना ओळखते आणि समजून घेते. या कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द् तयार करण्याचे श्रेय ऍलन टुरिंग, मर्विन मिन्स्की, ऍलन नेवेल, हर्बर्ट ए सायमन आणि जॉन मॅकार्थी या संगणक शास्त्रज्ञांना जात असले तरी कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द पहिल्यांदा प्रचारात आणण्याचे काम जॉन मॅकार्थी यांनी केले आहे म्हणून त्यांना या शब्दाचे जनक म...

Book Analysis Pereira Maintains (परेरा मेंटेन्स) by Antonio Tabucchi (अँटोनियो ताबुची)

विषय: पुस्तक परीक्षण पुस्तकाचे नाव:  Pereira Maintains ( परेरा मेंटेन्स) लेखक:   Antonio Tabucchi ( अँटोनियो ताबुची) प्रकाशक:  Penguin Random House UK ( पेंग्विन रँडम हाऊस यूके) पाने: १४४ किमत: रुपये ४९९/- शब्दांकन : योगेश गोगवेकर परेरा मेंटेन्स ही अँटोनियो ताबुची यांनी उत्कृष्टपणे लिहिलेली सहानुभूती पूर्ण कादंबरी आहे. या कादंबरीचा नायक मध्यम वयस्क विधुर आहे जो लिस्बन या पोर्तुगालच्या राजधानीत राहतो. त्याच्या जवळ दिवंगत पत्नीच्या फोटोशिवाय दुसरे काही नाही. बऱ्याच वेळेला तो त्या फोटोबरोबर एकटाच संवाद करीत असतो. एका दुय्यम दर्जा असलेल्या वृत्तपत्रात सांस्कृतिक विभागाचा संपादक म्हणून तो काम करीत आहे ,  जेथे तो १९ व्या शतकातील    फ्रेंच साहित्य पोर्तुगीज भाषेत भाषांतरीत करुन या वृत्तपत्रात प्रसिद्ध करत असतो आणि त्यातच त्याला आनंद मिळत असतो. ही कादंबरी जरी १९९३ मध्ये लिहिली असली तरी या पुस्तकात जो कालखंड व्यथित केला आहे तो २५ जुलै १९३८ पासूनचा आहे. लिस्बन आणि त्या शहराच्या आसपास असलेल्या प्रदेशात घडलेल्या घटनांच्या आधारे ही कादंबरी लिहिली गेली आहे. लिस्बन ह...